Maharashtra State Cooperative Bank Recruitment
जर तुम्हाला बँक खात्यामध्ये नोकरी मिळवायची असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण Maharashtra State Cooperative Bank Recruitment अंतर्गत बँकेमध्ये कनिष्ठ अधिकारी श्रेणी मधील प्रशिक्षणार्थी अधिकारी, प्रशिक्षणातील लिपिक आणि लघुलेखक ही रिक्त पदे भरण्याकरिता नवीन भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीमध्ये बँकेतील कनिष्ठ अधिकारी श्रेणीमधील प्रशिक्षणार्थी अधिकारी, लघुलेखक ही रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!त्यामुळे आता जे उमेदवार बँक मध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही खूप मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीची जाहिरात महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँक लिमिटेड यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आले आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर खाली दिलेली भरतीची संपूर्ण जाहिरात व त्यामध्ये रिक्त असणारी पदे त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती या सर्व गोष्टी व्यवस्थित पहा व त्यानंतरच अर्ज करा. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.
जर तुम्हाला भरती बद्दलची कोणती अपडेट हवी असेल तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून भरतीची नवीन नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. व्हाट्सअप ग्रुप ची लिंक देखील खाली दिली आहे.
If you want to get a job in bank account then there is good news for you because Maharashtra State Cooperative Bank Recruitment has started new recruitment process to fill the vacancies of Trainee Officer, Trainee Clerk and Stenographer in Junior Officer category. In this recruitment, the vacant posts of Trainee Officer, Stenographer in the junior officer category in the bank will be filled.
So now this is a great opportunity for those candidates who want to get a job in a bank. This recruitment advertisement has been published by Maharashtra State Co-operative Bank Limited. If you are interested in this recruitment, then go through the below complete recruitment advertisement and other necessary information about the vacant posts carefully and then apply for this recruitment. The link to apply online is also given below.
Cooperative Bank Recruitment Details
भरतीचा विभाग : ही भरती महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँक लिमिटेड अंतर्गत होणार आहे.
या भरतीचा प्रकारा खाजगी स्वरूपाचा आहे पण तुम्हाला या भरतीद्वारे पर्मनंट नोकरी मिळण्याची चांगली संधी आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.
वेतन/पगार : उमेदवाराला रुपये – 30,000 ते रुपये 49,000 एवढे मासिक वेतन दिले जाणार आहे.
Cooperative Bank Recruitment Vacancies
पदांची नावे : या भरतीद्वारे बँकेमध्ये कनिष्ठ अधिकारी, प्रशिक्षणार्थी लिपिक, कनिष्ठ अधिकारी श्रेणीमधील स्टेनो टायपिस्ट ही पदे भरली जाणार आहेत.
एकूण पदांची संख्या : Cooperative Bank Recruitment या भरती द्वारे एकूण 153 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
Education Criteria for Cooperative Bank Recruitment
शैक्षणिक पात्रता : Cooperative Bank Recruitment या भरतीसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.
व्यावसायिक पात्रता :
- प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी : या पदाकरिता उमेदवार हा किमान 60% गुणासह कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि मराठी विषयांपैकी एक विषय म्हणून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण असायला हवा आहे. तसेच बँकिंग क्षेत्रामधील किमान दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- प्रशिक्षणार्थी लिपिक : या पदाकरिता उमेदवार हा किमान 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेमधील पदवीधर आणि मराठी विषयांपैकी एक विषय म्हणून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण असला पाहिजे. तसेच मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट याची परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र ज्याच्याकडे असेल त्याला प्राधान्य देण्यात येणार आहे.
- स्टेनो टायपिस्ट : या पदाकरिता उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठामधून पदवी किंवा समतुल्य पदवी आणि मराठी विषयांपैकी एक म्हणून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण असला पाहिजे. तसेच उमेदवाराला 80 ते 100 शब्द प्रतिमा इतक्या वेगाने चाचणी उत्तीर्ण करावी लागणार आहे. तसेच मराठी लघुलेखन आणि त्याच 40 शब्द प्रति मिनिट चे लिप्यांतरण देखील करावे लागणार आहे. उमेदवाराला त्याच्या नियुक्तीनंतर मराठी सोबत इंग्रजी स्टेनोग्राफी आणि टायपिंग शिकणे सुद्धा आवश्यक आहे. जर हे यशस्वी झाल्यास त्यांचे प्रोफेशन बँकेद्वारे मंजूर केले जाणार नाही.
अर्ज करण्यासाठी शुल्क :
- प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी या पदाकरिता रुपये- 1770
- प्रशिक्षणार्थी लिपिक या पदाकरिता रुपये- 1180
- कनिष्ठ अधिकारी श्रेणीतील स्टेनो टायपिस्ट या पदाकरिता रुपये- 1770
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 10 ऑक्टोबर 2023 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 ऑक्टोबर 2023 ही या भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
निवड करण्याची प्रक्रिया : उमेदवारांची निवड ही ऑनलाइन चाचणी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे.
जर तुम्ही या भरती करिता पात्र असाल तर लवकरात लवकर अर्ज करा व अधिक माहिती पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात बघा.
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील भरतीच्या अपडेट वेळेवर मिळत राहतील.
धन्यवाद!