Pune Mahanagarpalika Bharti 2024: पुणे महानगरपलिकेमद्धे नवीन पदभरती जाहीर! पहा पूर्ण माहिती

Pune Mahanagarpalika Bharti

Pune Mahanagarpalika Bharti
Pune Mahanagarpalika Bharti

मित्रांनो पुणे महानगरपालिकेमध्ये रिक्त पदे भरण्यासाठी Pune Mahanagarpalika Bharti ही नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) श्रेणी क हे पद सरळसेवा पद्धतीने भरण्यात येणार आहे. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) श्रेणी क पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Pune Mahanagarpalika Bharti या भरतीची जाहिरात ही महानगरपालिका आयुक्त पुणे महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करणे शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

Pune Mahanagarpalika Recruitment 2024

भरतीचा विभाग : ही भरती महानगरपालिका आयुक्त पुणे महानगरपालिका या विभागामध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : Pune Mahanagarpalika Bharti ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पुणे महानगरपालिकेमद्धे नोकरी मिळणार आहे.

Vacancy Details of Pune Mahanagarpalika Bharti

पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) श्रेणी क हे रिक्त पद या भरती द्वारे भरण्यात येणार आहे.

कर्तव्य/ जबाबदारी : नियुक्त उमेदवाराला महानगरपालिकेतील स्थापत्य विषयाची कामे करणे, कार्यरत क क्षेत्रात विकास कामांतर्गत सर्वेक्षण करणे तसेच प्रकल्प अहवाल तयार करणे. प्रकल्पाचे बांधकाम संकल्प चित्रा नुसार होत आहे की नाही याची देखरेख व नियंत्रण तसेच कामाचा दर्जा तपासणी. महानगरपालिकेच्या कार्य नियमावली नुसार काम करणे. इत्यादी कर्तव्य उमेदवाराला पार पाडावी लागणार आहे.

एकूण रिक्त पदे : एकूण 113 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

वेतन/ पगार : नियुक्त उमेदवाराला रुपये – 38,600/- ते 1,22,800/- एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

Educational Qualification for Pune Mahanagarpalika Bharti

शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पूर्णवेळ पदवी/ उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

व्यावसायिक पात्रता : उमेदवाराची व्यावसाईक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

वयोमर्यादा :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवार : कमाल वयोमर्यादा 38 वर्षे.
  • मागासवर्गीय उमेदवार : 43 वर्षे.
  • दिव्यांग/ माजी सैनिक : कमाल वयोमर्यादा 45 वर्षे.
  • माजी सैनिकांसाठी वयोमर्यादेत सवलत : उमेदवारांच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक 03 वर्षे.

वयोमर्यादेतील सवलती बद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात पाहू शकता.

Required Document for Pune Mahanagarpalika Bharti

Pune Mahanagarpalika Bharti
Pune Mahanagarpalika Bharti

आवश्यक कागदपत्रे :

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पूर्णवेळ पदवी/ पदविका.
  • वयाचा पुरावा.
  • आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा.
  • राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र.
  • नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र.
  • जर दिव्यांग असेल तर त्याचा पुरावा.
  • पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा.
  • खेळाडूसाठीच्या आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा.
  • अधिवास प्रमाणपत्र.
  • डोमासाईल.
  • MS-CIT अथवा समक्ष प्रमाणपत्र.
  • प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र.
  • भूकंपग्रस्त प्रमाणपत्र.
Pune Mahanagarpalika Recruitment Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 16 जानेवारी 2024 पासून पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

परीक्षा शुल्क :

  • खुला प्रवर्ग : रुपये – 1,000/-.
  • मागासवर्गीय : रुपये – 900/-.
  • माजी सैनिक/ दिव्यांग : परीक्षा शुल्क नाही.
Pune Mahanagarpalika Recruitment Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाइट साठी येथे क्लिक करा.

अर्जासाठी येथे क्लिक करा.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध होण्याची तारीख : परीक्षेच्या सात दिवस अगोदर ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध होईल.

How to Apply For Pune Mahanagarpalika Bharti

अशा पद्धतीने अर्ज करा :

  1. उमेदवारांनी सर्वात अगोदर https://pmc.gov.in/recruitment/recruitmentmr.html या लिंक वरती जाऊन सदर भरतीची जाहिरात व्यवस्थित वाचा. आणि त्यानंतरच अर्ज भरा.
  2. त्यानंतर वरती दिलेल्या लिंक वर आपल्या ऑनलाइन या बटणावर क्लिक करा.
  3. तर तुमच्यासमोर एक नवीन स्क्रीन उघडेल. त्यानंतर नवीन नोंदणी येथे क्लिक करा. त्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन करा.
  4. त्यानंतर अर्ज काळजीपूर्वक भरा. आवश्यक ते सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करा. सर्व माहिती व्यवस्थित चेक करा कारण एकदा फॉर्म सबमिट झाल्यानंतर त्यामध्ये परत दुरुस्ती करता येणार नाही.
  5. फॉर्म भरून झाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरा.
  6. आणि तुम्ही भरलेल्या अर्जाची प्रिंट आऊट घ्यायला विसरू नका.

महत्त्वाचे : उमेदवाराने पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या अर्जाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे भरलेले अर्ज स्वीकार केले जाणार नाहीत. अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांक व वेळेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच महाराष्ट्र शासन, केंद्र शासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर सेवेत असलेल्या उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

अर्ज सादर करतेवेळी त्यांनी ज्या पदासाठी अर्ज केला असेल, त्या पदाचे नाव जाहिरातीचा संदर्भ व अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेला अंतिम दिनांक इत्यादी तपशील आपल्या विभाग/ कार्यालय प्रमुखांना कळवावा आणि आपला अर्ज विचारात घेतल्या जाण्यास कोणताही आक्षेप असल्यास अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या दिनांक पासून 30 दिवसांच्या आत तसेच माननीय महानगरपालिका आयुक्त पुणे यांना परस्पर कळविण्याची विनंती आपल्या विभाग कार्यालय प्रमुखांना करावी.

Pune Mahanagarpalika Bharti
Pune Mahanagarpalika Bharti

आशा करतो की या लेखांमधून तुम्हाला Pune Mahanagarpalika Bharti बद्दल हवी ती माहिती मिळाली असेल. ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांची महानगरपालिकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

CRPF Recruitment 2024: केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये नोकरीची संधी! येथे पहा पात्रता

धन्यवाद!