मित्रांनो आता राज्य शासन घर बांधण्यासाठी मोफत वाळू देणार आहे, मंत्रिमंडळ बैठकीत नवीन योजना (Free Valu Yojana) सुरू करण्यात आली आहे. सरकार सतत काही न काही योजना राबवत असते त्यामुळे ही गरीब लोकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे, शिंदे सरकारने हा निर्णय सामान्य नागरिकांच्या हितासाठी घेतला आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!मोफत वाळू योजना (Free Valu Yojana) मध्ये सहभागी होण्यासाठी काही अटी आणि शर्ती सांगण्यात आल्या आहेत, त्या आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. सोबतच कोणते व्यक्ती पात्र असणार? लाभ कसा मिळणार? ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे? अशी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा.
सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही या योजनेमधून 5 ब्रास पर्यन्त वाळू मोफत घेऊ शकणार आहेत. त्यामूळे या योजनेचा फायदा नक्की घ्या. आणि अशाच योजनांचे अपडेट तुम्हाला हवे असतील तर आमचा व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा.
ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा – JOIN
Free Valu Yojana Maharashtra 2024

आपल्या तर माहीतच आहे की खूप ठिकाणी अवैध वाळू उपसा केला जात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाळूचे दर देखील वाढत आहेत. त्यामूळे ह्या अवैध वाळू उपस्याला आळा घालण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. त्यासाठी शासनाने एक विधेयक मंजूर केले आहे आणि त्या विधेयकानुसार आता नदी पात्रातील किंवा इतर कोणत्याही ठिकाणी होणारे वाळू उपसा शासना द्वारे केला जाणार आहे.
या आधी जे इतर लोक अवैध प्रकारे वाळू उपसा करत होते त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. Free Valu Yojana Maharashtra 2024 या योजणेमुळे आता सर्वसामान्य नागरिकांना एकदम कमी किमतीमद्धे वाळू मिळणार आहे. जर तुम्हाला पण या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी काही पात्रता असणे आवश्यक आहे तर त्याची माहिती पुढे सविस्तर दिली आहे.
Free Valu Yojana 2024 Eligibility
मोफत वाळू मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता :
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही केंद्र शासन किंवा राज्य शासनाच्या घरकुल योजनेचे लाभार्थी असणे आवश्यक आहे.
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- तुम्हाला या योजनेमधून 5 ब्रास पर्यंतच वाळू मोफत मिळते.
- या योजनेससाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- कारण ऑनलाइन बूकिंग केल्यानंतरच तुम्हाला वाळू मिळते.
महत्वाचे : या योजनेचा लाभ हा ज्यांना घरकुल मिळाले आहे त्यांनाच होणार आहे. इतर कोणालाही मोफत वाळू मिळणार नाही. तुम्हाला या योजनेअंतर्गत वाळू घेण्यासाठी प्रतिब्रास फक्त 600 रुपये तसेच वाहतुकीचा खर्च द्यावा लागणार आहे. त्यामुळे अति सामान्य कुटुंबालाही परवडणारी योजना आहे.
Free Valu Yojana Benifit
मोफत वाळू योजना (Free Valu Yojana Maharashtra 2024) 2024 चे फायदे :
- गरीब लोकांना घर बांधण्यासाठी मोफत वाळू मिळणार आहे.
- योजने अंतर्गत 5 ब्रास पर्यंत मोफत वाळू गरीबांना मिळते.
- सोबतच 5 ब्रास पेक्षा जास्त वाळू पाहिजे असेल, तर प्रती ब्रास 600 रुपये दराने वाळू खरेदी करता येते.
- लाभार्थ्यांना केवळ वाळू वाहतूकीचा खर्च लागतो.
How to Get Free Sand मोफत वाळू कशी मिळवावी?
