Pradhan Mantri Jan Dhan Yojana
Table of Contents
मित्रांनो भारत सरकार वेळोवेळी खूप सारे योजना तयार करते. तर अशीच एक Pradhan Mantri Jan Dhan Yojana बद्दल पूर्ण माहिती बघणार आहोत. खूप वेळा सरकार अशा योजना आणते ज्या योजनाद्वारे नागरिकांना खूप फायदा होतो. तरी या योजनेद्वारे तुम्हाला कशा प्रकारे फायदा होऊ शकतो याची माहिती पुढे सविस्तर दिली आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!पण त्या अगोदर तुम्हाला जर अशाच येणाऱ्या नवीन योजनांचे अपडेट्स व्हाट्सअप वरती हवे असतील तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा. ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.
Jan Dhan Yojana
Pradhan Mantri Jan Dhan Yojana ही 15 ऑगस्ट 2014 रोजी सुरू करण्यात आली होती. आणि या योजनेने आतापर्यंत देशातील कित्येक नागरिकांना फायदा झाला आहे.
योजनेचे नाव : Pradhan Mantri Jan Dhan Yojana.
योजना कोणी सुरू केली : केंद्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे.
योजना सुरू झालेले वर्ष : 2014 या वर्षी योजना सुरू झाली होती.
लाभार्थी : देशातील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
Jan Dhan Yojana Helpline Number
मित्रांनो जर तुम्हाला या योजनेबद्दल काही शंका असेल किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही खाली दिलेल्या हेल्पलाइन नंबर वरती कॉल करून विचारू शकता.
हेल्पलाइन नंबर : 18001801111, 1800110001
PM Jan Dhan Yojana
प्रधानमंत्री जनधन योजना ही नेमकं काय आहे चला बघूया.
मित्रांनो या योजनेद्वारे देशातील गरीब लोकांचे खाते राष्ट्रीयकृत बँका आणि पोस्ट ऑफिस मध्ये झिरो अकाऊंट बॅलन्स सह उघडण्यात येतात. आणि या बँक खात्यांना 1,00,000/- रुपयांचा अपघात विमा देखील दिला जातो.
प्रधानमंत्री जनधन योजनेचे उद्दिष्टे :
- भारतामधील प्रत्येक नागरिकाचे बँक खाते उघडणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
- भारतामधील प्रत्येक नागरिकाचे बँक खाते असले पाहिजे जेणेकरून त्यांना सुरक्षित आणि चांगल्या प्रकारच्या आर्थिक जीवन जगण्याचा लाभ मिळू शकतो.
- . सर्व मागासवर्गीय लोक आणि इतर गरीब लोकांसाठी झिरो बॅलन्स अकाउंट खाते उघडणे हा या योजनेचा उद्देश आहे.
PradhanMantri Jan Dhan Yojana
Pradhan Mantri Jan Dhan Yojana चे वैशिष्ट्ये :
- आर्थिक साक्षरता कार्यक्रम : योजनेचा लाभ घेणार आहेत त्यांना बँकिंग सुविधा आणि बँकिंग धोरणामध्ये प्रवेश कसा करायचा याबद्दल शिकवले जाईल जेणेकरून त्यांना बँकिंग सुविधा चालवताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- मूलभूत बँकिंग सुविधा : या योजनेअंतर्गत देशामधील प्रत्येक घरामध्ये बँक अकाउंट उघडण्याचे धोरण लक्षात घेण्यात आले आहे.
- सुलभ बँकिंग सुविधा : या योजनेच्या मदतीने पाच किलोमीटरच्या परिघात तब्बल 2,000 घरे समाविष्ट करण्यात येतील आणि त्यांना लव बँकिंग सुविधांचा लाभ दिला जाईल.
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना : या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या व्यक्तीला रुपये 2,00,000/- चा अपघात विमा दिला जाईल. यासाठी त्यांना फक्त प्रत्येक वर्षी 12/- रुपये भरावे लागतील.
- रुपे डेबिट कार्ड : या योजनेअंतर्गत व्यक्तीचे खाते उघडल्यानंतर त्यांना एक रुपे डेबिट कार्ड दिले जाईल. ज्यामध्ये 2,00,000 रुपयांचा अपघात विमा समाविष्ट असेल.
- आयुर्विमा : यामध्ये लाभार्थ्यांना 30000 रुपयांचा जीवन विमा दिला जाणार आहे.
तर मित्रांनो इत्यादी या योजनेची वैशिष्ट्ये आहेत.
Pradhan Mantri Jan Dhan Yojana Benefits
Pradhan Mantri Jan Dhan Yojana Benefits (प्रधानमंत्री जनधन योजनेचे फायदे) :
- ही योजना देशातील मागासवर्गीय व गरीब नागरिकांसाठी खूप फायदेशीर आहे.
- विशेषता म्हणजे ज्या नागरिकांचे बँक मध्ये अकाउंट नाही अशा गरीब लोकांना या योजनेद्वारे झिरो बॅलन्स अकाउंट मिळणार आहे.
- या योजनेद्वारे अर्जदारांना सरकारकडून अपघात विमा, आयुर्विमा, कर्जाची मदत यांसारखा लाभ मिळणार आहे.
