Lek Ladki YojanaLek Ladki Yojana

Lek Ladki Yojana 2023

Lek Ladki Yojana
Lek Ladki Yojana

मित्रांनो महाराष्ट्रातील लेक लाडकी योजना नेमकं काय आहे? या Lek Ladki Yojana साठी पात्रता, फॉर्म पीडीएफ, रजिस्ट्रेशन साठी वेबसाईट ची लिंक. नियम व अटी या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला येथे मिळणार आहे. ही योजना नेमकं कोणी चालू केली Lek Ladki Yojana अंतर्गत कोणते फायदे होणार आहेत. त्यासोबतच या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतो. या योजने करिता फॉर्म कसा भरायचा, त्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागतात. तरी सर्व माहिती तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये येथे मिळणार आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe! मित्रांनो जर तुम्हाला येणाऱ्या योजनेच्या अपडेट जर व्हाट्सअप वरती हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा. जेणेकरून नवीन येणारे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक खाली दिली आहे.

Lek Ladki Yojana Marathi

योजनेचे नाव : या योजनेचे नाव Lek Ladki Yojana आहे.

योजनेची सुरुवात : या योजनेला ऑक्टोबर 2023 पासून सुरू आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या योजनेसाठी अप्लाय करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अप्लाय करायचे आहे.

राज्य : ही योजना महाराष्ट्र राज्यामध्ये चालू आहे.

हेल्पलाइन नंबर : लवकरच अपडेट करण्यात येईल.

अधिकृत वेबसाईट : लवकरच अपडेट करण्यात येईल.

पात्रता : ज्यांच्याकडे पिवळ्या आणि केशरी कलरची रेशन कार्ड आहे त्यांना या योजने करिता अप्लाय करता येणार आहे.

मित्रांनो या योजनेची घोषणा महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी आर्थिक वर्ष 2023 च्या अर्थसंकल्पात केली आहे. ही योजना महिलांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. परंतु अजून या योजनेची माहिती शासन निर्णयाद्वारे स्पष्ट करण्यात आलेले नाही. या योजनेची फक्त अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलेली आहे. तरी आपण या योजनेचा कोणाला लाभ भेटणार आहे. योजनेसाठी कोण पात्र ठरणार आहे. तसेच या योजनेअंतर्गत मुलींना किती रुपये मिळणार आहेत. अशी पूर्ण माहिती बघणार आहोत.

लेक लाडकी या योजनेचा उद्देश : महाराष्ट्र सरकारने Lek Ladki Yojana योजना सुरू केली आहे परंतु या योजनेच्या मुख्य उद्देश नेमका कोणता आहे हे सुद्धा जाणून घेणे खूप महत्त्वाचा आहे. तरी या योजनेमागचा मुख्य उद्देश हा महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबातील मुलींचे जन्मापासून तर त्यांच्या पूर्ण शिक्षणापर्यंत आर्थिक मदत करणे हा आहे. आणि त्या मुलींचा विकास व्हावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. तसेच मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा त्यामुळे लेक लाडकी योजनेचा मोठा पाऊल महाराष्ट्र सरकारने उचलला आहे.

लेक लाडकी योजनेचे फायदे : महाराष्ट्र सरकारने जी Lek Ladki Yojana सुरू केली आहे तिचे फायदे काय काय आहेत चला बघूया.

  1. मुलीचा जन्म झाल्यास या योजनेद्वारे तिच्या नावावर 5,000 रुपये जमा केले जातील.
  2. त्यानंतर मुलगी इयत्ता चौथी मध्ये असताना तिच्या नावावरती 4000 रुपये जमा केले जातील.
  3. मुलगी जेव्हा सहावी मध्ये असेल तेव्हा तिच्या खात्यामध्ये 6,000 रुपये जमा केले जातील.
  4. मुलगी अकरावी मध्ये असताना तिच्या खात्यामध्ये 8,000 रुपये जमा केले जातील.
  5. आणि जेव्हा मुलीचे वय 18 वर्षे होईल तेव्हा तिला 75,000 रुपये रोख मिळतील.
  6. या योजनेचा लाभ हा एप्रिल 2023 नंतर जन्म झालेल्या मुलींनाच मिळणार आहे.

असे मिळून या योजनेद्वारे मुलीला 1,01,000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.

