Types of Mutual Funds in India
मित्रांनो तुम्हाला म्यूचुअल फंड म्हणजे काय (What is the mutual fund in Marathi) आणि भारतामध्ये म्यूचुअल फंड चे प्रकार (Types of Mutual Funds in India) याची सर्व सविस्तर माहिती या लेखामद्धे दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती शेवटपर्यंत वाचा.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!म्यूचुअल फंड म्हणजे काय (What is the mutual fund in Marathi) :
म्यूचुअल फंड म्हणजे एक प्रकारची गुंतवणूक योजना आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फंड असतात त्याची सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत. तर या गुंतवणूक योजनेमद्धे लोग आपले पैसे गुंतवतात नंतर ते गुंतवलेले पैसे ती योजना वेगवेगळ्या मालमत्तेमध्ये गुंतवते. तसेच बहुतेक गुंतवणूकदारांकडून जमा केलेले पैसे इतर शेअर्स आणि मनी मार्केट यांसारख्या आर्थिक सिक्युरिटीज मध्ये गुंतवले जातात.
म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही अल्पमुदतीसाठी, मध्यम मुदतीसाठी किंवा दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करू शकता. तर चला आता आपण भारतामध्ये म्युच्युअल फंडचे किती प्रकार आहेत (Types of Mutual Funds in India) हे सविस्तर पाहूया.
अशाच माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा – JOIN
Types of Mutual Funds
मित्रांनो म्यूचुअल फंड्ज चे आपण दोन प्रकारामध्ये (Types of Mutual Funds in India) विभाग करू शकतो. म्हणजे मालमत्तेच्या आधारावर आणि संरचनेच्या आधारावर
मालमत्ता वर्गाच्या आधारावरील म्यूचुअल फंड्ज (Types of Mutual Funds in India)
ही असे फंड्ज आहेत जे वेगवेगळ्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक करतात. म्हणजेच तुम्ही जे पैसे गुंतवता ते वेगवेगळ्या स्टॉक्स मध्ये लावले जातात. मालमत्ता वर्गाच्या आधारवारील फंड्ज ना आपण पुढील भागांमध्ये विभागू शकतो.
- डेड फंड (Dead Fund) : डेट्स फंड हे म्युच्युअल फंड असतात जे फिक्स रिटर्न्स देतात. डेट्स फंड हे व्यावसायिक कागद, ट्रेझरी बिले, कॉर्पोरेट बाँड तसेच इतर अनेक मनी मार्केट साधनांमध्ये गुंतवणूक करतात. कर्जाच्या साधनांद्वारे, कंपन्या किंवा सरकार या फंड मधून पैसे उधार घेतात आणि ते निश्चित व्याज दराने परत करतात. या सर्व सिक्युरिटीजमध्ये एक निश्चित व्याज दर असतो. त्यांची परिपक्वता तारीखही निश्चित आहे. डेट फंडांना त्यांच्या निश्चित परताव्यामुळे निश्चित उत्पन्न सिक्युरिटीज असेही म्हटले जा
- लिक्विड फंड (Liquid Fund) : हा एक असा फंड आहे ज्यामधून तुम्ही कोणत्याही वेळी केलेली गुंतवणूक काढू शकता. तुम्ही असा अर्ज केल्यानंतर 24 तासांच्या आत तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतात. लिक्विड फंड हा एक प्रकारचा डेट फंड आहे. आपण लिक्विड फंडांमध्ये कमीतकमी 3 दिवसांसाठी गुंतवणूक करू शकता. ज्या सिक्युरिटीजमध्ये लिक्विड फंड गुंतवणूक करतात त्यांची परिपक्वता ही 91 दिवसांपर्यंत असते. लिक्विड फंड डेट फंड श्रेणीमध्ये सर्वात कमी परतावा देतात परंतु ते अधिक सुरक्षित देखील असतात. लिक्विड फंडहे बचत खाते आणि बँक एफडीसाठी सर्वोत्तम पर्याय आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचे अतिरिक्त पैसे लिक्विड फंडात ठेवू शकता. जेणेकरून तुमचे पैसे एकदम सुरक्षित राहतात.
- इक्विटी किंवा ग्रोथ फंड्स (Equity or Growth Funds) :
इक्विटीकिंवाग्रोथफंड्स (Equity or Growth Funds) हे प्रामुख्याने इक्विटीज मध्ये म्हणजेच विविध कंपनीच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करतात. यांचे सर्वात पहिले उद्दिष्ट म्हणजे संपत्ती निर्माण करणे हे असते. आणि त्यांच्यामध्ये मोठे परतावे मिळवण्याची क्षमता असते आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ते सर्वोत्तम असतात त्यामुळे खूप लोग यामध्ये दीर्घ काळासाठी गुंतवणूक करतात. या फंड चे अनेक उदाहरणे आहेत. त्याची माहिती पुढे दिली आहे.