Jan Dhan Yojana Account Opening Online
प्रधानमंत्री जनधन योजने करिता पात्रता काय आहे चला बघूया.
- या योजने करिता पात्र होण्यासाठी अर्जदाराचे अगोदर कोणत्याही बँक अकाउंट असले पाहिजे. हे त्याचे/तिचे पहिलेच बँक खाते असले पाहिजे.
- योजनेसाठी पात्र होण्याकरिता अर्जदाराचे वय हे 18 वर्षे ते 59 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.
- त्यांच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत किंवा त्यांच्या कुटुंबामधील कमावते सदस्य आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- जे अर्जदार भारतामधील केंद्र किंवा राज्य सरकारी कर्मचारी आहेत त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
- जर अर्जदार भारतातील कोणत्याही प्रकारचे कर भरणारे असतील तर त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- अर्जदार जर केंद्र सरकार किंवा राज्य सरकारचे सेवानिवृत्त कर्मचारी असतील तर त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
Pradhan Mantri Jan Dhan Yojana Required Document
Pradhan Mantri Jan Dhan Yojana या योजनेसाठी कोणती कागदपत्रे हवे आहेत हे पडू शकता.
जनधन योजना कागदपत्रे:
- आधार कार्ड.
- पत्ता पुरावा प्रमाणपत्र.
- ड्रायव्हिंग लायसन.
- ओळख पुरावा प्रमाणपत्र.
- पॅन कार्ड.
- पासपोर्ट आकाराचा एक फोटो.
- मोबाईल नंबर.
मित्रांनो जर तुम्हाला या योजने करिता अर्ज करायचा असेल तर यासाठी कोणती अधिकृत वेबसाईट नाहीये. या योजनेअंतर्गत बँकेत खाते उघडले जाईल. परंतु तुम्ही इतर माहितीसाठी खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकता.
अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लिक करा.
Jan Dhan Yojana Account Opening Online
जर तुम्हाला Pradhan Mantri Jan Dhan Yojana या योजनेअंतर्गत खाते उघडायचे असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेला भेट देऊ शकता. तिथे तुम्हाला प्रधानमंत्री जनधन योजनेचा अर्ज मिळेल. तेथील कर्मचाऱ्याकडे या योजनेची चौकशी करून अर्ज मिळू शकतात.
Jan Dhan Yojana Account Opening
प्रधानमंत्री जनधन योजना अशा प्रकारे चालू करा :
- सर्वात अगोदर तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत जा.
- त्यानंतर जनधन योजनेचा अर्ज तिथल्या कर्मचाऱ्याकडून घ्या.
- त्या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.
- त्यानंतर तो फॉर्म बँक कर्मचाऱ्याकडे जमा करा.
- त्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट केला जाईल आणि तुमचे खाते प्रधानमंत्री जनधन योजनेसाठी उघडले जाईल.
जनधन योजनेअंतर्गत 3000 रुपयांचे पेन्शन कसे मिळवायचे? :
जर तुमचे खाते योजनेअंतर्गत उघडले असेल तर त्यासोबतच ते प्रधानमंत्री मानधन योजनेचे सदस्यत्व घेऊन तुम्ही 3000 रुपयांच्या मासिक पेन्शनचा लाभ घेऊ शकतात. ज्या अर्जदारांचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान आहे ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये पेन्शन सुरू झाल्यापासून ते वयाच्या 60 वर्षापर्यंत प्रीमियम भरावा लागेल. त्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला पेन्शन दिली जाईल. पेन्शनची रक्कम मी तुमच्या बचत खात्यामध्ये जमा केली जाईल.
नवीन नियम : या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना जो 30,000 रुपयांचा विमा मिळणार होता त्यामध्ये आता वाढ करण्यात येत आहे. आता लाभार्थ्यांना 35,000 रुपयांचा विमा दिला जाणार आहे.
या योजनेअंतर्गत तुमच्या खात्यामध्ये एक रुपया शिल्लक नसताना तुम्हाला तुमच्या खात्यामधून 10,000/- रुपये काढता येणार आहेत. त्यासोबतच तुम्हाला अनेक सुविधाही उपलब्ध होणार आहे.
ही माहिती तुमच्या मित्रांबरोबर व नातेवाईकांबरोबर नक्की शेअर करा जेणेकरून या योजनेचा त्यांना लाभ घेता येईल. आणि सरकारच्या येणाऱ्या अशाच नवीन योजनांच्या अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ ला रोज भेट देत जा.
हेही वाचा :
Pradhan Mantri Jan Dhan Yojana केव्हा सुरू झाली?
ही योजना 15 ऑगस्ट 2014 रोजी सुरू झाली होती.
प्रधानमंत्री जनधन योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?
या योजनेचा लाभ फक्त भारतीय नागरिक घेऊ शकतो.
प्रधानमंत्री जनधन योजना काय आहे?
या योजनेअंतर्गत देशातील मागासवर्गीय व गरीब नागरिकांचे झिरो बॅलन्स अकाउंट उघडणे आणि त्यांना सुरक्षित आणि चांगल्या प्रकारचे आर्थिक जीवन जगण्यास मदत करणे.
प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये जीवन विमा रक्कम किती दिली जाते?
या योजनेअंतर्गत रुपये 30,000/- जीवन विमा दिला जातो.