जर तुम्हाला मोफत वाळू मिळवायची असेल तर तुम्हाला त्यासाठी ऑनलाइन बूकिंग करावी लागते. त्यानंतर वाळूची ऑनलाईन बुकींग झाल्यावर त्यासंबंधी माहिती तुम्हाला प्राप्त होईल, त्यांनंतर ज्याच्याकडे ऑनलाइन बूकिंग ची पावती आहे त्यांनाच वाळू मिळणार आहे. नंतर तुम्ही तुमच्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील वाळू डेपो मध्ये जाऊन बुकींग नुसार मोफत वाळू मिळवू शकता.
वाळू डेपो मध्ये तुम्हाला ऑनलाईन बुकींग केलेली पावती नेणे आवश्यक आहे. पावती रीसिप्ट ऑनलाईन बुकींग केल्यावर शेवटी येते, तेव्हा तुम्हाला ती सरकारी वाळू डेपो वरून मोफत वाळू मिळणार प्रिंट काढून घ्यायची आहे, किंवा PDF स्वरूपात Save करायची आहे. वाळू मोफत मिळवण्यासाठी शासनमान्यता प्राप्त वाळू डेपो मध्ये जाऊन तुमच्या online बुकिंग नुसार मोफत फ्रीमध्ये वाळू मिळवता येईल.
अर्जदारांना वाळू मोफत स्वरुपात मिळणार आहे, पण वाळूची वाहतूक करण्यासाठी अर्जदाराला मात्र खर्च करावा लागणार आहे. मोफत वाळू फक्त 5 ब्रास मिळणार आहे, पण तुम्हाला जर जास्त वाळू हवी असेल तर तुम्ही जास्तीची वाळू पण मिळवू शकता.
Free Valu Yojana Maharashtra Online Form (Booking)

महाराष्ट्र मोफत वाळू योजना 2024 ऑनलाइन बुकिंग :
- मोफत वाळू मिळवण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या अधिकृत वेबसाइट वरुण ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे.
- उमेदवार फॉर्म न भरता मोफत वाळूची मागणी करतील, ते पात्र जारी असले तरी त्यांना रेती फ्री मध्ये दिली जाणार नाही.
- ऑनलाईन बुकींग करण्यासाठी राज्य सरकारने अधिकृत संकेतस्थळ सुरू केले आहे. Official Website वरून Valu Booking करायची आहे.
- ऑनलाइन बूकिंग करण्यासाठी अधिकृत वेबसाईट वर जायचे आहे, तेथे तुम्हाला Online Valu Booking साठी क्लिक करायचे आहे.
- तुमच्या समोर ऑनलाईन बुकींग चा फॉर्म Open होईल, तो फॉर्म तुम्हाला काळजीपूर्वक भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये सर्व माहिती अचूक भरायची आहे.
- त्यानंतर तुम्हाला शेवटी तुमची घरकुला संबंधी माहिती टाकायची आहे, घरकुल मिळाले असेल तरच अर्ज पुढे जाईल, अन्यथा मोफत वाळू मिळणार नाही.
- फॉर्म भरताना आवश्यक ते सर्व कागदपत्रे सोबत ठेवायचे आहेत, त्यानुसार जर कागदपत्रे अपलोड करण्यास सांगितले तर Soft Copy मध्ये कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
- फॉर्म भरून झाल्यावर शेवटी Free Valu Booking चा ऑनलाईन बुकींग फॉर्म सबमिट करायचा आहे. सबमिट करण्यापूर्वी एकदा अर्ज तपासून पाहायचा आहे, तसेच तुम्हाला जेवढी वाळू लागणार आहे, तेवढी वाळू तुम्ही अर्जात बुक करू शकता.
अशा पद्धतीने तुम्ही मोफत वाळू योजनेसाठी (Free Valu Yojana Maharashtra 2024) ऑनलाईन बुकिंग करू शकता.
आशा करतो की तुम्हाला मोफत वाळू योजना 2024 बद्दलची आवश्यक माहिती मिळाली असेल. माहिती इतरांसोबत शेअर करा ज्यांना घरकुल मिळाले आहे जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ होईल. आणि सरकारच्या अशाच नवनवीन अपडेट रोज पाहण्यासाठी https://bhartiera.com ला भेट देत जा.
हेही वाचा :