- लार्ज कॅप फंड (large cap Mutual funds) :
लार्ज कॅप फंड अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात ज्या कंपन्यांचा विस्तार खूप मोठा आहे.
- मिड कॅप फंड (Mid Cap Mutual Funds) :
हे अशा प्रकारचे फंड आहेत चे मध्यम प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात.
- स्मॉल कॅप फंड (Small Cap Mutual Funds) :
हे अशा प्रकारचे फंड आहेत चे लहान कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात.
- मल्टी कॅप फंड (multi cap mutual funds) :
हे अशा प्रकारचे फंड आहेत जे लहान आणि मोठ्या अशा दोन्ही प्रकारच्या कंपनीच्या स्टॉप मध्ये गुंतवणूक करतात. आणि त्यामुळेच हा फंड खूप लोकप्रिय पण आहे.
- थॅॅमॅटिक फंड (Thematic mutual funds) :
“थेमॅटिक” फंड्स म्हणजे असे फंड आहेत जे एका सामाईक थीम मध्येच गुंतवणूक करतात. उदा. इन्फ्रास्ट्रक्चर फंड्स जे अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात ज्यांना पायाभूत सुविधा विभागाच्या गुंतवणुकीतून लाभ होतो.
- ELLS फंड :
ईएलएसएस म्हणजे इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम आहे . ईएलएसएस ही एक योजना आहे जी इक्विटीमध्ये गुंतवणूक करते. ही योजना इक्विटी उन्मुख आहे. अलीकडच्या काळात लोकांमध्ये कर बचतीसाठी ईएलएसएस योजनेचा सराव वाढला आहे.
ELSS मध्ये गुंतवलेल्या पैशात 3 वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो. ईएलएसएसमध्ये तुम्ही केलेल्या 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर आयकर कलम 80 सी अंतर्गत सूट मिळते.
तर हे आहेत इक्विटी किंवा ग्रोथ फंड्सचे काही उदाहरणे (Types of Mutual Funds in India).
- हायब्रीड फंड (Hybrid Funds) :
हायब्रिड फंड श्रेणी अंतर्गत येणारी ही योजना आपले पैसे कर्ज आणि इक्विटि मध्ये गुंतवते. प्रत्येक संकरित निधीमध्ये इक्विटी आणि कर्जाचा वाटा वेगळा असतो.
या फंड चे मुख्य वैशिष्टे म्हणजे म्हणजे संतुलित पोर्टफोलिओ तयार करून गुटवणूक केलेल्या उमेदवारांना नियमित उत्पन्न देणे. हायब्रिड फंड डेट फंडांपेक्षा जास्त धोकादायक असतात परंतु इक्विटी फंडांपेक्षा कमी धोकादायक असतात.
हायब्रिड फंडांना इक्विटी ओरिएंटेड हायब्रिड फंड, डेट ओरिएंटेड हायब्रिड फंड, बॅलन्स्ड फंड, मासिक उत्पन्न योजना, आर्बिट्रेज फंड अशा विविध श्रेणींमध्ये विभागले जाऊ शकते.
- 1. Equity Oriented hybrid fund:
यामधील सुमारे 65% निधी वाटप इक्विटीमध्ये आणि उर्वरित डेट फंडांमध्ये गुंतवले जाते. या फंड मध्ये रिस्क थोडी जास्त आहे.
- 2. Debt Oriented hybrid fund:
या फंड मध्ये 60% निधी वाटप कर्ज आणि इक्विटीमध्ये ठेवला जातो. त्यामुळे कर्जाचा वाटा जास्त, परतावा कमी आणि जोखीम कमी.
- 3. Balanced fund:
बॅलन्स फंड हे वेगवेगळ्या मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणूक करतात, ज्यात इक्विटी, कर्ज, रोखे आणि इतर सिक्युरिटीज समाविष्ट आहेत. अशा प्रकारे, इक्विटी आणि कर्ज संतुलित निधीमध्ये संतुलित स्वरूपात ठेवले जातात, जे त्यांच्यामध्ये मध्यम जोखीम बाळगतात.
