Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024
मित्रांनो सरकार ने Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 ही योजना सुरू केली आहे. या योजना दूत भरती द्वारे राज्यात तब्बल 50,000 पदे भरण्यात येणार आहेत. या भरती योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबत 2024 आहे. आणि याच योजनेला ”मुख्यमंत्री योजना दूत” असे नाव दिले आहे. त्यामुळे उमेदवारांसाठी खूप मोठी सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!मित्रांनो, तुम्हाला जर या सरकारी मुख्यमंत्री योजना दूत भरतीमध्ये अर्ज करायचा असेल, तर त्याबद्दल संपूर्ण माहिती, पात्रता, आवश्यक कागदपत्रे या सर्वांची माहिती पुढे लेखामध्ये दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि या योजनेचा लाभ घ्या.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
Mukhyamantri YojanaDoot Bharti 2024
भरतीचे नाव | ”मुख्यमंत्री योजना दूत” (Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024) |
कोणी सुरू केली | महाराष्ट्र सरकार. |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील युवक. |
मिळणारा लाभ | 50,000 तरुणांना नोकरी. |
श्रेणी | ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे. |
अर्ज पद्धती | यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे. |
हेही वाचा : Mazagon Dock Bharti 2024: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 176 पदांची भरती! हे उमेदवार करा अर्ज
Mukhyamantri YojanaDoot Bharti in Marathi
योजनेचे वैशिष्टे :
- या भरती द्वारे ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात 5000
हजार लोकसंख्येसाठी 1 योजनादूत या प्रमाणात एकूण 50 हजार
योजनादूतांची निवड करण्यात येणार आहे. - मुख्यमंत्री योजनादूतास 10,000/- रुपये एवढे ठोक मासिक वेतन मिळणार आहे.
- या भरतीमद्धे पात्र होणारे योजनादूत ही 6 महिन्यांच्या कालावधी साठी निवडले जाणार आहेत.
Yojana Doot Bharti 2024 Eligibility
भरती साठी आवश्यक पात्रता : जर तुम्हाला Yojana Doot Bharti 2024 साठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे पुढील पात्रता असणे आवश्यक आहे.
- अर्जदार उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 35 वयोगटातील असणे आवश्यक आहे.
- त्या उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- उमेदवार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा.
- उमेदवाराचे बँक अकाउंट हे आधार कार्डशी लिंक केलेल्या असावे.
Important Documents for Yojana Doot Bharti 2024
आवश्यक कागदपत्रे : तुमच्याकडे अर्ज करण्यासाठी पुढील आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराचे आधार कार्ड.
- पदवी पूर्ण असल्याचे प्रमाणपत्र.
- अधिवास प्रमाणपत्र.
- बँक खाते.
- पासपोर्ट आकाराचा फोटो.
- ऑनलाईन अर्जाच्या सोबत दिलेल्या नमूदन्यातील हमीपत्र.
अर्ज करण्याची सुरवात : मित्रांनो लवकरच या भरतीसाठी अर्ज सुरू होतील. तशी माहिती तुम्हाला आपल्या WhatsApp ग्रुप मध्ये मिळेल. त्यासाठी आपला ग्रुप नक्की जॉइन करा.
Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 GR
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 योजनेचा शासन निर्णय (GR) | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
Yojanadut Bharti 2024
योजनादूतांचे महत्वाची कामे : या भरतीमद्धे नियुक्त होणाऱ्या योजनादूतांना पुढील कामे पार पाडावी लागणार आहेत.
- या भरती मध्ये निवड झालेले योजन दूत हे संबंधित जिल्हाधिकारी यांच्या संपर्कामध्ये राहून, जिल्हा योजनांची माहिती नागरिकांना देतील.
- नेमून दिलेल्या ठिकाणी जाऊन, सांगितलेले काम पूर्ण करण्याची जबाबदारी या उमेदवारांवर बंधनकारक असेल.
- अर्जदार योजना दूत शासनाच्या योजनांची माहिती घरोघरी जाऊन देण्याचा प्रयत्न करतील.
- तसेच दिवसभर केलेल्या कामाचा अहवाल ते शासनाला ऑनलाईन अपलोड करतील.
- या पात्र उमेदवारांना गैरहजर राहिल्यास किंवा काम पूर्ण न झाल्यास, मानधन दिले जात नाही.
Yojana Doot Portal
निवड प्रक्रिया : पुढील पद्धतीने उमेदवार निवडण्यात येणार आहेत.
- उमेदवारांच्या नोंदणीची व प्राप्त अर्जाच्या छाननीची प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्यसंस्थांमार्फत ऑनलाईनरीत्या पूर्ण करण्यात येईल.
- सदरची छाननी उपरोक्त परिच्छेदात नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार करण्यात येईल.
- ऑनलाईनरीत्या प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येईल. जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने, प्राप्त अर्जाशी संबंधित उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करतील (यामध्ये उमेदवारांची शैक्षणिक व वयोमर्यादेविषयक मूळ कागदपत्रे तपासण्यात येतील). त्यानंतर प्रत्येक उमेदवाराबरोबर ६ महिन्याचा करार केला जाईल. कराराचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढविला जाणार नाही.
- जिल्हा माहिती अधिकारी वरील प्रमाणे शासकीय योजनांच्या माहिती संदर्भात पात्र उमेदवारांचे समुपदेशन व निर्देशन (Orientation) करतील.
- जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहायक आयुक्त, (कौशल्य विकास रोजगार) व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी १ / शहरी भागात ५ हजार लोकसंख्येसाठी १ या प्रमाणात उमेदवारांना योजनादूत म्हणून पाठवतील.
- मुख्यमंत्री योजनादूत (Yojana Doot Bharti) या कार्यक्रमांतर्गत उमेदवारांना सोपविण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही. सबब, या नेमणूकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्या उमेदवारांकडून घेण्यात यावे.
Mukhyamantri YojanaDoot Bharti 2024 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 या भरती साठी 17 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
ही अपडेट पहा : JCI Recruitment 2024: ज्यूट कार्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 12वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरी! येथून करा अर्ज
टीप :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी आमच्या वेबसाइट ला रोज भेट देत जा.
हेही वाचा :
FAQ:
मुख्यमंत्री योजना दूत भरती 2024 मध्ये किती पदे भरण्यात येणार आहेत?
मुख्यमंत्री योजना दूत भरती 2024 द्वारे तब्बल 50,000 पदे भरण्यात येणार आहेत.
Yojana Doot Bharti 2024 साठी अर्ज पद्धत काय आहे?
या भरतीसाठी ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.