Pandhari sheth Phadke News: पंढरीनाथ फडके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन!

मुंबई : महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष Pandhari sheth Phadke यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे. पनवेलच्या विहीघरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं नाव घेतलं की अंगावर किलोभर सोनं, गाडीच्या टपावर बसून वरात आणि बादल बैलाची क्रेझ हे सगळं चित्र डोळ्यासमोर यायचं. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेवर तसेच फडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Pandhari sheth Phadke

Pandhari sheth Phadke
Pandhari sheth Phadke

पंढरीनाथ फडके बद्दल :

गळ्यात किलोभरं सोनं, ऑडी कार आणि खिश्यात पिस्तुल घेऊन नेहमी एंट्री करणारे. हे नाव पनवेल आणि आजबाजूच्या परिसरात प्रत्येकांना तोंडपाठ आहे. पनवेलमध्ये बैलगाडा शर्यत म्हणजेच पंढरीशेठ असं समीकरण बनलं होतं. पण या नावासोबत अनेक वाद आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीही जोडली गेली होती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र बैलगाडा शर्यंत असोसिएशनचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांचं आज दुपारी निधन झालं आहे. पंढरीनाथ फडके हे मुळचे पनवेल येथील विहिघर गावातील राहणार होते. बैलगाडी शर्यतीचे ते प्रचंड शौकीन होते त्यांनी कित्येक शर्यती देखील जिंकल्या होत्या. पंढरीनाथ फडके हे आधी शेकाप पक्षात सक्रिय होते. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. 1986 पासून ते बैलगाडा शर्यतीचा नाद लागला. बैलगाडा शर्यतीतून अमाप पैसा कमावला. बैलगाडा शर्यतीमधील सर्वात जास्त शर्यत जिंकलेला आणि सर्वात नामांकित ‘बादल’ बैल ही त्यांच्याकडे आहे. अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडिया वर देखील त्यांची चांगली क्रेझ वाढली होती.

पण आज घडलेल्या घटनेने संपूर्ण बैलगाडा संघटना तसेच पूर्ण महाराष्ट्र दुखात आहे.

National Creator’s Award 2024 : See Full Winner List