Pradhan Mantri Awas Yojana: प्रधानमंत्री आवास योजना 2023! सर्वांना मिळणार स्वतःची पक्की घरे| येथे पहा योजनेची पूर्ण माहिती

Pradhan Mantri Awas Yojana

Pradhan Mantri Awas Yojana

मित्रांनो भारत सरकार वेळोवेळी विविध प्रकारच्या योजना राबवत असते. तर अशीच Pradhan Mantri Awas Yojana बद्दल पूर्ण माहिती जसे की ऑनलाईन अर्ज, पात्रता, लाभ, याची पूर्ण माहिती पुढे दिली आहे. Pradhan Mantri Awas Yojana ही भारत सरकारची प्रमुख गृहनिर्माण योजना आहे. ही योजना आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 22 जून 2015 रोजी सुरू केली होती. जिला PMAY योजना असे म्हणले जाते. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे बेघर, कच्ची घरी असणारे, आणि दारिद्र्य रेषेखालील झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबांना स्वतःची पक्की घरे उपलब्ध करून देणे हा आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

या योजनेचे सरकारने दोन भागात विभाजन केले आहे. ज्यामध्ये पहिला भाग म्हणजे प्रधानमंत्री शहरी गृहनिर्माण योजना आहे. आणि दुसरा भाग म्हणजे प्रधानमंत्री ग्रामीण गृहनिर्माण योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत 31 मार्च 2022 पर्यंत देशात तब्बल 4,00,000,00 पक्की घर बांधण्याचा उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.

जर तुम्हाला सरकारच्या नवीन येणाऱ्या योजनांचे अपडेट्स व्हाट्सअप वरती हवे असतील तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pradhan Mantri Awas Yojana 2023

योजनेचे नाव : Pradhan Mantri Awas Yojana.

श्रेणी : ही योजना केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत येते.

कोणी सुरू केली? : माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांनी ही योजना सुरू केली आहे.

योजना सुरू : 22 जून 2015 रोजी.

विभाग : गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय.

लाभार्थी व्यक्ती : EWS, LIG, MIG 1, आणि MIG 2 गटातील सर्व नागरिक.

अधिकृत वेबसाईट : https://pmaymis.gov.in/

योजनेचा उद्देश : देशातील कमी उत्पन्न असणाऱ्या गटातील नागरिकांना स्वतःची पक्की घरे उपलब्ध करून देणे.

अर्ज करण्याची पद्धत : या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

Pradhan Mantri Awas Yojana Gramin

प्रधानमंत्री आवास योजना ही भारत सरकारची एक प्रमुख गृह निर्माण योजना आहे. या योजनेद्वारे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक तसेच निम्मउत्पन्न असणारे गट समाजातील कमी उत्पन्न असणारे गट अशा नागरिकांना परवडणारे घर उपलब्ध करून देणे असा या योजनेचा उद्देश आहे. 2024 पर्यंत सर्वांसाठी घरे ही उद्दिष्ट साध्य करण्याचा हेतू आहे. ही योजना शहरी व ग्रामीण या दोन्ही भागांसाठी लागू करण्यात आली आहे.

या योजनेकरिता पात्र असणाऱ्या अर्जदारांना पक्की गरिबांना साठी कर्ज दिले जाते. आणि त्याच कर्जावर शासनाकडूनही अनुदान दिले जाते. ही एक क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम आहे. म्हणजेच या योजनेच्या लाभार्थ्यांना नवीन घर खरेदी करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी जर कर्ज हवे असेल तर ते व्याज अनुदाना करीत आहे पात्र आहेत.

मित्रांनो भारतामध्ये मालमत्ता आणि जमिनीच्या किमती वाढत चालले आहेत. त्यामुळे आता नवीन घरे बांधणे किंवा खरेदी करणे हे देखील स्वस्त राहिले नाही. हे विशेषतः महानगरांमध्येच म्हणजे शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी संबंधित आहे. आणि त्यामुळेच त्या लोकांना परवडतील असे घरे बांधणे किंवा विकत घेणे त्याकरिता भारत सरकारने जून 2015 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली होती.

चला तर मग आता जाणून घेऊया की प्रधानमंत्री आवास योजना 2023 अंतर्गत सरकार कोणत्या वर्गातील लोकांना कर्ज देते आणि त्या कर्जावर किती सबसिडी दिली जाते. तसेच या योजनेबद्दल इतर काही महत्त्वाची माहिती सुद्धा आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

Pradhan Mantri Awas Yojana Status

Pradhan Mantri Awas Yojana
Pradhan Mantri Awas Yojana

मित्रांनो या योजनेअंतर्गत EWS, LIG, आणि MIG गटातील उत्पन्न असलेल्या कुटुंबांना लाभ मिळतो. या योजनेच्या शहरीक्षेत्राद्वारे आत्तापर्यंत 58 लाख पक्की घरे आणि ग्रामीण क्षेत्र द्वारे तब्बल 2.52 कोटी पक्की घरी बांधण्यात आले आहेत. शहरीक्षेत्रासाठी पक्की घरे देण्याची वैधता ही 31 मार्च 2022 पर्यंत निश्चित करण्यात आली होती. परंतु नंतर ती 30 सप्टेंबर 2022 पर्यंत वाढवण्यात आली होती. आणि ग्रामीण क्षेत्रासाठी 2.95 कोटी घरे बांधण्याच्या उद्देशाने केंद्रीय मंत्रिमंडळाने 31 मार्च 2024 पर्यंत वाढवली आहे.

