Sukanya Samriddhi Yojana
Table of Contents
मित्रांनो केंद्र सरकार आणि राज्य सरकारद्वारे अनेक योजना राबवल्या जातात. त्यापैकीच एक योजना म्हणजे Sukanya Samriddhi Yojana. या योजनाद्वारे कशाप्रकारे तुमच्या घरामधील मुलीचे आयुष्य उज्वल कशाप्रकारे होऊ शकते आणि कशाप्रकारे आई वडील आपल्या मुलीसाठी थोडीसी रक्कम प्रत्येक महिन्याला भरून तिच्या उच्च शिक्षणाला किंवा तिच्या लग्नासाठी किंवा ती 21 वर्षाची होईपर्यंत एक मोठ्या रकमेचा परतावा मिळवू शकतात.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!Sukanya Samriddhi Yojana या योजनेचे काय काय फायदे आहेत. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे. आणि कशाप्रकारे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता अशी सर्व महत्वाची माहिती तुम्हाला या लेखातून मिळणार आहे. त्यामुळे पूर्ण माहिती व्यवस्थितपणे वाचा. आणि तुम्ही पण या योजनेचा लाभ घ्या.
मित्रांनो सरकारच्या अशाच नवनवीन योजनांची माहीती व्हाटसप्प वर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप लगेच जॉइन करा.
ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
Sukanya Samriddhi Yojana Details
योजनेचे नाव. | सुकन्या समृद्धी योजना. |
विभाग. | महिला व बालविकास विभाग. |
कोणी सुरू केली? | केंद्र सरकार. |
केव्हा सुरू झाली? | 22 जानेवारी 2015. |
लाभार्थी. | लहान मुली. |
योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत. | पोस्टाच्या माध्यमातून. |
योजनेचा उद्देश. | मुलींच्या आयुष्य उज्वल बनवणे. |
योजनेद्वारे मिळणारा लाभ. | आर्थिक. |
Sukanya Samriddhi Yojana Benefits
सुकन्या समृद्धी योजनेचा उद्देश :
- कुटुंबातील मुलीचे शिक्षण, तिचे लग्न आणि तिचे आयुष्य उज्वल बनवण्यासाठी केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात केली आहे.
- मुलीने तिच्या आयुष्यामध्ये आत्मनिर्भर व्हावे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
- मुलीच्या उच्च शिक्षणाकरिता तिला आर्थिक सहाय्य करण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- राज्यातील मुलींचा सामाजिक व आर्थिक विकास करणे.
सुकन्या समृद्धी योजनेचे वैशिष्ट्ये :
- या योजनेचा कालावधी हा खाते उघडल्यापासून मुलीचे वय 21 वर्षे होईपर्यंत आहे.
- मुलीचे वय 18 झाल्यानंतर तिच्या उच्च शिक्षणासाठी 50 टक्के रक्कम काढता येते.
- या योजनेचा कालावधी हा 21 वर्षापर्यंतचा असला तरी सुरुवातीचे केवळ पंधरा वर्षापर्यंत योजनेअंतर्गत पैसे जमा करायचे आहेत. यामध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला केवळ 250 रुपये जमा करावे लागणार आहेत.
- जर मुलीचे वय 21 वर्षे पूर्ण होण्याच्या अगोदर त्या मुलीचे लग्न झाले तर त्या मुलीला सुकन्या समृद्धी योजनेमधून रद्द केले जाईल व तिचे खाते बंद केले जाईल. आणि त्यानंतर त्या योजनेचा लाभ मुलीच्या पालकांना घेता येणार नाही.
- या योजनेमध्ये तुम्ही जी रक्कम जमा करणार आहेत त्यावरती कसल्याही प्रकारचा टॅक्स भरावा लागणार नाही.
- जर तुम्ही मुलगी 21 वर्षाची झाल्यानंतर देखील तिच्या खात्यामधून जमा रक्कम काढली नाही तर त्या जमा रकमेवर सुद्धा तुम्हाला व्याज दिले जाईल.
- या योजनेमध्ये तुम्हाला दरवर्षी किमान 250/- रुपये भरणे आवश्यक आहे. आणि असे न केल्यास ते खाते बंद केले जाते व नंतर पुन्हा चालू करण्यासाठी प्रत्येक वर्षाला 50/- दंड घेतला जातो. आणि खाते सुरू केले जाते.
- जर या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थी व्यक्तीचा काही कारणास्तव मृत्यू झाला तरी देखील जमा केलेली रक्कम मिळवण्यासाठी लाभार्थ्यांच्या पालकांना दिली जाते.
