मित्रांनो OBC कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना आता शिक्षणासाठी तब्बल 60,000 रुपयांची आर्थिक मदत भेटणार आहे. कारण Savitribai Phule Aadhar Yojana ही नवीन योजना महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन विकास महामंडळ द्वारे या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचा फायदा खूप विद्यार्थ्यांना होणारआहे. तब्बल 60,000 रुपयांची आर्थिक सहाय्यता विद्यार्थ्यांना दर वर्षाला भेटणार आहे, यामुळे OBC प्रवर्गातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी कसलीही आर्थिक अडचण येणार नाही.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने (Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana) द्वारे वेगवेगळ्या स्तरावर भत्ते दिले जातात यात, विद्यार्थी भोजन भत्ता, निर्वाह भत्ता, निवास भत्ता समाविष्ट आहेत. राज्यातील गरीब कुटुंबामधील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी ही योजना सूरु करण्यात आली आहे. या योजनेसाठी पात्रता काय हवीआहे? यायोजनेसाठी अर्ज कसा करायचा? अशी सर्व माहिती पुढे दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा.
अशाच नवनवीन योजना अपडेट साठी WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा.
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना तपशील :
योजनेचे नाव | ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना |
सुरवात कोणी केली? | महाराष्ट्र शासन. |
योजणेचा विभाग | इतर मागास बहुजन विकास महामंडळ |
लाभार्थी | OBC मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थी. |
उद्देश | विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे. |
मिळणारी आर्थिक मदत | प्रत्येक वर्षी 60,000/- रुपये. |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन/ ऑफलाइन |
योजनेची अधिकृत वेबसाइट | – |
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana Eligibility Criteria (ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना पात्रता)
मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता असणे आवश्यक आहे. त्या आवश्यक पात्रतेची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
- अर्ज करणारा विद्यार्थी हा OBC किंवा SC, ST प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्याकडे ओबीसी मागासवर्गीय जातीचे कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थी हा चालू वर्षात शाळेत शिकत असावा.
- अर्जदार विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेरगावी होस्टेलमध्ये किंवा वसतिगृहात राहत असावा.
- या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ होणार आहे.
- योजनेद्वारे मिळणारा आर्थिक फायदा केवळ इतर मागास वर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
- विद्यार्थ्यांना या योजनेसाठी मेरिट लिस्ट द्वारे निवडले जाणार आहे.
- ज्या विद्यार्थ्यांना मागील शैक्षणीक वर्षात जास्तीत जास्त गुण मिळाले आहेत, त्यांना लाभ मिळणार आहे.
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana Benifits
सावित्रीबाई फुले आधार योजनेचे फायदे :
- या योजणेमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दर वर्षी तब्बल 60,000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.
- जे विद्यार्थी बाहेरगावी हॉस्टेल किंवा वसतिगृहात राहतात त्यांना या योजनेद्वारे विविध भत्ते मिळणार आहेत. जसे की विद्यार्थी भोजन भत्ता, निर्वाह भत्ता, निवास भत्ता. त्यामुळे त्यांना या योजनेचा खूप फायदा होणार आहे.
- या योजनेतून मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यामुळे विद्यार्थ्याचा घरच्यांना पण आर्थिक हातभार लागणार आहे.
- विद्यार्थ्याला मिळणारी सर्व आर्थिक मदत ही शिष्यवृत्ती स्वरूपात मिळणार आहे.
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana Scholarship
सावित्रीबाई फुले आधार योजना शिष्यवृत्ती : विद्यार्थ्यांना मिळणारी मदत ही विविध भत्त्याद्वारे मिळणार आहे त्याची माहिती पुढे दिली आहे. तसेच मिळणारी मदत ही क्षेत्राणूसार वेगवेगळी आहे.
मुंबई, पुणे, तसेच इतर शहरांसाठी :
- भोजन भत्ता : रुपये – 32,000/-
- निवास भत्ता : रुपये – 20,000/-
- निर्वाह भत्ता : 8,000/-
अशा पद्धतीने तुम्हाला एकूण 60,000 रुपयांची मदत मिळणार आहे.
महानगरपालिका क्षेत्रासाठी :
- भोजन भत्ता : रुपये – 28,000/-
- निवास भत्ता : रुपये – 15,000/-
- निर्वाह भत्ता : 8,000/-
अशा पद्धतीने तुम्हाला एकूण 51,000 रुपयांची मदत मिळणार आहे.
जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी :
- भोजन भत्ता : रुपये – 25,000/-
- निवास भत्ता : रुपये – 12,000/-
- निर्वाह भत्ता : 6,000/-
अशा पद्धतीने तुम्हाला एकूण 43,000 रुपयांची मदत मिळणार आहे.
Dnyanjyoti Savitribai Phule Scheme Documents (सावित्रीबाई फुले आधार योजना आवश्यक कागदपत्रे)
सावित्रीबाई फुले आधार योजना आवश्यक कागदपत्रे :
- विद्यार्थ्याचे आधार कार्ड.
- SC, ST, OBC मागासवगीर्य जातीचे कास्ट सर्टिफिकेट.
- विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र.
- विद्यार्थी किंवा त्याच्या पालकांचे बँक खाते पासबुक.
- अर्जदार विद्यार्थ्याची इयत्ता 10 वी आणि 12 वी मार्कशीट.
- महाविद्यालय, विद्यापीठ किंवा कॉलेज मध्ये प्रवेश घेतल्याचा पुरावा (प्रवेश प्रमाणपत्र किंवा पावती).
वरती जे कागदपत्र सांगितले आहेत ते सर्व कागदपत्रे तुम्हाला या योजनेचा फॉर्म भरताना जोडायचे आहेत. आणि त्यानंतर या योजने करिता अर्ज करायचा आहे. नाहीतर तुमचा फॉर्म ग्राह्य धरला जाणार नाही.
How to Apply for Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana
सावित्रीबाई फुले आधार योजना साथी अर्ज कसा करावा ? :
अधिकृत जाहिरात (पीडीएफ) येथे पहा.

- मित्रांनो ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले योजनेसाठी सध्या कोणत्याही स्वरूपाचा अर्ज सुरू झाला नाही. ज्यावेळी राज्य शासनाद्वारे अधिकृत शासन निर्णय प्रसिद्ध होईल, तेव्हाच या योजनेसाठी फॉर्म सुरू होतील. (जेव्हा अर्ज सूरु होतील तेव्हा अपडेट करण्यात येईल)
- अद्याप ज्ञानज्योती योजनेसाठी GR निघाला नाहीये, त्यामुळे अर्ज कसा करायचा? कोठून करायचा याची अधिकृत माहिती आलेली नाही. परंतु या योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही पैकी एका मार्गाने अर्ज करावे लागणार आहेत.
- जर ऑनलाईन अर्ज निघाले तर अर्जदार विद्यार्थ्यांना इतर Scholarship Yojana प्रमाणे या योजनेचा अर्ज देखील MahaDBT संकेतस्थळा वरून स्वीकारला जाऊ शकतो.
- जर अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचा असेल, तर तुम्ही इतर मागास वर्ग बहुजन विकास महामंडळ च्या कार्यालयात जाऊन योजनेचा फॉर्म भरू शकता.
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana New GR
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana New GR | येथे क्लिक करा |
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना या योजनेबद्दल माहिती होईल आणि त्यांना देखील या योजनेद्वारे थोडीशी मदत होईल. आणि अशाच नवनवीन योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.
इतर महत्वाच्या योजना :
धन्यवाद!