Maharashtra Kesari 2023 : सिकंदर शेख ठरला नवा महाराष्ट्र केसरी! शिवराज राक्षेचा पराभव करून जिंकली चांदीची गदा

Maharashtra Kesari 2023

Maharashtra Kesari 2023
Maharashtra Kesari 2023

मित्रांनो पुण्यामधल्या फुलगाव मध्ये सुरू असलेल्या Maharashtra Kesari 2023 कुस्ती स्पर्धेचा आज निकाल हाती आला आहे. या स्पर्धेसाठी 36 जिल्हे आणि सहा महानगरपालिकेचे 42 संघ सहभागी झाले होते. सिकंदर शेख ने शिवराज राक्षेला आभाळ दाखवत महाराष्ट्र केसरी हा पुरस्कार जिंकला. त्यावेळेस सिकंदर शेख ने मिळवलेली सन्मानाची चांदीची गदा उंचावत्तेतील सर्व उपस्थित त्यांना अभिवादन केला आणि आपला विजय मोठ्या थाटात साजरा केला. आणि शिकंदर शेख हा 66 वा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरलाय.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

शिवराज राक्षेला दाखवला आभाळ : या Maharashtra Kesari 2023 स्पर्धेची अंतिम फेरी खूप महत्त्वाची होती. कारण या फेरीमध्ये सिकंदर शेख सोबत शिवराज राक्षे कुस्ती खेळणार होता. तसे बघितले तर सिकंदरचे पारडे जड वाटत होते पण शिवराज हा त्याला आव्हान देईल असं पण वाटत होतं. पण आक्रमक कुस्ती खेळणाऱ्या सिकंदर पुढे शिवराज राक्षेचा निभाव लागला नाही आणि लढत सुरू झाल्यानंतर 5.37 व्या सेकंदाला सिकंदरने झोळी डाव घेत शिवरायाला उचलून खाली घेतल्या आणि चिटपट करून विजय मिळवला.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

माती विभागातून संदीप मोटेचा पराभव केल्यानंतर शिकंदर शेख हा अंतिम फेरीमध्ये आला होता. आणि शिवराज राक्षस गादी विभागामधून हर्षद कोकाटे ला पराभवाची धूळ चारून अंतिम फेरीमध्ये आला होता. दुसऱ्या वेळेस महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीमध्ये आला होता. सिकंदर शेख आणि शिवराज राक्षेमध्ये जी लढत झाली ती एकदम चुरशीची होती. पण या लढतीमध्ये सिकंदरने शिवराजला आभाळ दाखवला आणि महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपलं नाव कोरल.

Maharashtra Kesari

यावर्षी झालेल्या Maharashtra Kesari 2023 स्पर्धेमध्ये 36 जिल्हे आणि 06 महानगरपालिका अशी एकूण 42 संघ सहभागी झाले होते. एका कुस्ती संघामधील गादी विभागातील 10 आणि माती विभागामधील 10 असे वीस कुस्तीगीर तसेच 02 कुस्ती मार्गदर्शक आणि एक संघ व्यवस्थापक असे एकूण 23 जण सहभागी होते.

या Maharashtra Kesari 2023 कुस्ती स्पर्धेमध्ये एकूण 840 कुस्तीगीर, 84 कुस्ती मार्गदर्शक, आणि 42 व्यवस्थापक, 80 पंच आणि 50 पदाधिकारी असे एकूण 1100 जणांचा समावेश होता.

Maharashtra Kesari 2023 Winner

Maharashtra Kesari 2023
Maharashtra Kesari 2023

अवघ्या साडेपाच सेकंदामध्ये 66 महाराष्ट्र केसरीचा पुरस्कार पटकावला : कोल्हापूर ज्याला आपण कुस्तीचे पंढरपूर देखील म्हणतो तेथील गंगावेस तालमीमध्ये मेहनत घेणाऱ्या सिकंदर शेख ने अवघ्या साडेपाच सेकंदामध्ये 66 महाराष्ट्र केसरीचा पुरस्कार पटकावला. सिकंदर शेख ने शिवराज राक्षेला आभाळ दाखवत महाराष्ट्र केसरी हा पुरस्कार जिंकला. शिकंदर शेख हा 66 वा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरलाय.

पारितोषिक वितरणाच्या वेळेस महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, मुरलीधर मोहोळ, स्वागताध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सदस्य प्रदीप कंद, कुस्ती संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, विलास कथुरे, योगेश दोडके हे यावेळी उपस्थित होते. विजय झालेल्या सिकंदर ला थार गाडी, चांदीची गदा हे बक्षीस देण्यात आलं. आणि उपविजेता ठरलेला शिवराज राक्षे हा ट्रॅक्टरचा मानकरी ठरला.

Maharashtra Kesari List

हे आहेत आतापर्यंतचे महाराष्ट्र केसरी :

