Police Bharti Document List
मित्रांनो खूप मुलांना समजत नाही की पोलीस भरतीसाठी आवश्यक (Police Bharti Document) कागदपत्रे कोणती आहेत? तर आता आपण पोलिस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे (Police Bharti Document List) कोणते आहेत ते पाहणार आहोत. पोलीस भरती म्हटले म्हणजेच डॉक्युमेंट वेरिफिकेशन साठी काही आवश्यक कागदपत्रे लागतात. आणि कित्येक वेळा आवश्यक डॉक्युमेंट्स नसल्यामुळे मुले भरतीमधून बाहेर केले जातात. आणि जर अचानक भरती निघाली तर मुलांची धावपळ होते. आणि त्यामुळेच पोलीस भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची पूर्ण यादी पुढे देण्यात आलेली आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!पुढील यादीत देण्यात आलेले सर्वच कागदपत्रे तुम्हाला लागतील असं नाही. त्या यादीमध्ये काही आवश्यक कागदपत्रे देण्यात आलेले आहेत. तर काही इतर कागदपत्रे आहेत. ज्याच्यात मुलगा कोणता प्रवर्गाचा आहे त्याचा शिक्षण किती झालं आहे. त्या पद्धतीने ती कागदपत्रे लागतात. त्यामुळे दिलेली सर्व माहिती व्यवस्थित पहा.
Police Bharti Document List 2024
मित्रांनो पुढे जे कागदपत्रे देण्यात आले आहेत ते कागदपत्रे प्रत्येकाला लागतीलच असे नाही, कागदपत्रे हे उमेदवाराच्या शिक्षण पात्रतेनुसार व त्याचे कॅटेगिरी नुसार लागतात. तुमचं जेवढे शिक्षण झालेलं असेल त्याच शिक्षण पात्रतेचे कागदपत्रे तुम्हाला लागतील. तसेच तुम्ही भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त माजी सैनिक होमगार्ड असाल तरच हे कागदपत्रे लागतील. या पातळीवर तुम्ही बसत नसाल तर त्या कागदपत्रांची तुम्हाला आवश्यकता नाही.
Police Bharti Document List 2024 :
- 10 वी पास मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट.
- 12 वी पास मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट
- पदवीधर असल्यास, प्रथम वर्ष द्वितीय वर्ष तृतीय वर्ष गुणपत्रक (असल्यास)
- मुक्त विद्यापीठाच्या पदवीचे प्रथम वर्ष/ द्वितीय वर्ष/ द्वितीय वर्ष गुणपत्रक (असल्यास)
- पद्वित्तीर्ण पदवी असल्यास प्रथम वर्ष /द्वितीय वर्ष/ द्वितीय वर्ष गुणपत्रक (असल्यास)
- ITI/डिप्लोमा मार्कशीट
- शाळा सोडल्याचा दाखला
- शाळा शिकत असल्यास बोनाफाईड सर्टिफिकेट
- जातीचे प्रमाणपत्र
- वयाचा दाखला
- अधिवास प्रमाणपत्र
- नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र (EWS)
- खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांकरिता 30 टक्के आरक्षणाच्या सवलतीसाठी प्रमाणपत्र
- प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र (असल्यास)
- भूकंपग्रस्त प्रमाणपत्र (असल्यास)
- विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेले खेळाडू प्रमाणपत्र
- वडील पोलीस असल्यास त्याचे प्रमाणपत्र (असल्यास)
- होमगार्ड प्रमाणपत्र (असल्यास)
- आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन
- माजी सैनिक उमेदवाराचे डिस्चार्ज कार्ड ओळखपत्र (असल्यास)
- माजी सैनिक उमेदवाराचे आर्मी एज्युकेशन (असल्यास)
- चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र
सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा आणि रोज नवीन अपडेट मिळावा :
💆 WhatsApp ग्रुप जॉइन करा. | येथे क्लिक करा |
💆Telegram ग्रुप जॉइन करा. | येथे क्लिक करा |
मित्रांनो ही माहिती तुमच्या इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा जे पोलीस भरतीची तयारी करत आहेत जेणेकरून त्यांना देखील पोलीस भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रांची माहिती होईल. आणि त्यांना पोलीस भरतीसाठी काही अडचण येणार नाही. आणि अशीच माहिती रोज पाहण्यासाठी https://bhartiera.com ला रोज भेट देत जा.