Ujjwala Yojan: प्रधानमंत्री उज्वला योजना 2.0! सर्वांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन | पहा पूर्ण माहिती

Ujjwala Yojan

Ujjwala Yojan
Ujjwala Yojan

मित्रांनो Ujjwala Yojan द्वारे कशाप्रकारे सर्वांना गॅस कनेक्शन मिळणार आहे. याची पूर्ण माहिती तुम्हाला या लेखामधून मिळणार आहे. आपल्या देशामध्ये आज पण अशी काही ठिकाण आहेत जिथे स्वयंपाकासाठी गॅस वापरला जात नाही. आणि तेथील स्त्रिया आज पण पण चुलीवरती स्वयंपाक करतात. आणि यामुळे तेथील स्त्रियांना खूप त्रास देखील सहन करावा लागतोय. कारण चुलीवरती स्वयंपाक करण्यासाठी त्यांना रानावनातून लाकडे जमा करावे लागतात. आणि स्वयंपाक करताना देखील धुराचा त्रास सहन करावा लागतो.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

आणि चुली मधून निघणारा धूर हा आपल्या शरीरासाठी खूप घातक पण आहे. याचा दुष्परिणाम म्हणजे घरगुती वापराकरिता लाकूड मिळवण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात लाकूडतोड करतात. आणि त्यामुळे झाडांचा ऱ्हास पण होतो. आणि याच गोष्टीचा विचार करून केंद्र सरकारने Pradhan Mantri Ujjwala Yojana सुरू केली आहे. आणि या योजनेद्वारे देशामधील एपीएल, बीपीएल आणि शिधापत्रिका धारक महिलांना स्वयंपाकासाठी गॅस उपलब्ध करून दिला जाईल.

मित्रांनो सरकारच्या अशाच योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा.

ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pradhan Mantri Ujjwala Yojana

योजनेचे नाव.प्रधानमंत्री उज्ज्वला योजना.
केव्हा सुरू झाली?01 मे 2016 पासून योजनेला सुरुवात झाली.
योजना कोणा द्वारे सुरू करण्यात आली?केंद्र सरकार.
योजनेचे डिपार्टमेंट.पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय.
योजनेचे उद्दिष्ट.आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळवून देणे.
लाभार्थीगरीब कुटुंबातील महिला
योजनेची अधिकृत वेबसाईटwww.pmuy.gov.in
टोल फ्री नंबर18002666696

कित्येक वर्षापासून आपल्या देशांमधील खेड्यापाड्यांमध्ये चुलीवरती स्वयंपाक केला जात होता. त्यामुळे स्वयंपाक करणाऱ्या महिलांना चुलीमधून निघणाऱ्या धुराचा त्रास सहन करावा लागतो आणि त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर पण होतो. चुलीवरती स्वयंपाक करण्यासाठी इंधन म्हणून लाकूड सेनाच्या गौर्या वापरल्या जातात. आणि या मधून निघणारा धूर अनेक आजारांचा मूळ आहे.

आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या कुटुंबाकडे गॅस सिलेंडर घेण्याइतके ही पैसे नसतात. त्यामुळे या समस्या मधून सुटका करण्यासाठी केंद्र सरकारने Pradhan Mantri Ujjwala Yojana सुरू केली. ही योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 01 मे 2016 रोजी सुरू करण्यात आली. या योजनेचे उद्दिष्ट म्हणजे गरीब कुटुंबांना मोफत गॅस उपलब्ध करून देणे हे आहे.

शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या बीपीएल कुटुंबांना लाभ दिला जातो. यासोबतच गरीब कुटुंबांना गॅस कनेक्शन उपलब्ध करून दिल्यावर 1600 रुपयांची आर्थिक मदतही केली जाते. जेणेकरून ते इतर आवश्यक गोष्टी विकत घेऊ शकतील. या योजनेची चांगली गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी नवीन गॅस सिलेंडर घेताना त्यावर सरकारकडून सबसिडी पण दिली जाते. या योजनेची सुरुवात सर्वात अगोदर उत्तर प्रदेश मधील बलिया या जिल्ह्यातून झाली होती.

Ujjwala Yojana 2.0

Ujjwala Yojan
Ujjwala Yojan

Pradhan Mantri Ujjwala Yojana चे महत्वाचे पॉईंट्स :

  1. देशांमधील दुर्गम भागातील महिलांच्या इंधन समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे.
  2. ही योजना केवळ दारिद्र रेषेखाली येणाऱ्या कुटुंबांसाठी आहे.
  3. सुरुवातीला योजनेमध्ये केवळ पाच कोटी कुटुंबांचा समावेश होता. परंतु योजनेच्या सुधारित आवृत्ती मध्ये कुटुंबांची संख्या वाढवण्यात आली आणि आत्तापर्यंत देशातील 08 कोटी लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
  4. या योजनेमध्ये बीपीएल कुटुंबांना अनुदानावर गॅस कनेक्शन दिले जातात.
  5. वर्षभरामध्ये 14.2 किलोचे तीन सिलेंडर सरकारकडून मोफत दिले जातात.
  6. या योजनेअंतर्गत जर कोणी पहिल्यांदा गॅस सिलेंडर आणि गॅस शेगडी खरेदी केली तर त्याला EMI सुविधा पण उपलब्ध करून दिली जाते.

