Indian government banned 18 OTT Apps: सरकारने केला मोठा डिजिटल स्ट्राइक, 18 OTT ॲप्ससह 19 वेबसाइट्सवर बंदी!

Indian government banned 18 OTT Apps

Indian government banned 18 OTT Apps
Indian government banned 18 OTT Apps

मित्रांनो केंद्र सरकारने पुन्हा एकदा खूप मोठा डिजिटल स्ट्राइक केला आहे आणि या स्ट्राइक मध्यए तब्बल 18 OTT ॲप्स (Indian government banned 18 OTT Apps) आणि 19 वेबसाइट्स तसेच  10 ॲप्ससह 57 सोशल मीडिया हँडलवर बंदी घातली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या प्लॅटफॉर्मला अनेक वेळा इशारे दिले होते. हे प्लॅटफॉर्म आयटी कायद्याच्या नियमांचे वारंवार उल्लंघन करत होते. त्यामुळे अखेर शेवटी सरकारने हे मोठे पाऊल उचलले आहे. या अप्प्स व वेबसाइट ची माहीती पुढे दिली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने हे अप्प्स व वेबसाइट बंद करण्याचे मुख्य कारण सांगितले की, या OTT प्लॅटफॉर्मवर अश्लील मजकूर दाखवला जात आहे. हे ॲप्स Google Play Store आणि Apple App Store वरून काढून टाकण्यात आले आहेत. अहवालानुसार, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या 18 OTT प्लॅटफॉर्मवर गलिच्छ सामग्री काढून टाकण्यासाठी अनेक इशारे दिले होते. तरी पण त्यामध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा न झाल्यामुळे असा निर्णय घेण्यात आला आहे.  

बंद करण्यात आलेल्या OTT अप्प्स लिस्ट (Indian government banned 18 OTT Apps List) :

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्ले स्टोअर वरुण काढण्यात आलेल्या 18 OTT ॲप्समध्ये Dreams Films, Voovi, Yessma, Uncut Adda, TriFlicks, X Prime, Neon PrimePlay इत्यादि अप्प्स चा समावेश आहे.

या बंद केलेल्या 18 OTT ॲप्सशिवाय केंद्र सरकारने 19 वेबसाइट आणि 10 ॲप्सवरही बंदी घातली आहे. या 10 ॲप्सपैकी 7 ॲप्स Google Play Store वरून आणि 3 ॲप ॲपल ॲप स्टोअरवरून काढून टाकण्यात आले आहेत. एवढेच नाही तर अश्लील मजकूर असलेल्या 57 सोशल मीडिया अकाउंटवरही कारवाई करण्यात आली आहे.

सरकारचे म्हणणे आहे की या ॲप्स आणि प्लॅटफॉर्मवर ही बंदी IT कायदा 2000 च्या कलम 67 आणि 67A, IPC च्या कलम 292 आणि IRWA (Indecent Representation of Women Prohibition Act) 1986 च्या कलम 4 अंतर्गत करण्यात आली आहे.

Swadhar Yojana: विद्यार्थ्यांना मिळणार 51,000 रुपयांची स्कॉलरशिप! 15 मार्च शेवटची तारीख! येथे करा अर्ज

सोशल मीडिया चॅनेलही बंद केले (Indian government banned 18 OTT Apps List):

या बंदी घातलेल्या ॲप्सपैकी एक ॲप तर असे होते ज्याचे गुगल प्ले स्टोअरवर 1 कोटींहून अधिक डाउनलोड झाले होते. त्याच वेळी, दोन ॲप्स 50 लाखांहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले. हे ॲप्स फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स आणि यूट्यूब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अश्लील सामग्री असलेल्या चित्रपटांचे ट्रेलर प्रसारित करत होते. अशी 57 सोशल मीडिया हँडलही ब्लॉक करण्यात आली आहेत फेसबुकवरील 12 चॅनल, इंस्टाग्रामचे 17, एक्सचे 16 आणि यूट्यूबचे 12 चॅनल या सामग्रीसह ब्लॉक (Indian government banned 18 OTT Apps) करण्यात आले आहेत.

मित्रांनो अशाच लेटेस्ट न्यूज अपडेट पाहण्यासाठी आपल्या अधिकृत वेबसाइट ला आवर्जून भेट देत जा.

धन्यवाद!

National Creator’s Award 2024 : See Full Winner List