Pradhan Mantri Matru Vandana Yojana: बाळाचा जन्म होताच खात्यात जमा होणार 6000 रुपये! पहा योजनेची पूर्ण माहिती

Pradhan Mantri Matru Vandana Yojana

Pradhan Mantri Matru Vandana Yojana
Pradhan Mantri Matru Vandana Yojana

मित्रांनो सरकार सतत नवनवीन योजना राबवत असते त्यापैकी एक योजना म्हणजे Pradhan Mantri Matru Vandana Yojana. या योजने द्वारे कशाप्रकारे लाभ मिळणार आहे. ते या लेखामध्ये दिले आहे. आपण तर पाहतो की आपल्या आजूबाजूला अश्या बहुसंख्य गरीब महिला आहेत स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी मोल-मजुरी करावी लागते त्यामुळे अशा महिलांना त्या गर्भवती असताना गरोदरपणात अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत स्वतःचे पोट भरण्यासाठी मजुरी करावी लागते.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

त्यामुळे अशा गर्भवती महिलांना व त्यांच्या पोटात असणाऱ्या बाळाला त्यांच्या गरोदरपणात योग्य सकस पोषक आहार मिळत नाही परिणामी गर्भवती माता कुपोषित राहून त्याच्यावर व त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आणि त्यामुळे गर्भवती मातेचा व त्यांच्या पोटात असलेल्या नवजात बालकाचा मृत्यू होण्याचा धोका वाढतो. आणि इतकेच नव्हे तर प्रसूती नंतर देखील त्यांच्यामध्ये शारीरिक क्षमता नसताना सुद्धा त्यांना स्वतःच्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी मजुरी करावी लागते त्यामुळे मातेचे शरीर पूर्णपणे बरे होण्यापासून रोखले जाते आणि पहिल्या 6 महिन्यांत त्यांच्या लहान बाळाला केवळ स्तनपान देण्याच्या क्षमतेमध्ये अडथळा निर्माण होतो.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आणि या सगळ्याचा असा होतो की कित्येक महिला कुपोषित बाळाला जन्म देतात. भारतामध्ये एक सर्वे करण्यात आला आणि त्यात असे आढळून आले की, भारतात प्रत्येक तिसरी स्त्री ही कुपोषित आहे आणि प्रत्येक दुसरी स्त्रीला रक्तक्षय आहे. त्यामुळे गर्भवती माता व त्यांच्या नवजात बालकांचे व स्तनदा मातेचे आरोग्य सुधारण्यासाठी तसेच त्याना सकस पोषण आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे तसेच गर्भवती माता व बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ची सुरवात संपूर्ण देशात केली.

PM Matru Vandana Yojana

तर चला या योजनेबद्दलची सविस्तर माहिती पाहूया.

  • योजनेचे नाव : Pradhan Mantri Matru Vandana Yojana.
  • विभाग : महिला व बालविकास मंत्रालय.
  • राज्य : महाराष्ट्र.
  • योजनेची सुरवात : 01 जानेवारी 2027
  • लाभार्थी : देशातील महिला.
  • एकूण मिळणार लाभ : रुपये – 6,000/-.
  • अर्ज पद्धती : ऑफलाइन.

योजनेचा उद्देश :

  • Pradhan Mantri Matru Vandana Yojana मुख्य उद्देश नवजात जन्मलेल्या बाळाला कुपोषित होण्यापासून वाचविणे हा आहे.
  • स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेला आर्थिक सहाय्य मिळवून देणे.
  • महिलेच्या गर्भपणात आणि तिच्या प्रसूतीनंतर बाळाला स्तनपान करतेवेळी आई आणि बाळाच्या आरोग्यावर भर देणे.
  • गर्भवती महिला आणि तिच्या बाळाचे प्रसूती दरम्यान मृत्यूचे प्रमाण कमी करणे आहे.
  • गर्भवती महिलांचे जीवनमान सुधारणे
  • गर्भवती महिलांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे
  • गर्भवती महिलांना त्यांच्या गरोदर पणाच्या दिवसांत लागणाऱ्या पैशांसाठी सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
  • गर्भवती महिलांचे आरोग्य अबाधित राखणे.

