Annasaheb Patil Loan Scheme Information in Marathi
मित्रांनो महाराष्ट्र शासनाद्वारे राबवली जाणाऱ्या Annasaheb Patil Loan Scheme च्या माध्यमातून तुम्हाला तब्बल 50 लाख पर्यंतचे लोन बिनव्याजी स्वरूपात मिळणार आहे. शासन सतत नवनवीन योजना राबावत असते. आणि त्यापैकीच एक म्हणजे अण्णासाहेब पाटील लोन योजना. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आर्थिक मदत करणे हा आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी या Annasaheb Patil Loan Scheme द्वारे तब्बल 50 लाख रुपया पर्यंत कर्ज दिले जाणार आहे. यात एक मोठी विशेष बाब म्हणजे व्याज स्वरूपात एक रुपया देखील घेतला जाणार नाही, 0% व्याज दरावर बिनव्याजी कर्ज शासन देणार आहे. त्यामुळे या योजनेचा फायदा तुम्ही नक्कीच घ्यायला पाहिजे. या योजनेची सर्व सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
मित्रांनो जर तुम्हाला अशाच नवनवीन योजनांच्या अपडेट हवे असतील तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
Annasaheb Patil Loan
योजनेचा तपशील :
योजनेचे नाव | Annasaheb Patil Loan Scheme (अण्णासाहेव पाटील लोन स्कीम) |
योजनेची सुरुवात | महाराष्ट्र शासनाने सूरु केली आहे. |
योजनेचा उद्देश | तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी कर्ज देणे |
योजनेतून होणार फायदा | 10 ते 50 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज. |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील तरुण नागरिक. |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन पद्धतीने. |
अधिकृत संकेतस्थळ | https://udyog.mahaswayam.gov.in/ |
Annasaheb Patil Loan Scheme Eligibility
4अण्णासाहेब पाटील लोन योजना पात्रता : या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पुढील पात्रता असणे आवश्यक आहे.
- या योजेसाठी अर्ज करणार उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा.
- पुरुष उमेदवाराचे वय हे जास्तीत जास्त 50 वर्षे असणे आवश्यक आहे.
- महिला उमेदवाराचे वय हे जास्तीत जास्त 55 वर्षे असणे आवशी आहे.
- पुरुष उमेदवार अर्जदार हे मराठा समाजातील असणे आवश्यक.
Annasaheb Patil Loan Scheme Benefit
- या योजनेचा फायदा म्हणजे तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा आगोदरचा व्यवसाय असेल तर तो वाढवण्यासाठी त्याचा विस्तार करण्यासाठी त्यांना 10 लाख ते 50 लाख रुपया पर्यंत कर्ज मिळणार आहे. हा सगळ्यात मोठा फायदा आहे.
- अर्जदाराला मिळणारे कर्ज हे मंडळाद्वारे बिनव्याजी दिले जाणार आहे, आणि कर्जावरील व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा द्वारे परतफेड केले जाणार आहे.
- या योजनेतून योजनेतून मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे तरुणांना नवनवीन व्यवसाय सुरुवात करण्यासाठी चांगला हातभार लागणार आहे.
- जर उमेदवाराने दिलेल्या मुदतीत कर्जाची परतफेड केली, किंवा मुदतीमध्ये हप्ते भरले तर व्यक्तीला कर्जावरील व्याजाची 12% रक्कम मिळणार आहे, सोबतच ही रक्कम लाभार्थी अर्जदाराच्या बँक खात्यावर दर महिन्याला जमा देखील केली जाणार आहे.
Annasaheb Patil Karj Yojana
Annasaheb Patil Loan Scheme Documents : मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पुढील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
योजनेसाठी अर्ज करताना लागणारे आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
- पॅन कार्ड
- वयाचा पुरावा
- जातीचा दाखला
- अर्जदाराचा फोटो
- चालू मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- तुम्ही जो व्यवसाय सुरू करणार आहात त्याचा अहवाल
बँकेतून लोन घेते वेळेस लागणारी आवश्यक कागदपत्रे :
- अर्जदाराचे आधार कार्ड
- लाईट बिल
- शिधापत्रिका
- व्यवसाय सुरू करण्यासाठी License
- बँक खाते स्टेटमेंट
- बँकेचा Cibil Score
- व्यवसाय अहवाल
- व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र
घेतलेल्या लोन चे हप्ते भरताना लागणारे कागदपत्रे :
- बँकेचे Loan Approval Latter
- बँक खात्याचे स्टेटमेंट
- व्यवसाय सुरू करण्यासाठी License
- व्यवसाय अहवाल
- सूरु केलेल्या व्यवसायाचा फोटो
How to Apply for Annasaheb Patil Loan Scheme
अशा पद्धतीने अर्ज करा :
- सर्वात अघोदर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अधिकृत या पोर्टल ला भेट द्या.
- त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमची नोंदणी करून घ्यायची आहे, त्यासाठी जी माहिती विचारली आहे, ती माहिती भरा, आणि साईट वर लॉगिन करा.
- त्यानंतर Home Page वरील अर्ज करण्यासाठी या पर्यायावर क्लिक करा, तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल. तेथे तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती अचूकपणे भरायची आहे.
- त्यानंतर फॉर्म मध्ये व्यवसायाची संपूर्ण माहिती भरा, सोबतच जी कागदपत्रे विचारली आहे, ती सर्व Soft Copy मध्ये अपलोड करा.
- अशा रीतीने तुम्ही तुमचा Annasaheb Patil Loan Scheme साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन पूर्ण करू शकता.
तुमचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जर तुम्ही योजनेसाठी पात्र ठरला तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. आणि तुम्हाला बँकेकडून लोन मंजूर होईल. अशा पद्धतीने तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता.
मित्रांनो ही माहिती तुमच्या इतर मित्रांसोबत पण शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या योजनेचा फायदा होईल. आणि जर तुम्हाला सरकारच्या अशाच नवनवीन योजनांच्या अपडेट हवे असतील तर https://bhartiera.com ला रोज भेट देत जा.
हेही वाचा :
Dr. Panjabrao Deshmukh Scholarship 2024: विद्यार्थ्यांना मिळत आहेत 30,000! पहा सविस्तर माहिती
धन्यवाद!
FAQ:
Annasaheb Patil Loan Scheme एकूण किती कर्ज मिळणार आहे?
या योजनेमधून तरुणांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी 10 लाख ते 50 लाख रुपये पर्यंत कर्ज मिळणार आहे.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.