Pradhan Mantri Awas Yojana Eligibility

पात्रता : पती-पत्नी आणि अविवाहित मुलांचे कुटुंब हे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत निर्धारित केलेल्या मापदंडानुसार घर मानले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या नागरिकाचे भारताच्या कोणत्याही भागांमध्ये त्यांच्या नावावर किंवा त्याच्या कुटुंबांमधील कोणाच्याही नावावर पक्के घर नसले पाहिजे.

Pradhan Mantri Awas Yojana येत्या काही काळामध्ये देशातील जवळपास सर्व बेघर, कच्ची घरे, झोपडपट्टी किंवा रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या कुटुंबांना पक्की घर देण्याचे मिशन पूर्ण करणार आहे. या योजनेअंतर्गत MIG-I श्रेणीमध्ये असणाऱ्या लोकांकरिता 9,00,000 रुपयांच्या कर्जासाठी कर्जावरील व्याज अनुदान 4% आहे. आणि MIG-II या श्रेणीतील लोकांसाठी 12,00,000 रुपयांच्या कर्जासाठी व्याज अनुदान 3% आहे. जर त्या व्यक्तीला अतिरिक्त कर्ज घ्यायचे असेल तर ते घेऊ शकतात परंतु अतिरिक्त घेतलेल्या कर्जाच्या रकमेसाठी व्याजदर अनुदानित नाहीये.

2011 च्या जनगणनेनुसार देशातील तब्बल 40 लाख भारतीय कुटुंब बेघर, अपुऱ्या किंवा गर्दीच्या ठिकाणी राहत आहेत त्यामुळे त्यांना मूलभूत सुविधा नसलेली घरांची कमतरता आहे. आणि 2012 ते 2019 दरम्यान घरांच्या किमतीमध्ये अधिक वेगाने वाढ झाली आहे आणि त्यामुळेच ज्या कुटुंबाचे उत्पन्न कमी आहे त्यांच्यासाठी ही घरे परवडणारी नाहीयेत. आणि ही अडचण लक्षात घेऊनच Pradhan Mantri Awas Yojana द्वारे शहरी क्षेत्रामध्ये अशा लोकांकरिता परवडणारी घरे मिळवून देणे असे उद्दिष्ट ठेवले.

एकूण मंजूर घरांची संख्या : 122.69 लाख.

सुरू झालेल्या घरांची संख्या : 107.5 लाख.

पूर्ण झालेल्या घरांची संख्या : 67.4 लाख.

केंद्रीय सहाय्य रक्कम : 2.03 लाख कोटी.

केंद्रीय मदत जाहीर केलेली रक्कम : 135,533 कोटी.

Pradhan Mantri Awas Yojana Subsidy

या योजनेअंतर्गत मुख्य चार घटक आहेत.

क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम (CLSS) :

देशामध्ये घराची उपलब्ध कमी होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पैशाची कमतरता आणि कमी किमतीच्या घरांची कमी उपलब्धता. आणि याच समस्येचा सामना करण्यासाठी सरकारने गृह कर्ज अनुदान देण्याची गरज लक्षात घेऊन Pradhan Mantri Awas Yojana अंतर्गत क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम सुरू केली. जेणेकरून शहरांमधील कमी उत्पन्न असणाऱ्या गटातील नागरिक एकता स्वतःचे घर बांधू शकतील किंवा विकत घेऊ शकतील.

इन-सीटू स्लम पुनर्विकास (ISSR) :

इन-सीटू स्लम पुनर्विकास (ISSR) या योजनेचे उद्दिष्ट हे आहे की खाजगी संस्थाच्या सहकार्याने झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करणे. आणि या योजनेअंतर्गत संसाधन म्हणून जमिनीचा वापर करून गर्दीच्या किंवा अडचणीच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना घरे उपलब्ध करून देणे. तसेच या योजनेअंतर्गत संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश लाभार्थींची योगदान ठरवतील आणि घरांच्या किमती केंद्र सरकार ठरवतील.

या योजनेअंतर्गत झोपडपट्टी मधील जे पात्र नागरिक आहेत त्यांना घरे बांधण्याकरिता एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. आणि बांधकाम सुरू असताना झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना तात्पुरती राहण्याची सोय देखील केली जाईल.

