MSRTC Recruitment 2024: एसटी महामंडळ, पुणे विभागात होणार 1146 चालकांची भरती! पहा सविस्तर माहिती

MSRTC Recruitment 2024 New Update

MSRTC Recruitment 2024
MSRTC Recruitment 2024

मित्रांनो एस टी महामंडळ पुणे मध्ये लवकरच रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे MSRTC Recruitment 2024 या भरतीद्वारे एसटी महामंडळामद्धे चालक होण्यासाठी चांगली संधी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एसटीच्या पुणे विभागाचे मुख्य असलेले विभाग नियंत्रक पद रिक्त होते. आता एसटीच्या मुख्यालयाकडून या पदावर नुकतीच प्रमोद नेहूल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

त्यांनी असे स्पष्ट केले आहे की प्रवाशांना वेळेत गाड्या उपलब्ध होऊन, सेवेत वाढ करणे आणि जास्तीत जास्त चांगल्या सुविधा पुरविण्याकरिता आम्ही ताफ्यात 1146 चालकांची भरती करत आहोत. यामुळे आम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने प्रवासी सेवा पुरवण्यास मदत होणार आहे.

मित्रांनो MSRTC Recruitment 2024 या भरती संबंधी येणारे महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ठाणे एसटीच्या विभागीय कार्यशाळेत म्हणजेच यांत्रिक विभागात 400 पैकी अवघे 100 कर्मचारी कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण अधिक वाढला असून या विभागातील कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी अशी माघणी करण्यात आली आहे.

महामंडळाने तातडीने लक्ष देउन यांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करावेत अन्यथा आंदोलनात्मक भुमिका घ्यावी लागेल असे निवेदन महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस युनियन च्या ठाणे विभागा वतीने ठाणे विभाग नियंत्रकांना देण्यात आले आहे. विभागीय कार्यशाळा येथे एक काळ असा होता की 400 यांत्रिक कर्मचारी कार्यरत होते. आज परिस्थिती अशी आहे की त्यापैकी फक्त 100 च्या आसपास कर्मचारी उरलेले  आहेत.

दरम्यान च्या काळात अनेकजण सेवानिवृत्त झाले, काहींनी दुसऱ्या विभागात बदली घेतली आहे, काही महत्त्वाचे असे यांत्रिक विभाग असे आहेत की तिथे दोन ते तीनच कर्मचारी उरलेले आहेत. यांत्रिक काम हे पार काटेकोरपणे केले जाते त्यात यांत्रिक काम प्रचंड अंगमेहनतीचे असुन कमी मनुष्यबळात दडपशाही करुन प्रशासनाकडून ते करून घेतले जाते, काही कारणास्तव नियोजित काम वेळेवर झालं नाही तर प्रशासकीय कारवाई केली जाईल असे सांगितले जाते.

यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचलेले आहे. महामंडळाने यांत्रिक विभाग कधीच अद्यवत करण्याचा प्रयत्नच केला नसल्याचा आरोप पत्रात करण्यात आला किंबहुना यांत्रिक विभाग हा एसटीतील महत्त्वाचा विभाग असताना तो नेहमी दुर्लक्षितच राहिलेला असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य एस टी. वर्कर्स काँग्रेसचे ठाणे विभाग अध्यक्ष सचिन शिंदे यांनी केला आहे.  

BMC Recruitment 2024: बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई मध्ये “अनुज्ञापन निरीक्षक” पदाची भरती! येथे पहा पात्रता

ST Mahamandal Bharti 2024 New Update

MSRTC Recruitment 2024
MSRTC Recruitment 2024

यापूर्वी त्यांनी जालनामध्ये विभाग नियंत्रक पदी काम केले आहे. आणि त्यानंतर आता पुण्यात आल्यावर त्यांनी पुण्यातील कारभाराची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. माहिती घेतल्यानंतर ते प्रवाशांसाठी उपयुक्त असलेल्या योजनांची कडक आणि सक्तीने अंमलबजावणी करण्यावर भर देणार असल्याचे नेहूल यांनी यावेळी सांगितले आहे. आगार पातळीवर ही कर्मचारी फार कमी प्रमाणात आहेत. आणि जेवढे कर्मचारी आहेत त्यामधील बरेच कर्मचारी सेवानिवृत्तीच्या जवळ आलेले आहेत.

यांत्रिक विभागात तातडीने नोकर भरती करणे गरजेचे असल्याचे इंटक ने केलेल्या सर्वेक्षणात उघड झाल्याचे  शिंदे यांनी सांगितले व यांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी ठाणे विभाग नियंत्रकांनी  पुढे प्रयत्न करावेत यासाठी निवेदन देत असून यांत्रिक भरतीचा प्रश्न राज्यात सर्वत्रच सारखा असुन इंटक सरचिटणीस मुकेश तिगोटे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच या प्रश्नावर पाठपुरावा केला जाईल वेळप्रसंगी आंदोलनात्मक भुमिका घेण्यात येईल अशा इशारा देखील पत्रात देण्यात आला आहे.

खूप सारे उमेदवार असे आहेत जे एस टी महामंडळ मध्ये ड्रायव्हर पदासाठी भरती कधी निघेल याची वाट बघत आहेत. कारण खूप दिवसापासून ड्रायव्हर या पदासाठी भरती निघालेली नाही. पण महितीमुळे चालक पदासाठी (MSRTC Recruitment 2024) भरती निघण्याची आशा आहे.

मित्रांनो या भरतीच्या येणाऱ्या सर्व अपडेट वेळेवर वर टाकण्यात येतील. जेणेकरून तुम्हाला तशी माहिती वेळेवर मिळेल.

MSRTC Recruitment 2024 New Update ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

इतर महत्वाच्या अपडेट :

ST Mahamandal Bharti 2024: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळामध्ये नोकरीची संधी! पात्रता 10वी उत्तीर्ण

Goa Home Guard Bharti 2024: गोवा होमगार्ड अंतर्गत नवीन भरती सुरू! पात्रता 8 वी पास

धन्यवाद!

National Creator’s Award 2024 : See Full Winner List