Types of GST in India 2024: भारतामधील GST चे प्रकार! तुम्हाला माहिती आहेत का

How Many Types of GST in India

Types of GST in India
Types of GST in India

सर्वात अघोदर GST म्हणजे काय वस्तू आणि सेवा कर (Goods and Services Tax). आणि या GST चे भारतामध्ये एकूण किती प्रकार (Types of GST in India) आहेत हे तुम्हाला या लेखामधून समजणार आहे. वस्तु कर आणि सेवा कर हा प्रामुख्याने वस्तू आणि सेवा यांच्या खरेदी वर आकारला जातो. केंद्र सरकारने चार वर्षांपूर्वी GST लागू करण्याची घोषणा केली होती. भारतातील GST मध्ये चार टॅक्स स्लॅब आहेत 5%, 12%, 18%, आणि 28% यासह अत्यावश्यक वस्तूंसाठी विशेष कमी दर आणि काही लक्झरी वस्तूंसाठी विशेष उच्च दर आहेत.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

How Many Types of GST in India या बद्दलची सर्व डिटेल्स पुढे दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि जर तुम्हाला अशाच Finance बद्दलच्या गोष्टी जाणून घ्यायला आवडत असेल तर आमचा ग्रुप जॉइन करा. जेणेकरून रोज नवीन माहिती तुम्हाला मिळत राहील. ग्रुप ची लिंक देखील खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

GST Full Form

Full Form of GST : GST चा फुल्ल फॉर्म Goods and Services Tax असा आहे.

Types of GST in India

मित्रांनो भारतामध्ये GST चे मुख्यता चार प्रकार पडतात व इतर दोन प्रकार पडतात त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

  • CGST (Central Goods and Services Tax) :

या कर प्रकाराला केंद्रीय वस्तू आणि सेवा कर असे म्हणतात. एका राज्यात खरेदी केल्यानंतर त्याच राज्यात विकल्या जाणार्‍या वस्तू किंवा सेवांवर सीजीएसटी (CGST-Central Goods and Services Tax) आकारला जातो. जेव्हा एखादा दुकानदार तुमच्याकडून एसजीएसटी शुल्क आकारतो, त्याच वेळी तो तुमच्याकडून सीजीएसटी देखील आकारतो. आता प्रत्येक वस्तू ही निर्धारित केलेल्या कर दराखाली येते. म्हणजे समजा एखाद्या वस्तूवरील कराचा दर हा 28 टक्के आहे. तर त्यातील 14 टक्के कर हा एसजीएसटी आणि उर्वरित 14 टक्के कर हा सीजीएसटी म्हणून आकारला जातो. आणि हा कर केंद्र सरकारकडे जातो.

  • SGST (State Goods and Services Tax) :

या कर प्रकाराला राज्य वस्तू आणि सेवा कर असे म्हणतात. जेव्हा कोणतीही वस्तू किंवा सेवा एकाच राज्यात पुरवली जाते, तेव्हा त्यावर SGST (State Goods and Services Tax) आकारला जातो. हा कर राज्याला मिळतो. जीएसटी कायद्यांतर्गत हा कर राज्यातील सर्व वस्तूंच्या किंवा सेवांच्या खरेदी आणि विक्रीवर आकारला जातो. मात्र, यातून काही गोष्टींना सूट देण्यात आली आहे. एसजीएसटी लागू झाल्यानंतर राज्य सरकारकडून आकारण्यात येणारा व्हॅट (VAT), लक्झरी टॅक्स (Luxury Tax), करमणूक कर इत्यादी आकारल्या जाणाऱ्या इतर करांचे अस्तित्व बंद झाले आहे.

  • IGST (Integrated Goods and Services Tax) :

हा कर प्रकार म्हणजे एकात्मिक वस्तू आणि सेवा कर. जेव्हा एखादी वस्तू किंवा सेवा एका राज्यातून दुसर्‍या राज्यात पुरविली जाते तेव्हा IGST (Integrated Goods and Services Tax) लागू होतो. एखाद्या वस्तू किंवा सेवांची विक्री, हस्तांतरण, विनिमय यांसह इत्यादींचा पुरवठा या अंतर्गत केला जातो. बर्‍याच वेळा व्यापारी एकाच राज्यात व्यवसाय करतात. पण त्यासाठी लागणारा माल हा इतर राज्यातून खरेदी केला जातो. त्यावेळी अशा परिस्थितीत त्याला दुसर्‍या राज्यात खरेदी केलेल्या वस्तूंवर (IGST) हा कर द्यावा लागतो.

  • UTGST (Union Territory Goods and Service Tax) :

हा कर प्रकार म्हणजे केंद्रशासित प्रदेश वस्तू आणि सेवा कर. जो केंद्रशासित प्रदेशातील वस्तू व सेवांवर आकारला जातो.

मित्रांनो या व्यतिरिक्त GST आणखीन दोन प्रकार पडतात याची माहिती पुढे दिली आहे.

Types of GST in India
Types of GST in India
  1. CGST (Compensation Cess) : हा GST कर केंद्र सरकार द्वारे वस्तू आणि सेवांवर आकारते आणि तो राज्यांना GST मधील महसूल नुकसान भरपाईसाठी दिला जातो.
  2. IGST (Compensation Cess) : केंद्र सरकार एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर हा कर लागू करते आणि तो राज्यांना GST मधील महसूल नुकसान भरपाईसाठी दिला जातो.

तर मित्रांनो हे आहेत भारतातील जीएसटी चे प्रकार (Types of GST in India). ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण अगदी सोप्या भाषेमध्ये जीएसटी चे प्रकार समजतील. आणि अशाच फायनान्स (Finance) रिलेटेड गोष्टी जाणून घेण्यासाठी आमचा ग्रुप नक्की जॉईन करा आणि https://bhartiera.com ला रोज भेट देत जा.

आमचा ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा – Join

हेही वाचा :

Pradhan Mantri Matru Vandana Yojana: बाळाचा जन्म होताच खात्यात जमा होणार 6000 रुपये! पहा योजनेची पूर्ण माहिती

FAQ:

जीएसटी म्हणजे काय (Meaning of GST)?

जीएसटी म्हणजे Goods and Services Tax. जो वस्तू आणि सेवांवर आकारला जातो.

जीएसटीचे भारतामध्ये किती प्रकार आहेत (How Many Types of GST in India)?

जीएसटीचे भारतामध्ये मुख्य चार प्रकार पडतात.
1. CGST (Central Goods and Services Tax).
2. SGST (State Goods and Services Tax).
3. IGST (Integrated Goods and Services Tax).
4. UTGST (Union Territory Goods and Service Tax).