New Education Policy 2024: आता 10वी, 12वी बोर्डची परीक्षा देता येणार दोन वेळा! लागू होणार नवीन शासन निर्णय

New Education Policy 2024

New Education Policy
New Education Policy

विद्यार्थी मित्रांनो आता New Education Policy नुसार तुम्हाला 10वी, 12वी ची बोर्ड परीक्षा (Board Exam) दोनवेळा देता येणार आहे. पण हा शासन निर्णय कोणत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे? याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे. प्राइम मिनिस्टर स्कूल फॉर रायझिंग इंडिया’ योजनेचा (New Education Policy) शुभारंभ केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते छत्तीसगडमध्ये करण्यात आला. या योजनेंतर्गत राज्यातील 211 शाळा अपग्रेड केल्या जाणार आहेत. या कार्यक्रमात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या उद्दिष्टांबद्दल सांगितले, आणि याचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक ताण कमी करणे हा आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

नवीन शैक्षणिक धोरणामुळे (New Education Policy) येत्या काळात बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताणही कमी होणार आहे. आणि आता विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी एक नव्हे तर दोन संधी मिळणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले आहे की, शैक्षणिक सत्र 2025-26 पासून विद्यार्थ्यांना वर्षातून दोनवेळा 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेस बसता येणार आहे.

New Education Policy

NEP 2020 अंतर्गत केंद्राच्या योजनेबद्दल बोलत असताना शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले; “शैक्षणिक सत्र 2025-26 पासून, विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेस दोनवेळा बसण्याची संधी मिळणार आहे.” गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार (NCF) विद्यार्थ्यांना चांगली कामगिरी करण्यासाठी पुरेसा वेळ आणि संधी मिळावी यासाठी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील. त्यामुळे त्यांना बोर्ड परीक्षेमद्धे चांगले गुण मिळवायची संधी मिळणार आहे आणि विद्यार्थी दोन्ही परीक्षेमधून मिळालेले उच्च गुण ठेऊ शकतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

10 बॅगलेस दिवस (New Education Policy) :

आज-काल विद्यार्थी मैदानी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, कला अशा गोष्टीपासून लांब जात आहेत. कारण सतत शैक्षणिक तान असल्यामुळे त्यांची मानसिक स्थिती चांगली राहत नाही आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी दरवर्षी शाळांमध्ये 10 बॅगलेस दिवस (New Education Policy) सुरू करण्याच्या संकल्पनेवर प्रकाश टाकला. त्यांनी विद्यार्थ्यांना कला, संस्कृती आणि खेळ अशा उपक्रमांवर विशेष भर देण्याचा सल्ला दिला.

त्यामुळे आता 10वी, 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण बोर्ड च्या परीक्षेमधील मिळालेले मार्क्स ही त्या विद्यार्थ्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप महत्त्वाचे असतात आणि त्यामध्येच आता सुधारणा करण्याची संधी आता विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

ही माहिती तुमच्या त्या मित्रांसोबत शेअर करा येणाऱ्या वर्षामध्ये 10वी किंवा 12वी मध्ये जाणार आहेत. आणि ही न्यूज पाहून त्यांच्या आनंदामद्धे थोडी भर पडेल. आणि शासनाच्या अशाच नवनवीन येणाऱ्या अपडेट रोज पाहण्यासाठी आमचा व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा.

New Education Policy
New Education Policy

व्हाटसप्प ग्रुप जॉइन करा – JOIN

अधिक माहितीसाठी पहा – https://bhartiera.com

हेही वाचा :

Army JCO Bharti 2024