E Shram Card Yojana
मित्रांनो E Shram Card साठी कोण कोण पात्र आहे तसेच हे E Shram Card कार्ड कसे काढायचे या कार्ड करिता तुम्ही कशाप्रकारे नोंदणी करू शकता, या कार्डमुळे तुम्हाला कोणकोणते फायदे होणार आहेत तसेच तुम्हाला कशा प्रकारे प्रत्येक महिन्याला 3,000 रुपये पेन्शन मिळणार आहे त्याबद्दल सर्व सविस्तर माहिती पुढे दिली आहे. त्यामुळे दिलेली सर्व माहिती व्यवस्थित वाचा आणि त्यानंतर अप्लाय करा. आणि जर तुम्हाला सरकारच्या अशाच नवीन योजनांचे अपडेट व्हाट्सअप वर हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.
E Shram Card Status
मित्रांनो आपण बघतच आहोत की भारत देशामध्ये सध्या विकास हा मोठ्या झपाट्याने होत आहे. आणि या विकासाच्या मार्गावर पुढे जाण्यासाठी आपल्या भारतामधील कामगार वर्गाचा खूप मोलाचा वाटा आहे. आणि देशांमध्ये कामगारांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. पण या कामगारांचे जीवन जर आपण बघितले तर त्यांना नेहमी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. आणि अशाच कामगार वर्गाच्या कुटुंबामध्ये काही समस्या आली तर त्यांना उपासमारीचा देखील सामना करावा लागतो.
आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन केंद्र सरकारने 2020 मध्ये अशा कामगारांकरिता ई-श्रम योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्तीला 2 रुपयापर्यंतचा अपघात विमा दिला जातो. या योजनेकरिता असंघटित क्षेत्रात काम करणारा कोणताही भारतीय नागरिक नोंदणी करू शकतो. त्याबद्दलची सविस्तर माहिती पुढे आहे.
E Shram Card Details
योजनेचे नाव | ई-श्रम कार्ड योजना |
योजना कोणी सुरू केली | केंद्र सरकार |
योजना सुरू वर्ष | 2020 |
लाभार्थी | असंघटित क्षेत्रातील कामगार |
योजनेचे अधिकृत वेबसाईट | https://eshram.gov.in/ |
E Shram Card Benefits
eShram Card Benifits : जे कामगार संघटित क्षेत्रामध्ये काम करतात त्यांना आर्थिक सुरक्षा मिळण्यासाठी केंद्र सरकारने सर्व कामगारांकरिता श्रम कार्ड सुरू केले आहे. या योजनेमधील हे कार्ड कामगारांसाठी ओळखपत्र सारखे आहे. जर एखाद्या कामगाराचा कामाच्या ठिकाणी अपघात झाला, किंवा त्यादरम्यान त्याचा मृत्यू झाला किंवा त्याला अपंगत्व आले याकरिता त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळून देण्यासाठी हे कार्ड उपयोगी पडते.
ज्यांच्याकडे हे कार्ड आहे अशा कार्डधारकांना भारत सरकारकडून 2 लाख रुपये पर्यंतचा विमा संरक्षण मिळते. जर एखादा कामगार काम करण्यास अक्षम झाला तर त्याला 1 लाख रुपये दिले जातात. आणि या 2 लाख रुपयाच्या विम्या करिता एकही रुपयाचे प्रीमियम भरावे लागत नाही. तसेच भारत सरकारकडून कामगाराला 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला 3 हजार रुपयाची पेन्शन देखील दिली जाते. त्यामुळे गरीब वर्गातील जेवढे नागरिक आहेत त्यांच्यासाठी हा खूप मोठा दिलासा आहे.
E Shram Card Update
भारत सरकारकडून कामगाराला 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला 3 हजार रुपयाची पेन्शन दिली जाणार आहे. तसेच 2 लाख रुपयांचा अपघात विमा देखील दिला जाणार आहे.
E Shram Card Registration
जर तुम्ही या कार्ड करिता नोंदणी करणार आहात तर त्याकरिता काही डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पुढे दिली आहे.
- ई-श्रम कार्ड करिता अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 16 ते 59 वर्ष यादरम्यान असणे आवश्यक आहे.
- स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
- आधार कार्ड ला फोन नंबर लिंक असणे आवश्यक आहे.
- स्वतःचे चालू बँक अकाउंट असणे आवश्यक आहे.
- शिधापत्रिका.
- अर्ज करणारा व्यक्ती हा EPFO/ ESIC आणि NPS चा सदस्य नसावा.
ई-श्रम कार्ड करिता कोण नोंदणी करू शकतो?