Affordable Housing in Partnership (AHP) :

जी कुटुंबे EWS अंतर्गत येतात त्यांना घर खरेदी करण्यासाठी किंवा बांधकाम करण्यासाठी केंद्र सरकारकडून 1.5 लाख रुपयांची मदत देणे या योजनेचे उद्दिष्ट आहे. आणि अशा प्रकल्पांसाठी राज्य/ केंद्रशासित प्रदेश खाजगी किंवा एजन्सी सोबत सहकार्य करू शकतात. आतापर्यंत EWS साठी बांधलेल्या घरांची एकूण संख्या 35% आहे.

लाभार्थ्यांच्या नेतृत्वाखाली वैयक्तिक घर बांधणे/ सुधारणा (BLC) :

ई डब्ल्यू एस श्रेणीमधील लोक यत्ता नवीन घर बांधू शकतात किंवा 1,50,000 रुपये केंद्रीय सहाय्याने स्वतःचे घर वाढवू शकतात अशी तरतूद करते.

Pradhan Mantri Awas Yojana Gramin Online Apply

Pradhan Mantri Awas Yojana साठी असा अर्ज करा :

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या पायऱ्या खाली दिल्या आहेत.

  1. प्रधानमंत्री आवास योजनेचे अधिकृत वेबसाईट https://pmaymis.gov.in/ वर लॉगिन करा.
  2. त्यानंतर नागरिक मूल्यांकन अंतर्गत ‘ झोपडपट्टीतील रहिवासी’ किंवा तीन घटकांखाखालील लाभ निवडा. तुम्ही ज्या श्रेणीमध्ये आहेत त्यानुसार.
  3. त्यानंतर आधार क्रमांक टाकून तुमचा आधार तपशील सत्यापित करण्यासाठी तपासावर क्लिक करा.
  4. तुमचा आधार एकदा सत्यपीत झाल्यानंतर, फॉर्म मध्ये दिलेली सर्व तपशील भरा. त्यानंतर सर्व माहिती पुन्हा एकदा चेक करा जर माहिती चुकीची टाकण्यात आली तर तुमचा अर्ज रद्द केला जाईल.
  5. त्यानंतर खाली स्क्रोल करा, कॅपच्या प्रविष्ट करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची माहिती व्हिडिओद्वारे बघायची असेल तर खाली दिलेल्या व्हिडिओ पूर्ण बघा.

खालील नागरिकांना या योजनेतून वगळण्यात आले आहे :

जर एखाद्याकडे दुचाकी, तीन चाकी, आणि इतर कृषी उपकरणे असतील तर त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

ज्या व्यक्तीकडे किसान क्रेडिट कार्ड आहे आणि त्याची मर्यादा 50 हजार किंवा त्याहून अधिक आहे असे.

ज्या कुटुंबांमधील किमान एक सदस्य सरकारी सेवेत आहे आणि महिन्याला दहा हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे कमावत असेल त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

जर एखादी व्यक्ती मालमत्ता कर भरत असेल आणि जर त्याच्याकडे रेफ्रिजरेटर किंवा लँडलाईन फोन कनेक्शन आहे अशा व्यक्तींना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

Pradhan Mantri Awas Yojana List 2022-23

Pradhan Mantri Awas Yojana

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण लिस्ट :

जर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेची ग्रामीण लिस्ट बघायची असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा. त्यानंतर एक वेबसाईट ओपन होईल त्यामध्ये तुमच्या राज्याचे, तुमच्या जिल्ह्याचे आणि गावाचे नाव टाका त्यानंतर कॅपच्या सबमिट करून सबमिट बटन वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या गावची प्रधानमंत्री आवास योजनेची लिस्ट तुम्हाला बघायला मिळेल.

Pradhan Mantri Awas Yojana ची ग्रामीण लिस्ट बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://rhreporting.nic.in/netiay/SocialAuditReport/BeneficiaryDetailForSocialAuditReport.aspx

ही माहिती तुमच्या मित्रांबरोबर व नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना योजनेचा लाभ घेता येईल. आणि सरकारच्या येणाऱ्या अशाच नवीन योजनेच्या अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा आणि https://bhartiera.com/ ला रोज भेट देत जा.

हेही वाचा :

Pradhan Mantri Jan Dhan Yojana: प्रधानमंत्री जन धन योजना 2023 मध्ये खाते कसे उघडायचे पहा पूर्ण माहिती

धन्यवाद!

प्रधानमंत्री आवास योजना 2023 काय आहे?

ही एक सरकारी योजना आहे. आणि या योजनेचा उद्देश म्हणजे समाजातील दुर्बल घटकांसाठी परवडणारी स्वतःची पक्की घरे उपलब्ध करून देणे आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?

ज्या व्यक्तीकडे भारतामध्ये कुठे स्वतःचे पक्के घर नाही. तसे त्याचे वार्षिक उत्पन्न 18 लाख पेक्षा जास्त नाही. आणि अर्जदाराच्या कुटुंबाने या अगोदर भारत सरकारकडून कोणत्याही प्रकारचे गृहनिर्माण संबंधित लाभ घेतलेले नाहीत असे नागरिक या योजनेकरिता अर्ज करू शकतात. व इतर काही पात्रता असणे आवश्यक आहे.

National Creator’s Award 2024 : See Full Winner List