Pradhan Mantri Ujjwala Yojana चा लाभ कोण कोण घेऊ शकतो?

  1. जे लोक SECC 2011 अंतर्गत सूचीबद्ध आहेत ते सर्व या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  2. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेमधील सर्व SC/ ST कुटुंबातील लोक पण या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  3. दारिद्र रेषेखाली येणारे कुटुंब.
  4. अंत्योदय योजनेत समाविष्ट असणारे कुटुंब.
  5. सर्वात मागासवर्गीय कुटुंब.
  6. बेटांवर राहणारे लोक.

Ujjwala Yojana Benefits

Pradhan Mantri Ujjwala Yojana चे फायदे :

  1. या योजनेमुळे स्वयंपाक करण्यासाठी जी लाकूडतोड व्हायची त्यात घट झाली आहे.
  2. महिलांना स्वयंपाक करताना धुराच्या होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळाली आहे.
  3. ज्या कुटुंबाकडे गॅस कनेक्शन घेण्यापुरते ही पैसे नव्हते त्यांना या योजनेद्वारे मोफत गॅस कनेक्शन मिळाले आहे.
Eligibility For Ujjwala Yojana

Pradhan Mantri Ujjwala Yojana साठी पात्रता :

  1. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार ही महिला असली पाहिजे.
  2. अर्ज करणाऱ्याचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असली पाहिजे.
  3. अर्जदाराची बँक अकाउंट असणे आवश्यक आहे.
  4. अर्जदाराचे आधीपासूनचे एलपीजी कनेक्शन नसले पाहिजे.
Pradhan Mantri Ujjwala Yojana Documents

आवश्यक कागदपत्रे :

  1. शहरीक्षेत्र किंवा ग्रामीण क्षेत्र याचे बीपीएल प्रमाणपत्र.
  2. आधार कार्ड किंवा मतदान कार्ड.
  3. बीपीएल रेशन कार्ड.
  4. मधील सर्व सदस्यांचे आधार क्रमांक.
  5. पासपोर्ट आकाराचे फोटो.
  6. जात प्रमाणपत्र.
  7. जनधन बँक खाते तपशील किंवा बँक पासबुक.
Ujjwala Yojana Registration

तुम्ही या योजने करिता ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता.

ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत :

  1. योजनेचा अर्ज हा तुम्ही अधिकृत वेबसाईट वरून डाऊनलोड करू शकता.
  2. त्यानंतर त्या अर्जावरती आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, तुमचे नाव, पत्ता इत्यादी आवश्यक माहिती व्यवस्थित भरा.
  3. अर्ज भरून झाल्यानंतर त्यासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे जोडा. आणि तुमच्या जवळच्या गॅस एजन्सीला सबमिट करा.
  4. तुमचा अर्ज सबमिट झाल्यानंतर तुम्ही दिलेल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर तुमचे एलपीजी गॅस कनेक्शन दहा ते पंधरा दिवसाच्या आत तुम्हाला दिले जाईल.

ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत :

  1. सर्वात अगोदर तुम्ही अधिकृत वेबसाईट वरती जा.
  2. आता तुमच्या समोर एक होम पेज ओपन होईल.
  3. त्यानंतर पेजवर तुम्हाला Apply for PMUY Connection या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  4. त्यानंतर तुमच्यासमोर तीन फोटो दिसतील. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार हवे ते कनेक्शन निवडू शकता.
  5. त्यामधील एक पर्याय निवडल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
  6. त्या पेज वरती तुम्हाला तुमची सर्व विचारलेली माहिती टाकावी लागेल.
  7. सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला तुमची आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  8. आणि सर्व प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला APPLY या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

अशाप्रकार तुम्ही या योजनेकरिता ऑफलाइन व ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

Ujjwala Yojan

आशा करतो की या लेखांमधून तुम्हाला योजनेची सर्व माहिती मिळाली असेल. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा. जर ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल आणि तुमच्या मित्रांमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये जर कोणी असेल ज्यांच्याकडे आजही गॅस कनेक्शन नाहीये. त्यांना ही माहिती लगेच शेअर करा. आणि सरकारच्या नवीन योजनांची माहिती पाहण्यासाठी https://bhartiera.com/ ला रोज भेट देत जा.

हेही वाचा :

Pradhan Mantri Mudra Yojana 2024: आता प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेद्वारे स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी मिळणार कर्ज! येथे पहा योजनेची पूर्ण माहिती

धन्यवाद!