Lek Ladki Yojana 2023 Maharashtra

Lek Ladki Yojana
Lek Ladki Yojana

Lek Ladki Yojana 2023 Eligibility Criteria : या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो चला बघूया.

  1. Lek Ladki Yojana 2023 Maharashtra करिता पात्र होण्यासाठी उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे.
  2. लेक लाडकी ही योजना फक्त महाराष्ट्र मधील मुलीं करिता आहे.
  3. ज्या मुली महाराष्ट्र राज्याच्या बाहेरच्या आहेत त्या या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.
  4. ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड आहेत त्या कुटुंबातील मुली या योजने करिता पात्र राहतील.
  5. या योजनेद्वारे ज्या मुलींना लाभ होणार आहे त्यांचे बँक अकाउंट उघडणे आवश्यक आहे.
  6. मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत या योजनेद्वारे तिला आर्थिक मदत मिळणार आहे.

योजने करिता आवश्यक कागदपत्रे :

  1. मुलीचा जन्म दाखला.
  2. उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न हे एक लाख पेक्षा जास्त नसावे).
  3. मुलीचे आधार कार्ड.
  4. मुलीच्या पालकांचे आधार कार्ड.
  5. बँक पासबुक.
  6. रेशन कार्ड (पिवळे किंवा केशरी).
  7. मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभाकरिता 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्यास त्याचा दाखला).
  8. ज्या टप्प्यावरील लाभ घ्यायचा आहे त्या टप्प्यामध्ये शिक्षण घेत असल्याचा शाळेचा दाखला.
  9. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र.
  10. अंतिम लाभ घेण्याकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक असणार आहे. (मुलगी अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वयंघोषणापत्र).

इत्यादी आवश्यक कागदपत्रे या योजने करिता लागणार आहेत.

Lek Ladki Yojana 2023 Online Apply

लेक लाडकी ही योजना महाराष्ट्र सरकारने 2023 च्या अर्थसंकल्पात घोषित केले आहे. परंतु ही योजना अजून राज्यांमध्ये अधिकृतपणे लागू करण्यात आलेली नाही. त्यामुळेच लेक लाडकी योजनेसाठी रजिस्ट्रेशन कसे करायचे याबद्दलची माहिती आणि वेबसाईटली अजून उपलब्ध करण्यात आलेले नाही. आणि याबाबतची एप्लीकेशन फॉर्म किंवा पीडीएफ देखील उपलब्ध करण्यात आलेले नाही. जेव्हा याबाबतची कोणती अपडेट येईल तेव्हा तुम्हाला याची सूचना देण्यात येईल. व्हाट्सअप वरती सूचना मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

योजनेचा जीआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

या योजनेकरिता ऑनलाइन फॉर्म तुम्ही योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरून करू शकता. परंतु या योजनेची ऑफिशियल वेबसाईट अजून तयार करण्यात आली नाही. पण तुम्हाला वेबसाईट आल्यानंतर लगेच कळवण्यात येईल.

ही माहिती तुमच्या नातेवाईकांबरोबर व मित्रांबरोबर नक्की शेअर करा आणि अशाच अपडेट रोज पाहण्यासाठी https://bhartiera.com/ ला रोज भेट देत जा.

हेही वाचा :

Cotton Rate Today : 2023 मध्ये कापसाचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता! येथे पहा पूर्ण माहिती

Lek Ladki Yojana

FAQ :

लेक लाडकी योजना 2023 साठी अप्लाय कसे करावे?

या योजने करिता अप्लाय करण्यासाठी राज्य सरकारकडून कोणती अधिकृत माहिती मिळालेली नाही.

Lek Ladki Yojana 2023 ची घोषणा केव्हा करण्यात आली?

या योजनेची घोषणा महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023-24 मध्ये करण्यात आली आहे.

लेक लाडकी योजना 2023 साठी शेवटची तारीख किती आहे?

या योजने करिता अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख अजून उपलब्ध नाहीये.

Lek Ladki Yojana काय आहे?

ही योजना महाराष्ट्र सरकार द्वारे मुलींच्या आर्थिक व सामाजिक शैक्षणिक विकासासाठी घोषित करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर तिला 75,000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.

Lek Ladki Yojana 2023 साठी अप्लाय कसे करावे?

या योजने करिता ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचे आहे.