Swadhar Yojana
मित्रांनो विद्यार्थ्यांना आता शिक्षणासाठी तब्बल 51,000 रुपयांची स्कॉलरशिप भेटणार आहे. कारण महाराष्ट्र स्वाधार योजना (Swadhar Yojana) ही नवीन योजना राज्यातील गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. असे खूप विद्यार्थी असतात ज्यांना पुढील शिक्षण घ्यायचे तर असते पण त्यांची घरची परिस्थिति चांगली नसते आणि त्यामुळे ते शिक्षणापासून वंचित राहतात. आणि ही गोष्ट लक्षात घेऊन सरकारने राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र स्वाधार योजना 2024 चालू केली आहे तसेच या योजनसाठी अर्ज देखील सुरू झाले आहेत. या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!या योजनेंतर्गत 10वी, 12वी, पदवी, व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राज्य सरकारकडून दरवर्षी तब्बल 51,000 रुपये दिले जाणार आहेत. या योजनेसाठी पात्रता काय हवी आहे? या योजनेसाठी अर्ज कसा करायचा अशी सर्व माहिती पुढे दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा.
अशाच नवनवीन अपडेट साठी WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा.
स्वाधार योजना माहिती मराठी (Swadhar Yojana in Marathi)
स्वाधार योजना तपशील :
योजनेचे नाव | महाराष्ट्र स्वाधार योजना. |
सुरवात कोणी केली? | महाराष्ट्र शासन. |
योजणेचा विभाग | महाराष्ट्र समाज कल्याण विभाग. |
लाभार्थी | अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थी. |
उद्देश | विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे. |
मिळणारी स्कॉलरशिप | प्रत्येक वर्षी 51,000/- रुपये. |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
योजनेची अधिकृत वेबसाइट | https://sjsa.maharashtra.gov.in/ |
स्वाधार योजना फायदे (Swadhar Yojana Benefit)
स्वाधार योजना फायदे :
मित्रांनो या योजनेद्वारे विद्यार्थ्यांना खूप सारे फायदे होणार आहेत. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आर्थिक फायदा. आर्थिक फायदा सोबतच त्यांना शिक्षणामध्ये देखील मदत होणार आहे. कारण गरीब कुटुंबातील मुलांना या योजनेद्वारे पुढील शिक्षण घेण्यास मदत मिळणार आहे.
- महाराष्ट्र स्वाधार योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तब्बल 51,000 रुपयांची स्कॉलरशिप मिळणार आहे.
- मिळणारी स्कॉलरशिप ही विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलचा खर्च, जेवणाचा खर्च, शिक्षणाची फी इत्यादी गोष्टींसाठी मिळणार आहे.
- या योजनेद्वारे विद्यार्थ्यास आर्थिक मदत भेटल्यामुळे त्यांच्या घरच्यांना देखील फायदा होणार आहे.
स्वाधार योजना पात्रता (Swadhar Yojana Eligibility)
स्वाधार योजनेसाठी आवश्यक पात्रता :
- या योजणेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- राज्यातील केवळ अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती आणि नवबौध्द समाजातील विद्यार्थीच योजनेसाठी पात्र असणार आहेत.
- अर्ज करणारा उमेदवार हा इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी, डिप्लोमा, प्रोफेशनल कोर्स यापैकी कोणत्याही अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा, तसेच तो चालू वर्षात शिक्षण घेत असावा. विद्यार्थ्याचे प्रवेश हा Regular Student या स्वरूपात झालेला असावा. मुक्त विद्यापीठातून प्रवेश घेतलेला विद्यार्थी या स्वाधार योजने साठी पात्र असणार नाही.
- अर्जदाराने मागील शैक्षणीक वर्षात किमान 60% टक्के एवढे गुण मिळवलेले असावेत, दिव्यांग विद्यार्थ्यांना 20% गुणांची सूट देण्यात आली आहे, त्यानुसार दिव्यांग विद्यार्थ्यांना मागील शैक्षणिक वर्षात केवळ 40% टक्के एवढे मार्क मिळालेले असावेत असे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
- अर्जदाराचे वार्षीक कौटुंबिक उत्पन्न हे 2.5 लाख पेक्षा कमी असावे म्हणजेच उमेदवार हा मध्यमवर्गीय कुटुंबातील असणे आवश्यक आहे.
Swadhar Yojana Document’s
महाराष्ट्र स्वाधार योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
- 10वी मार्कशीट.
- शाळा सोडल्याचा दाखला.
- बोनाफाईट प्रमाणपत्र.
- अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र.
- अर्ज करणारा विद्यार्थी हा दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र.
- विद्यार्थी किंवा त्याच्या पालकांचे बँक खाते (झेरॉक्स प्रत).
- घोषणापत्र.
- विद्यार्थी ज्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये शिकत आहे तेथील प्राध्यापक किंवा मुख्याध्यापकांचे शिफारस पत्र.
- विद्यार्थी शासकीय वस्तीगृहात राहत नसल्याचे शपथपत्र.
- स्वाधार योजना फॉर्म चा अर्ज नमुना.
वरती जे कागदपत्र सांगितले आहेत ते सर्व कागदपत्रे तुम्हाला या योजनेचा फॉर्म भरताना जोडायचे आहेत. आणि त्यानंतर या योजने करिता अर्ज करायचा आहे. नाहीतर तुमचा फॉर्म ग्राह्य धरला जाणार नाही.
How to Apply for Swadhar Yojana
तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज करू शकता.
ऑनलाइन अर्ज लिंक : http://swadharyojana.com/login/form
Swadhar Yojana Last Date
महाराष्ट्र स्वाधार योजनेसाठी अशा पद्धतीने अर्ज करा :
- स्वाधार योजनेसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी तुम्ही पुढे दिलेली स्वाधार योजना फॉर्म पीडीएफ डाउनलोड करून घ्या.
- अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक व व्यवस्थित भरा. तुम्ही भरलेली माहिती अचूक असणे आवश्यक आहे.
- अर्ज भरून झाल्यानंतर अर्जासोबत लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे जोडा.
- अर्ज भरून झाल्यानंतर व कागदपत्रे जोडल्यानंतर तुमचा फॉर्म समज कल्याण कार्यालयात जाऊन सादर करायचा आहे.
- त्यानंतर तुमच्या फॉर्मची पडताळणी केली जाईल तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर जर तुम्ही त्या योजनेसाठी पात्र असाल तर तुमचा अर्ज स्वीकारला जाईल.
अशा पद्धतीने तुम्ही महाराष्ट्र स्वाधार योजनेसाठी अर्ज करू शकता.
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना या योजनेबद्दल माहिती होईल आणि त्यांना देखील या योजनेद्वारे थोडीशी मदत होईल. आणि अशाच नवनवीन योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.
FAQ:
महाराष्ट्र स्वाधार योजनेसाठी अर्ज कुठे करायचा?
महाराष्ट्र स्वाधार योजनेसाठी अर्ज हा समाज कल्याण कार्यालयामध्ये सादर करायचा आहे.
महाराष्ट्र स्वाधार योजनेतून किती रुपये मिळतात?
स्वाधार योजनेतून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी 51,000 रुपये मिळतात.