Old Pension Scheme News
मित्रांनो राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही खूप महत्वाची महत्त्वाची अपडेट (Old Pension Scheme) आहे. कारण जे कर्मचारी शासकीय सेवेत कार्यरत आहेत त्यांच्यासाठी शिंदे सरकार खूप महत्वाचे निर्णय घेणार आहे. शासकीय कर्मचारी गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा करत होते. त्यांच्या माघण्यांसाठी कित्येक वेळा आंदोलने पण केली आहेत. आणि त्यामुळेच आता शिंदे सरकार या प्रलंबित मागण्या सोडवण्याच्या तयारीत आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!एका अपडेट नुसार येणाऱ्या 27 फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय दिला जाईल अशी शक्यता आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी त्यांच्या २ प्रलंबित मागण्या सोडवल्या जातील, असे संकेत आहेत. या माघण्यामध्ये १७ लाख कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर चला पाहुयात की सरकार नेमक कोणत्या माघण्या पूर्ण करणार आहे.
- जुनी पेंशन योजना (Old Pension Scheme) :
सरकार जो मुख्य निर्णय घेणार आहे त्यामधला एक म्हणजे, जुन्या पेन्शन योजनेसाठी (Old Pension Scheme) 2023 मध्ये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप केला होता. त्यावेळी तीन सदस्य समितीची स्थापना करण्यात आली होती. दरम्यान या समितीचा अहवाल आता राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. तसेच राज्य शासन आणि समितीतील पदाधिकारी यांच्यात चर्चा देखील झाली. त्यामुळे आता जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सरकार महत्वाचा निर्णय घेईल असा अंदाज आहे. याबाबतदेखील आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय घेतला जाणार आहे. राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन जशी आहे तशी लागू व्हावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली होती. आता कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर सकारात्मक निर्णय देऊन नवीन पेन्शन योजनेत बदल होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Old Pension Scheme Latest News
- सेवा निवृत्ती वयामध्ये 02 वर्षे वाढ :
यापूर्वी सरकारने कृषी विभागांतर्गत कृषी विद्यापीठातील शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वय 02 वर्षांनी कमी केले होते. त्यामुळे सेवानिवृत्तीचे वय 62 वरून 60 करण्यात आले होते. या निर्णयावर खूप लोकांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. याद्वारे अस समजल की काही लोक या निर्णयावर सहमत होते तर काही विरोधात. दरम्यान, महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत असलेल्या अ, ब आणि क संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 58 वर्ष आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 02 वर्षांनी वाढवून 60 वर्षे करावे, अशी शासकीय कर्मचाऱ्यांनी मागणी केली आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय आणि देशातील काही राज्यांमध्ये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वयदेखील ६० वर्षे व्हावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. यांनी या माघणीला Maharashtra Government सकारात्मक निर्णय घेईल अशी आशा कर्मचाऱ्यांना आहे. याबाबतचा प्रस्ताव देखील राज्य शासनाने तयार केला आहे. जो अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर करून यावर ठोस निर्णय घेतला जाईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे आता 27 फेब्रुवारी ला होणाऱ्या अर्थसंकल्पकडे सगळ्या कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
नवीन अपडेट साठी ग्रुप जॉईन करा – JOIN
Old Pension Scheme ही माहिती तुमच्या मित्रांसोबत तसेच नतेवाईकांबरोबर नक्की शेअर करा जे शासकीय कर्मचारी आहेत. जेणेकरून त्यांना या न्यूज बद्दल माहिती होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.