eSanjeevanieSanjeevani

eSanjeevani portal

eSanjeevani portal
eSanjeevani portal

मित्रांनो आता तुम्ही कोणत्याही आजारावर घरबसल्या डॉक्टरांकडून सल्ला घेऊ शकता. कारण केंद्र सरकारने eSanjeevani पोर्टल लॉन्च केले आहे. आणि या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणालाही किंवा तुम्हाला कोणताही आजार असेल तर तुम्हाला ते डॉक्टरला फी न देता मोफत सल्ला घेऊ शकता. कारण कित्येक वेळा डॉक्टरांकडे फक्त व्हिजिटला गेल्यानंतर आपल्याला भरमसाठ फी द्यावी लागते. आणि यामुळेच ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती खराब आहे ते लोक अंगावरच आजार काढण्याला प्राधान्य देतात.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

आणि काही लोक तर थेट मेडिकल वाल्याला संबंधित आजाराची लक्षणे सांगून त्यांच्याकडून औषधे घेतात. मात्र या दोन्ही गोष्टींमध्ये धोका असतो. आणि आता केंद्र सरकारने जे ई संजीवनी पोर्टल लॉन्च केले आहे त्याची विशेषता म्हणजे यावर तुम्हाला अगदी मोफत सल्ला मिळणार आहे. या पोर्टल च नाव ई-संजीवनी ओपीडी असे आहे. यासंबधी सर्व सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

eSanjeevani 2.0

ई संजीवनी 2.0 : केंद्र सरकारने लॉन्च केलेल्या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. रिपोर्टर केंद्र सरकारने 2019 सालीच लाँच केले होते. आणि आतापर्यंत या पोर्टलचा फायदा 10 कोटीहून अधिक लोकांना झाला आहे. कोरोना महामारीच्या काळात खूप लोक होम कॉरंटिन होते त्यामुळे लोकांना घरून देखील डॉक्टरांचा सल्ला घेता यावा यासाठी हे पोर्टल लॉन्च करण्यात आलं होतं. जर तुम्हाला पण या पोर्टलचा फायदा घ्यायचा असेल. तर कशाप्रकारे रजिस्ट्रेशन करावे लागते आणि त्याची प्रोसेस कशी आहे याची सर्व माहिती पुढे दिली आहे.

eSanjeevani login

ई संजीवनी login : संजीवनी पोर्टल वरती लॉगिन करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून लॉगिन करा.

ई संजीवनी पोर्टलची अधिकृत वेबसाईट : https://esanjeevani.mohfw.gov.in/

eSanjeevani mohfw

अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करा :

  1. रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात अगोदर ई संजीवनीच्या अधिकृत वेबसाईटला https://esanjeevani.mohfw.gov.in/ भेट द्या.
  2. त्यानंतर पेशंट रजिस्ट्रेशन वर क्लिक करा.
  3. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकल्यावर एक ओटीपी येईल तो ओटीपी टाका.
  4. त्यानंतर विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
  5. त्यानंतर तुम्हाला एसएमएस द्वारे पेशंट आयडी आणि टोकन मिळेल.
  6. तुम्हाला टोकन नंबर मिळाल्यानंतर पुन्हा होम पेज वरती जाऊन पेशंट लॉगिन पर्यावर क्लिक करा. आणि टोकन नंबरच्या मदतीने लॉगिन करा.
  7. त्यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीन वरती वेटिंग रूम चा पॉपअप दिसेल.
  8. थोडावेळ थांबल्यानंतर तुम्हाला कॉल नाऊ असा पर्याय दिसेल.
  9. त्यानंतर तुम्ही डॉक्टरांना व्हिडिओ कॉल करून तुमच्या आजाराची सर्व माहिती त्यांना दिल्यानंतर तुम्हाला त्यांच्याकडून मोफत सल्ला मिळेल.
eSanjeevani app
eSanjeevani app
eSanjeevani app

ई संजीवनी app : मित्रांनो जर तुम्हाला ही संजीवनी पोर्टल ॲप डाऊनलोड करायचे असेल तर देखील उपलब्ध आहेत. त्यासाठी तुम्ही प्ले स्टोर वरती eSanjeevani mohfw नाव टाकून ॲप इन्स्टॉल करू शकता आणि डॉक्टरांशी ऑनलाइन कन्सल्ट करू शकता.

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांना या पोर्टलची आवश्यकता आहे. आणि जर अशा सरकारच्या नवनवीन अपडेट व्हाट्सअप वर हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप चैनल लगेच जॉईन करा. व अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

व्हाट्सअप चैनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

What is Cervical Cancer [2024]: सर्वाइकल कॅन्सर म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या पूर्ण माहिती

धन्यवाद!