Matru Vandana Yojana In Marathi

योजनेचे वैशिष्ट्ये :

  • Pradhan Mantri Matru Vandana Yojana ची सुरवात राज्यात 1 जानेवारी 2017 पासून करण्यात आली.
  • मातृ वंदना योजना केंद्र शासनाच्या महिला व बालविकास आरोग्य विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे.
  • प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेत केंद्र शासनाचा 60 टक्के व राज्य शासनाचा 40 टक्के सहभाग आहे.
  • प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची राशी महिलांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते.
  • या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गर्भवती महिलांना स्वतः अर्ज करण्याची आवश्यकता नाही कारण गर्भवती महिला ज्या हॉस्पिटल मध्ये तपासणी करण्यासाठी जातात तेथील आरोग्य सेविकांद्वारे गर्भवती महिला अर्ज भरला जातो.
  • या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांचे जीवनमान सुधारण्यास तसेच त्या सशक्त व आत्मनिर्भर बनण्यास व त्याचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यास मदत होईल.

योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो? :

  • 1 जानेवारी 2017 नंतर राज्यातील पहिल्या अपत्यासाठी गरोदर असणाऱ्या महिला आणि स्तनदा माता या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
  • जर एखाद्या महिलेचा नैसर्गिक गर्भपात झाला किंवा मृत बाळ् जन्मल्यास अशा परिस्थितीमध्ये पण त्या महिलेला या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • Pradhan Mantri Matru Vandana Yojana चा लाभ दारिद्र रेषेखालील व दारिद्र रेषेवरील महिलांना घेता येईल.
  • केंद्र सरकार आणि राज्य शासनात नियमित नोकरीं करत असलेल्या गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या माता या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
Pradhan Mantri Matru Vandana Yojana Benefit
Pradhan Mantri Matru Vandana Yojana
Pradhan Mantri Matru Vandana Yojana

अशाप्रकारे मिळणार आर्थिक लाभ :

  1. पहिला टप्पा : 1000 रुपये.
  2. दुसरा टप्पा : 2000 रुपये.
  3. तिसरा टप्पा : 2000 रुपये.
  4. जननी सुरक्षा योजना अंतर्गत उर्वरित : 1000 रुपये.
Pradhan Mantri Matru Vandana Yojana Eligibility

योजनेसाठी पात्रता :

  • या योजनेसाठी अर्ज करणारी महिला ही महाराष्ट्र राज्याची मूळ निवासी असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे :

  • महिला व तिच्या पतीचे सहमती पत्र आवश्यक आहे.
  • महिला व तिच्या पतीचे आधारकार्ड आवश्यक.
  • अर्जदार महिलेचे आधार संलग्न बँक खाते किंवा पोस्ट खाते असणे आवश्यक आहे.
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • महिलेचा / पतीचा मोबाईल क्रमांक
  • अर्जदार दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र
  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  • घरपट्टी पावती
  • वीजबिल रेशन कार्ड
  • ई-मेल आयडी
  • रहिवाशी दाखला
Pradhan Mantri Matru Vandana Yojana Registration

या योजने करिता तुम्ही ऑनलाईनऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे अर्ज करू शकता.

ऑफलाइन अर्ज करण्याची पद्धत :

  • ऑफलाईन अर्ज हा हॉस्पिटलमध्ये नर्सद्वारे भरून घेतला जातो. तसेच तुम्ही तो आरोग्य केंद्रावरही भरू शकता.

ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत :

  • अर्जदाराला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • त्यानंतर Home Page वर गेल्यावर Login Form दिसेल.
  • Login Form मध्ये विचारलेले सर्व माहिती (Email Id, Password, Captcha Code) भरून Login बटणावर क्लिक करा.
  • Login केल्यावर अर्जदार प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेसाठी अर्ज करू शकतो.
  • अर्ज करताना विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरुन अर्ज सबमिट करावा.

मातृत्व वंदना योजना अर्ज – 1

मातृत्व वंदना योजना अर्ज – 2

मातृत्व वंदना योजना अर्ज -3

योजनेची सविस्तर माहिती – PDF

आम्ही आशा करतो कि या लेखामधून तुम्हाला Pradhan Mantri Matru Vandana Yojana ची आवश्यक माहिती मिळाली असेल. ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील. आणि सरकारच्या अशाच योजणाचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com रोज भेट देत जा.

हेही वाचा :

eSanjeevani [2024]: आता तुमच्या आजारावर घरबसल्या मोफत प्रिस्क्रिप्शन मिळणार! आत्ताच जाणून घ्या सरकारी पोर्टल बद्दल

धन्यवाद!