ई-श्रम कार्ड करिता असंघटित क्षेत्रामधील कामगारांच्या श्रेणीमध्ये दुकानांमध्ये काम करणारे कर्मचारी/ सेल्समन/ हेल्पर, रिक्षा चालवणारे, पंचर दुरुस्ती करणारे, मेंढी पालन करणारे, ज्यांचा दुग्ध व्यवसाय आहे असे, पेपर फेरीवाले, सर्व पशुपालक, कोणत्याही कंपनीमध्ये असणारे डिलिव्हरी बॉय, वीट भट्ट्यांसारखे क्षेत्रामध्ये काम करणारे मजूर इत्यादी लोक या कार्डसाठी नोंदणी करू शकतात.
E Shram Card Benefits in Marathi
ई-श्रम कार्ड अंतर्गत तुम्हाला किती योजनेचा लाभ मिळतो?
- प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना.
- प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना.
- स्वयंरोजगार करण्यासाठी राष्ट्रीय पेन्शन योजनेचा लाभ.
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना.
- अटल पेन्शन योजना.
- पीएम सुरक्षा विमा योजना.
- प्रधानमंत्री आवास योजना.
- राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजना.
- आयुष्यमान भारत योजना.
- प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना.
- कौशल्य विकास योजना.
- सार्वजनिक वितरण व्यवस्था योजना.
इत्यादी योजनांचा लाभ तुम्हाला या अंतर्गत मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर या कार्ड करिता नोंदणी करा. नोंदणी कशी करायची याची माहिती पुढे दिली आहे.
eShram Card Apply Online 2023
ई-श्रम कार्ड काढण्याची प्रक्रिया:
- सर्वात अगोदर तुम्ही ई-श्रम कार्ड च्या अधिकृत वेबसाईट वर जा.
- त्यानंतर REGISTER on eSharm हा पर्याय निवडा.
- त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. त्या पेजवर तुम्हाला तुमचा आधार कार्ड सी लिंक असणारा मोबाईल नंबर टाकावा लागेल.
- त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो तुम्हाला तिथे टाकावा लागेल.
- ओटीपी टाकल्यानंतर एका नवीन पेज वरती एक फॉर्म ओपन होईल तो फॉर्म तुम्हाला भरावा लागेल.
- त्यानंतर तुम्हाला तुमची सर्व हवी ती आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
- त्यानंतर फॉर्म सबमिट करावा लागेल.
- तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 10 अंकी ई-श्रम कार्ड जारी केले जाईल.
अशा पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप या कार्डसाठी नोंदणी करू शकता. तसेच तुम्ही जवळच्या सेतू सुविधा केंद्र मध्ये जाऊन देखील नोंदणी करू शकता.
मित्रांनो जर ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर तुमच्या मित्रांबरोबर तसेच नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या कार्डचा लाभ घेता येईल. आणि सरकारच्या अशाच नवीन येणाऱ्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://bhartiera.com/ पोर्टलला अवश्य भेट देत जा.
हेही वाचा :
धन्यवाद!
ई-श्रम कार्ड कसे काढावे?
ई-श्रम कार्ड काढण्याकरिता तुम्ही पुढील स्टेप फॉलो करू शकता.
1. सर्वात अगोदर तुम्ही ई-श्रम कार्ड च्या अधिकृत वेबसाईट वर जा.
2. त्यानंतर REGISTER on eSharm हा पर्याय निवडा.
3. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. त्या पेजवर तुम्हाला तुमचा आधार कार्ड सी लिंक असणारा मोबाईल नंबर टाकावा लागेल.
4. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो तुम्हाला तिथे टाकावा लागेल.
5. ओटीपी टाकल्यानंतर एका नवीन पेज वरती एक फॉर्म ओपन होईल तो फॉर्म तुम्हाला भरावा लागेल.
6. त्यानंतर तुम्हाला तुमची सर्व हवी ती आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
7. त्यानंतर फॉर्म सबमिट करावा लागेल.
8. तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 10 अंकी ई-श्रम कार्ड जारी केले जाईल.
ई-श्रम कार्ड म्हणजे काय आहे?
ई-श्रम कार्ड म्हणजे भारत सरकारने देशातील असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आर्थिक मदत मिळण्याकरिता ई-श्रम कार्ड ही सुविधा सुरू केली आहे.
ई-श्रम कार्ड पात्रता काय हवी आहे?
ई-श्रम कार्ड करिता अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 16 ते 59 वर्ष यादरम्यान असणे आवश्यक आहे. अर्ज करणारा व्यक्ती हा EPFO/ ESIC आणि NPS चा सदस्य नसावा.