- 4. Monthly Income plans:
या प्रकारच्या योजनेमध्ये, 90% पर्यंत कर्जामध्ये गुंतवणूक केली जाते तर काही इक्विटीमध्ये. अशा प्रकारे, या योजना शुद्ध कर्ज योजनांपेक्षा किंचित जास्त परतावा देतात. इक्विटीचा वाटा खूपच लहान असल्याने तो एक मामूली जोखीम पातळी धारण करतो.
- 5. Arbitrage fund:
या प्रकारच्या फंडात, साठे एका बाजारात कमी किंमतीत खरेदी केले जातात आणि दुसऱ्या बाजारात जास्त किंमतीला विकले जातात. जसे रोख बाजारातून खरेदी करणे आणि ते डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये विकणे. अशा प्रकारे हा फंड उत्पन्न करतो.
संरचनेच्या आधारावर म्युच्युअल फंडांचे प्रकार (Types of Mutual Funds in India)
मित्रांनो संरचनेच्या आधारावर म्युचल फंडचे तीन भाग ((Types of Mutual Funds in India) केले जाऊ शकतात.
- Open Ended schemes :
सर्व प्रकारच्या म्युच्युअल फंड योजना या ओपन Open Ended श्रेणीमध्ये येतात. आणि या श्रेणीमध्ये खरेदी विक्री कधीही करता येते. यामध्ये आपल्या गुंतवणूकदारांना कंपनी कोणत्याही मर्यादाशिवाय शेअर्स जारी करू शकते.
- Close Ended schemes :
या प्रकारामध्ये निधी खूप कमी प्रमाणात आहे. यामधील शेअर्स ची संख्या पण निश्चित असते. ओपन एन्डेड स्कीमप्रमाणे तुम्ही या श्रेणी मध्ये कधीही खरेदी -विक्री करू शकत नाही. विक्री करण्यासाठी तुम्हाला परिपक्वता पर्यंत वाट पहावी लागते त्यानंतरच तुम्ही खरेदी-विक्री करू शकता.आणि यामुळे ही श्रेणी जास्त लोकप्रिय पण नाहीये. क्लोज एंडेड फंड एनएफओ (नवीन फंड ऑफर) द्वारे लाँच केले जातात. हे फक्त NFO खुले असतानाच खरेदी केले जाऊ शकते.
- इंडेक्स फंड (Index Funds) :
इंडेक्स फंड हे असे फंड आहेत जे तुम्ही गुंतवलेले पैसे शेअर मार्केटच्या इंडेक्समध्ये गुंतवणूक करतात, जसे की बीएसई, एनएसई, निफ्टी, निफ्टी बँक. येथे निधी व्यवस्थापकाला कोणतीही विशेष रणनीती बनवावी लागत नाही. निष्क्रीयपणे व्यवस्थापित केल्यामुळे, त्यांच्याकडे खर्चाचे प्रमाण खूप कमी आहे.
गुंतवणूकदार परतावा निर्देशांकाने दिलेला समान परतावा देतो. एचडीएफसी सेन्सेक्स योजनेप्रमाणे सेन्सेक्स इंडेक्सचा फंड आहे. या म्युच्युअल फंडातील सर्व स्टॉक सेन्सेक्सचे असतील. म्युच्युअल फंडाचे पैसे त्या शेअरमध्ये फंड मॅनेजरने त्याच प्रमाणात गुंतवले आहेत ज्यात स्टॉक स्टॉकमध्ये आहेत. इंडेक्स फंडांमध्ये वाढीच्या संधी कमी असतात. जर निर्देशांक कमी मूल्यावर व्यापार करत असेल तर तुम्ही त्यात पैसे गुंतवू शकतात.
- सेक्टर फंड (Sector funds) :
हे अशा प्रकारचे फंड आहेत जे एका प्रकारचा व्यवसाय असणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. म्हणजेच “तंत्रज्ञान फंड्स” हे तंत्रज्ञान विषयी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात.
तर मित्रांनो हे आहेत भारतामधील म्युच्युअल फंड आणि त्यांचे प्रकार (Types of Mutual Funds in India). आशा करतो की तुम्हाला याबद्दल सर्व आवश्यक माहिती मिळाली असेल. ही माहिती तुमच्या इतर मित्रांसोबत पण शेअर करा जेणेकरून जर कोणी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणार असेल तर त्याला याबद्दल माहिती होईल. आणि जर तुम्हाला फायनान्स बद्दल अशीच माहिती हवी असेल तर https://bhartiera.com ला रोज भेट देत जा.
हेही वाचा :
Types of GST in India 2024: भारतामधील GST चे प्रकार! तुम्हाला माहिती आहेत का