 • 1) पैलवान दिनकर दहय़ारी (औरंगाबाद, 1961)
 •  2) पैलवान भगवान मोरे (धुळे, 1962),
 •  3) पैलवान गणपतराव खेडकर (अमरावती, 1964), 
 • 4) पैलवान गणपतराव खेडकर (नाशिक, 1965), 
 • 5) पैलवान दीनानाथ सिंग (मुंबई, 1966), 
 • 6) पैलवान चंबा मुतनाळ (खामगाव, 1976), 
 • 7) पैलवान चंबा मुतनाळ (नागपूर, 1968), 
 • 8) पैलवान हरिश्चंद्र बिराजदार (लातूर, 1969), 
 • 9) पैलवान दादू चौगुले (पुणे, 1070), 
 • 10) पैलवान दादू चौगुले (अलिबाग, 1071), 
 • 11) पैलवान लक्ष्मण वडार (कोल्हापूर, 1972), 
 • 12) पैलवान लक्ष्मण वडार (अकोला, 1973), 
 • 13) पैलवान युवराज पाटील (ठाणे, 1974), 
 • 14) पैलवान रघुनाथ पवार (चंद्रपूर, 1975), 
 • 15) पैलवान हिरामण बनकर (अकलूज, 1976),
 • 16) पैलवान आप्पासाहेब कदम (मुंबई, 1978), 
 • 17) पैलवान शिवाजीराव पाचपुते (नाशिक, 1979), 
 • 18) पैलवान इस्माईल शेख (खोपोली, 1980), 
 • 19) पैलवान बापू लोखंडे (नागपूर, 1981), 
 • 20) पैलवान संभाजी पाटील (बीड, 1982), 
 • 21) पैलवान सरदार खुशहाल (पुणे, 1983),
 • 22) पैलवान नामदेव मोळे (सांगली, 1984), 
 • 23) पैलवान विष्णूजी जोशीलकर (पिंपरी चिंचवड, 1985), 
 • 24) पैलवान गुलाब बर्डे (सोलापूर, 1986), 
 • 25) पैलवान तानाजी बनकर (नागपूर, 1987), 
 • 26) पैलवान रावसाहेब मगर (सोलापूर, 1988), 
 • 27) पैलवान आप्पालाल शेख (सोलापूर, 1992), 
 • 28) पैलवान उदयराज जाधव (पुणे, 1993),
 •  29) पैलवान संजय पाटील (अकोला, 1994-95), 
 • 30) पैलवान शिवाजी केकाण (नाशिक, 1995-96), 
 • 31) पैलवान अशोक शिर्के (वर्धा, 1996-97), 
 • 32) पैलवान गोरखनाथ सरक (नागपूर,1997-98), 
 • 33) पैलवान धनाजी फडतरे (पुणे, 1998-99), 
 • 34) पैलवान विनोद चौगुले (खामगाव, 1999-2000), 
 • 35) पैलवान राहुल काळभोर (नांदेड, 2001), 
 • 36) पैलवान मुन्नालाल शेख (जालना, 2001-02), 
 • 37) पैलवान दत्तात्रय गायकवाड (यवतमाळ, 2002-03), 
 • 38) पैलवान चंद्रहास निमगिरे (वाशी, 2003-04), 
 • 39) पैलवान सईद चाउस (इंदापूर, 2004-05),
 •  40) पैलवान अमोल बुचडे (बारामती, 2005-06), 
 • 41) पैलवान चंद्रहार पाटील (औरंगाबाद, 2007), 
 • 42) पैलवान चंद्रहार पाटील (सांगली, 2008), 
 • 43) पैलवान विकी बनकर (सांगवी पिंपरी-चिंचवड, 2009), 
 • 44) पैलवान समाधान घोडके (रोहा, 2010), 
 • 45) पैलवान नरसिंग यादव (अकलूज – 2011), 
 • 46) पैलवान नरसिंग यादव (गोंदिया – 2012), 
 • 47) पैलवान नरसिंग यादव (भोसरी – 2013), 
 • 48) पैलवान विजय चौधरी (अहमदनगर-2014), 
 • 49) पैलवान विजय चौधरी (नागपूर-2015), 
 • 50) पैलवान विजय चौधरी (वारजे-2016), 
 • 51) पैलवान अभिजीत कटके (भूगाव-2017),
 •  52) पैलवान बाला रफीक शेख (जालना-2017), 
 • 53) पैलवान हर्षद सदगीर (म्हाळुंगे-बालेवाडी-2019), 
 • 54) पैलवान पृथ्वीराज पाटील (सातारा-2021-22).
 • 55) पैलवान सिकंदर राशीद शेख (सोलापूर – 2023)

Sikandar Shekh

Maharashtra Kesari 2023
Maharashtra Kesari 2023

नेमकं कोण आहे सिकंदर शेख : मित्रांनो सिकंदर शेख हा मूळ सोलापूर जिल्ह्यामधील मोहोळ या गावचा आहे. त्यांच्या घरामध्ये आजोबांच्या काळापासून कुस्तीची परंपरा आहे. आजोबा नंतर सिकंदर चे वडील रशीद शेख हे पण पैलवान की करायचे. आणि पुढे वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सिकंदर नेही कुस्ती खेळण्यास सुरुवात केली. आणि आज अखेर शेवटी सिकंदरा महाराष्ट्र केसरी या पुरस्काराचा मानकरी ठरला. सिकंदरचे वय केवळ 22 वर्ष आहे. आणि तो कोल्हापूर मधल्या गंगावेस तालमीचा पैलवान आहे.

घरची परिस्थिती हालाखीची असताना देखील त्याच्या आईवडिलांनी त्याला कुस्तीसाठी प्रोत्साहन दिल. सिकंदरने 2018 मध्येच मोहोळ या गावांमध्ये कुस्तीचा सराव सुरू केला होता. पण त्यावेळी त्याच्या वयाची जास्त पैलवान तालमीत नव्हते. त्यामुळे त्याच्या वडिलांनी व तेथील तालमीच्या वाजता जाणे त्याला कोल्हापूर मधल्या गंगावेस तालमीत पाठवण्याचा निर्णय घेतला. आणि मग तिथून पुढे खरी त्याच्या पैलवानगी ला सुरुवात झाली.

पहा महा मुकाबला : VIDEO SOURCE – MAHAKHEL KUSTI YOU TUBE CHANNEL

 • अशाच न्यूज अपडेट व्हाट्सअप मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा.

हेही वाचा :

Disadvantages of Mobile Phones : मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांमध्ये उद्भवत आहेत हे आजार! लवकर सोडवा लहान मुलांचे व्यसन

National Creator’s Award 2024 : See Full Winner List