जमा रक्कम व मिळणारा परतावा :
वर्ष | आर्थिक वर्ष | व्याजाचा दर (%) | वार्षिक गुंतवणूक (Rs.) | मिळणारे व्याज (Rs.) | वार्षिक एकूण रक्कम (Rs.) |
1 | 2023-2024 | 8.0 | 1,00,000 | 8,000 | 1,08,000 |
2 | 2020-2021 | 7.60 | 1,00,000 | 7,600 | 1,07,600 |
3 | 2021-2022 | 7.60 | 1,00,000 | 15,777.60 | 2,23,378 |
4 | 2022-2023 | 7.60 | 1,00,000 | 24,576.72 | 3,47,955 |
5 | 2023-2024 | 7.60 | 1,00,000 | 34,044.60 | 4,82,000 |
6 | 2024-2025 | 7.60 | 1,00,000 | 44,232.00 | 6,26,232 |
7 | 2025-2026 | 7.60 | 1,00,000 | 55,193.64 | 7,81,426 |
8 | 2026-2027 | 7.60 | 1,00,000 | 66,988.32 | 9,48,414 |
9 | 2027-2028 | 7.60 | 1,00,000 | 79,679.52 | 11,28,094 |
10 | 2028-2029 | 7.60 | 1,00,000 | 93,335.16 | 13,21,429 |
11 | 2029-2030 | 7.60 | 1,00,000 | 1,08,028.56 | 15,29,458 |
12 | 2030-2031 | 7.60 | 1,00,000 | 1,23,838.80 | 17,53,297 |
13 | 2031-2032 | 7.60 | 1,00,000 | 1,40,850.60 | 19,94,148 |
14 | 2032-2033 | 7.60 | 1,00,000 | 1,59,155.28 | 22,53,303 |
15 | 2033-2034 | 7.60 | 1,00,000 | 1,78,851.00 | 25,32,154 |
16 | 2034-2035 | 7.60 | 1,00,000 | 2,00,043.72 | 28,32,198 |
17 | 2035-2036 | 7.60 | 0 | 2,15,247.00 | 30,47,445 |
18 | 2036-2037 | 7.60 | 0 | 2,31,605.88 | 32,79,051 |
19 | 2037-2038 | 7.60 | 0 | 2,49,207.84 | 35,28,259 |
20 | 2038-2039 | 7.60 | 0 | 2,68,147.68 | 37,96,407 |
21 | 2039-2040 | 7.60 | 0 | 2,88,526.92 | 40,84,934 |
22 | 2040-2041 | 7.60 | 0 | 3,10,455.00 | 43,95,389 |
Sukanya Samriddhi Yojana चा सर्वात चांगला फायदा म्हणजे ही योजना इतर योजनांपेक्षा अधिक व्याजदर देते.
Sukanya Samriddhi Yojana Scheme
योजनेच्या नियम व अटी :
- चा लाभ घेण्याकरिता मुलीच्या जन्मापासून ती दहा वर्षाची होईपर्यंत तिचे या योजनेअंतर्गत खाते उघडणे गरजेचे आहे. कारण या योजनेचा लाभ फक्त 10 वर्षा खालील मुलींनाच घेता येईल.
- जर एखाद्या कुटुंबामध्ये दोन मुली असतील तरी देखील दोन्ही मुलींचे या योजनेअंतर्गत खाते उघडून लाभ घेता येईल.
- या योजनेअंतर्गत उघडलेल्या खात्यामध्ये रोख रक्कम भरण्याकरिता तुम्ही डिमांड ड्राफ्ट, चेक किंवा कोर बँकिंग सिस्टमच्या सहाय्याने देखील पैसे भरू शकता.
- मुलीचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर जमा केलेली एकूण रक्कम त्याच्या व्याजासहित मुलीच्या पालकांच्या स्वाधीन केली जाते.
- जर मुलीचे नाव ठेवण्या अगोदर या योजनेअंतर्गत खाते उघडले तर ते तिच्या आईच्या नावावर उघडता येते आणि नंतर ते बदलून मुलीच्या नावावर देखील करता येते.
- Sukanya Samriddhi Yojana या योजनेअंतर्गत केवळ मुलींनाच लाभ घेता येतो.
- या योजनेअंतर्गत एकदा खाते उघडल्यानंतर हवे तर तुम्ही 05 पाच वर्षांनी बंद देखील करू शकता.
Sukanya Samriddhi Yojana Documents
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
- मुलीच्या जन्माचा दाखला.
- पॅन कार्ड.
