UPSC CDS Recruitment 2024: UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा जाहीर! असा करा अर्ज

UPSC CDS Recruitment 2024 Notification

UPSC CDS Recruitment 2024
UPSC CDS Recruitment 2024

मित्रांनो जर तुम्ही पण भारतीय सशस्त्र दलात सामील होऊ इच्छित असाल तर UPSC CDS Recruitment 2024 द्वारे तुम्हाला खूप मोठी संधी आली आहे. UPSC द्वितीय संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (सीडीएस-II) 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जून 2024 आहे आणि लिखित परीक्षा 1 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित केली जाणार आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

जर तुम्ही UPSC CDS Recruitment 2024 या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरती संबंधी सर्व माहिती जसे की या परीक्षेतून एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत, आवश्यक शैक्षणिक पात्रता काय असणार आहे? अर्ज करण्याची तारीख काय आहे इत्यादि पूर्ण माहिती पुढे दिली आहे. त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून येणाऱ्या अशाच अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील

UPSC CDS-II Examination 2024

Friends if you also want to join the Indian armed forces then UPSC CDS Recruitment 2024 is a great opportunity for you. The last date to apply for UPSC Second Combined Defense Services Examination (CDS-II) 2024 is 04 June 2024; the written test is scheduled for 1 September 2024. So read all the information and then apply for this recruitment.

परीक्षेचा अभ्यासक्रम (UPSC CDS Syllabus) : UPSC सीडीएस परीक्षा ही पुढील 3 विषयामध्ये असते:

  • इंग्रजी (English)
  • सामान्य ज्ञान (General Knowledge)
  • गणित (Mathematics) (केवळ भारतीय सैन्य अकॅडेमी (OTA) साठी)

सामान्य ज्ञान या विभागात इतिहास, भूगोल, राजकारण, विज्ञान आणि समसामयिक घडामोडींचा समावेश असतो. गणित हा विभाग फक्त भारतीय सैन्य अकादमी (ओटीए) साठी लागू असतो.

परीक्षेची पैटर्न (Exam Pattern) : या परीक्षेचा पॅटर्न कसा असतो याची पूर्ण माहिती पुढे दिली आहे.

  • ही परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची (objective) असते.
  • एकूण 300 गुणांची परीक्षा असून प्रत्येक विषयाचे गुण समान असतात यामध्ये
  • इंग्रजी – 100 मार्क्स, सामान्य ज्ञान – 100 मार्क्स, गणित – 100 मार्क्स.
  • चुकीच्या उत्तरांसाठी नकारात्मक गुण (negative marking) लागू आहे.

CDS Eligibility

पात्रता (Eligibility) : मित्रांनो जर तुम्ही पण या परीक्षेद्वारे भारतीय सशस्त्र दलामध्ये सामील होऊ इच्छित असाल तर त्यासाठी तुमच्याकडे काही पात्रता असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पुढे दिली आहे.

  • अर्ज करणारा उमेदवार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक.
  • वयोमर्यादा: किमान 19 वर्ष आणि कमाल 25 वर्ष (काही प्रकरणांमध्ये वयोमर्यादेत सवलत)

NDA 2 Recruitment 2024: पहा अधिसूचना, रिक्त पदे व निवड प्रक्रिया! अधिकारी बनू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी संधी

UPSC CDS Selection Process

निवड प्रक्रिया (Selection Process) : उमेदवारांची निवड पुढील टप्प्याद्वारे करण्यात येते.

  • लिखित परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची SSB (सेवा निवड मंडळ) मुलाखत घेतली जाते.
  • SSB मुलाखत ही व्यक्तीमत्त्व चाचणी (personality test), बुद्धिमत्ता चाचणी (intelligence test) आणि शारीरिक चाचणी (physical test) वर आधारित असते.

CDS Vacancy 2024

पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत. त्याची पूर्ण माहिती पुढे दिली आहे.

पदांचा सविस्तर तपशील :

पदाचे नाव/ कोर्सचे नाव पदांची संख्या 
भारतीय भूदल (मिलिटरी) अकॅडेमी, डेहराडून 159 (DE)100 पदे.
भारतीय नेव्हल अकॅडेमी, एझीमाला, Executive (General Service)/Hydro32 पदे.
हवाई दल अकॅडेमी, हैदराबाद,No. 218 F(P) Course32 पदे.
ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (पुरुष) चेन्नई, 122nd SSC (Men) Course (NT)276 पदे.
ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई,-36th SSC Women (Non-Technical) Course19 पदे.

एकूण पदे : एकूण 0459 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे.

Educational Qualification for UPSC CDS Recruitment 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता तपशील :

पदाचे नाव/ कोर्सचे नाव आवश्यक शैक्षणिक पात्रता
भारतीय भूदल (मिलिटरी) अकॅडेमी, डेहराडून 159 (DE)पदवीधर
भारतीय नेव्हल अकॅडेमी, एझीमाला, Executive (General Service)/Hydroइंजिनिअरिंग पदवी
हवाई दल अकॅडेमी, हैदराबाद,No. 218 F(P) Courseपदवी (Physics and Mathematics at 10+2 level) 
किंवा
 इंजिनिअरिंग पदवी.
ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (पुरुष) चेन्नई, 122nd SSC (Men) Course (NT)पदवीधर
ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई,-36th SSC Women (Non-Technical) Courseपदवीधर

Age Limit for UPSC CDS Recruitment 2024

आवश्यक वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचा जन्म 02 जुलै 2001 ते 01 जुलै 2006 दरम्यान आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

UPSC CDS Recruitment 2024 Apply Online

UPSC CDS Recruitment 2024
UPSC CDS Recruitment 2024

अर्ज पद्धती : उमेदवारांना या परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क :

  • General/ OBC : 200/- रुपये.
  • SC/ ST/ महिला : फी नाही.
UPSC CDS Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरत लवकर अर्ज करा.

UPSC CDS Notification
अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
UPSC CDS-II Exam Date 2024

लेखी परीक्षा : 01 सप्टेंबर 2024 रोजी लेखी परीक्षा होणार आहे.

महत्वाचे :

  • जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर दिलेली पीडीएफ जाहिरात तुम्ही स्वतः एकदा काळजीपूर्वक वाचा कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  • या परीक्षेसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ज्याची लिंक तुम्हाला वरती दिली आहे. तेथून तुम्ही अर्ज करू शकता.
  • अर्ज करताना तुम्हाला तुमची सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. आणि आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
  • त्यानंतर अर्ज शुल्क भरून अर्ज सबमिट करायचा आहे. आणि सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.

हे लक्षात ठेवा :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे पदवीधर आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्या अशाच महत्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/रोज भेट देत जा.

धन्यवाद!

MPSC Civil Services Bharti 2024: MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा जाहीर! पहा सविस्तर