RRB NTPC Notification 2024
Table of Contents
मित्रांनो रेल्वे भरती मंडळ लवकरच 2024 साठी RRB NTPC Notification जारी करणार आहेत. यामध्ये नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी, पदवीधर आणि अंडर ग्रॅज्युएट ही पदे भरण्यात येणार आहेत. तसेच या भरतीमध्ये कनिष्ठ लिपिक, कम टायपिस्ट सारख्या विविध पदांवर भरती होण्यासाठी संधी देणार आहे. त्यामुळे रेल्वे विभागामध्ये नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. या भरतीमध्ये तब्बल 30,000+ रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास येणार आहेत. त्यामुळे जे उमेदवार रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!RRB NTPC Notification 2024 ही रेल्वे भरती मंडळ द्वारे जाहीर करण्यात येणार आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण सविस्तर माहिती पुढे दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करणे शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.
NTPC Recruitment
भरतीचा विभाग : NTPC Recruitment 2024 ही भरती या विभागामध्ये होणार आहे.
भरतीचा प्रकार : NTPC Recruitment या भरतीद्वारे उमेदवारांना रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.
NTPC Full Form
NTPC चा Full Form : Non-Technical Popular Categories असा आहे.
RRB NTPC Vacancy
पदाचे नाव : RRB NTPC Notification मध्ये दिलेल्या या भरतीद्वारे कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक, लेखा लिपिक सह टंकलेखक, कनिष्ठ वेळ रक्षक, वरिष्ठ वेळरक्षक, ट्रेन्स लिपिक, कमर्शियल कम टिकीट क्लर्क, वाहतूक सहाय्यक, माल रक्षक, वरिष्ठ कमर्शियल कम टिकीट क्लर्क, वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक, कनिष्ठ खाते सहाय्यक सह टंकलेखन, व्यावसायिक प्रशिक्षणार्थी आणि स्टेशन मास्टर इत्यादी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
एकूण रिक्त पदे : एकूण 30,000+ रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for RRB NTPC
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.
- कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक : या पदाकरिता उमेदवार 12 वी किंवा त्याच्या समतुल्य 50% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच इंग्रजी व हिंदी टायपिंग मध्ये प्राविण्यता असणे आवश्यक आहे.
- लेखा लिपिक सह टंकलेखक : या पदाकरिता उमेदवार 12 वी किंवा त्याच्या समतुल्य 50% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच इंग्रजी व हिंदी टायपिंग मध्ये प्राविण्यता असणे आवश्यक आहे.
- कनिष्ठ वेळ रक्षक : या पदाकरिता उमेदवार 12 वी किंवा त्याच्या समतुल्य 50% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच इंग्रजी व हिंदी टायपिंग मध्ये प्राविण्यता असणे आवश्यक आहे.
- ट्रेन्स लिपिक : या पदाकरिता उमेदवार 12 वी किंवा त्याच्या समतुल्य 50% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- कमर्शियल कम टिकीट क्लर्क : या पदाकरिता उमेदवार 12 वी किंवा त्याच्या समतुल्य 50% किंवा त्यापेक्षा कमी गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- वाहतूक सहाय्यक : या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा त्याच्या समकक्ष.
- माल रक्षक : या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा त्याच्या समकक्ष.
- वरिष्ठ कमर्शियल कम टिकीट क्लर्क : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा त्याच्या समकक्ष.
- वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा त्याच्या समकक्ष. तसेच इंग्रजी व हिंदी टायपिंग मध्ये प्राविण्यता असणे आवश्यक आहे.
- कनिष्ठ खाते सहाय्यक सह टंकलेखन : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा त्याच्या समकक्ष. तसेच इंग्रजी व हिंदी टायपिंग मध्ये प्राविण्यता असणे आवश्यक आहे.
- व्यावसायिक प्रशिक्षणार्थी : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा त्याच्या समकक्ष.
- वरिष्ठ वेळरक्षक : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा त्याच्या समकक्ष. तसेच इंग्रजी व हिंदी टायपिंग मध्ये प्राविण्यता असणे आवश्यक आहे.
- स्टेशन मास्टर : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा त्याच्या समकक्ष.
व्यावसायिक पात्रता : उमेदवाराची व्यावसाईक पात्रता देखील पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.
RRB NTPC Age Limit
वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय वर्ष 18 ते 30 आहे त्यांना RRB NTPC Notification मध्ये दिलेल्या या भरती करिता अर्ज करता येणार आहे.
RRB NTPC Salary
वेतन/ पगार : नियुक्त उमेदवाराला रुपये – 19,900/- ते रुपये – 35,400/- एवढी मासिक वेतन मिळणार आहे.
RRB NTPC Recruitment Apply Online Date
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : लवकरच अपडेट करण्यात येईल.
RRB NTPC Recruitment Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच अपडेट करण्यात येईल
पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा. (लवकरच उपलब्ध करण्यात येईल)
अधिकृत वेबसाइट साठी येथे क्लिक करा. (लवकरच उपलब्ध करण्यात येईल)
अर्जासाठी येथे क्लिक करा. (लवकरच उपलब्ध करण्यात येईल)
नवीन अपडेट करिता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.
RRB NTPC Syllabus
RRB NTPC Exam Syllabus :
CBT 1 :
- गणित : यामध्ये संख्या प्रणाली, दशांश, अपूर्णांक, गुणोत्तर, प्रमाण, टक्केवारी, LCM, HCF इत्यादी.
- सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क : यामध्ये समानता, कोडींग-डी कोडींग, सिलोझिझम, नातेसंबंध, इत्यादी.
- सामान्य ज्ञान : यामध्ये चालू घडामोडी, खेळ, भारतीय साहित्य इत्यादी विषय.
CBT 2 :
- गणित : यामध्ये संख्या प्रणाली, वेळ आणि कार्य, नफा तोटा, भूमिती इत्यादी.
- सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क : यामध्ये समानता, सिलोझिझम, निर्णय, इत्यादी.
- सामान्य ज्ञान : यामध्ये चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, राज्य, पर्यावरण, खेळ, भारतीय साहित्य इत्यादी विषय.
तसेच यामध्ये इतिहास, भारतीय राजकारण, भूगोल, अर्थशास्त्र, विज्ञान, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र इत्यादी विषयांचा देखील समावेश आहे.
आशा करतो की तुम्हाला RRB NTPC Notification बद्दल आवश्यक माहिती या लेखांमधून मिळाली असेल.
RRB NTPC Notification बद्दलची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना RRB NTPC Notification बद्दल माहिती होईल आणि त्यांना देखील रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.
हेही वाचा :
Loco Pilot Recruitment 2024: रेल्वेमध्ये तब्बल 5696 पदांची मेगा भरती! पात्रता – 10वी उत्तीर्ण
धन्यवाद!