- आधार कार्ड.
- मतदान ओळखपत्र.
- रेशन कार्ड.
- विज बिल.
- मुलींच्या आई-वडिलांचा फोटो आणि रहिवासी प्रमाणपत्र.
या आवश्यक कागदपत्रांमध्ये काही कागदपत्रे मुलीच्या आई-वडिलांची देखील असणे आवश्यक आहे. आणि जर त्या मुलीचे आई-वडील नसतील तर अशा परिस्थितीमध्ये त्या मुलीची देखभाल करणाऱ्या व्यक्तीचे कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
Sukanya Samriddhi Yojana Bank List
सुकन्या समृद्धी योजना बँक यादी :
- इंडियन बँक.
- इंडियन ओवसीज बँक.
- आयडीबीआय बँक.
- आयसीआयसीआय बँक.
- देना बँक.
- कॉर्पोरेशन बँक.
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया.
- कॅनरा बँक.
- बँक ऑफ बडोदा.
- बँक ऑफ इंडिया.
- बँक ऑफ महाराष्ट्र.
- ॲक्सिस बँक.
- आंध्रा बँक.
- इलाहाबाद बँक.
- भारतीय स्टेट बँक.
- स्टेट बँक ऑफ म्हैसूर.
- स्टेट बँक ऑफ त्रावणकोर.
- स्टेट बँक ऑफ हैदराबाद.
- स्टेट बँक ऑफ बिकानेर अंड जयपुर.
- विजया बँक.
- युनियन बँक ऑफ इंडिया.
- स्टेट बँक ऑफ पटियाला.
- युनायटेड बँक ऑफ इंडिया.
- सिंडिकेट बँक.
- युको बँक.
- पंजाब अँड सिंध बँक.
- ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स.
इत्यादी अधिकृत बँकांमध्ये तुम्ही या योजनेअंतर्गत खाते उघडू शकता.
Sukanya Samriddhi Yojana Post Office
पोस्ट ऑफिस मध्ये अशा पद्धतीने अर्ज करा :
- सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज डाऊनलोड करा. किंवा जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन अर्ज घ्या.
- त्यानंतर तो अर्ज व्यवस्थितपणे भरा.
- अर्धा मधील माहिती भरल्यानंतर त्यासोबत लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची जोडणी करा जोडणी करा.
- आणि पोस्ट ऑफिस मध्ये जमा करा.
- तुम्ही जमा केलेला अर्ज तपासला जाईल. त्यानंतर तुम्हाला खाते उघडण्यासाठी कमीत कमी 250/- रुपये जमा करावे लागतील.
- त्यानंतर तुम्हाला पोस्टकडून एक पासबुक दिले जाईल ज्यामध्ये तुम्हाला प15 वर्षे पैसे जमा करावे लागतील.
- अशा पद्धतीने तुम्ही पोस्ट ऑफिस मधून देखील या योजनेसाठी हा ते उघडू शकता.
बँकेमध्ये अशा पद्धतीने अर्ज करा :
- Sukanya Samriddhi Yojana या योजनेअंतर्गत फॉर्म भरण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म डाऊनलोड करू शकता.
- त्यानंतर जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन या योजनेचा अर्ज घ्या.
- त्यानंतर अर्जामध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा. व त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून बँकेमध्ये अर्ज जमा करा.
- बँकेद्वारे तुम्ही केलेल्या अर्जाची तपासणी झाल्यानंतर तुमचे खाते या योजनेअंतर्गत उघडले जाईल.
- खाते उघडण्यासाठी तुम्हाला कमीत कमी अडीचशे रुपये जमा करावे लागतील.
- तुमचे खाते उघडल्यानंतर बँकेकडून तुम्हाला एक पासबुक दिले जाईल ज्यामध्ये तुम्हाला पंधरा वर्षापर्यंत पैसे जमा करावे लागतील.
- अशा प्रकारे तुम्ही या योजनेअंतर्गत खाते उघडून या योजनेचा लाभ घेऊ शकता.
आशा करतो की या लेखांमधून तुम्हाला Sukanya Samriddhi Yojana बद्दल आवश्यक ती सर्व माहिती मिळाली असेल. ही माहिती तुमच्या मित्रांसोबत व नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना योजनेचा लाभ होईल. आणि सरकारच्या अशाच नवनवीन योजनांच्या अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ ला रोज भेट देत जा.
हेही वाचा :
Ujjwala Yojan: प्रधानमंत्री उज्वला योजना 2.0! सर्वांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन | पहा पूर्ण माहिती
धन्यवाद!