मित्रांनो आजकाल आपण तर पाहतोच की ऑनलाइन पेमेंट साठी क्रेडिट कार्ड चा उपयोग खूप वाढला आहे. तर आपण क्रेडिट कार्डची (Credit Card Information in Marathi) माहिती पाहणार आहोत. क्रेडिट कार्ड म्हणजे काय? ते घेतले पाहिजे की नाही? त्याचे फायदे कोणते? त्याचे तोटे कोणते? अशी सर्व माहिती पुढे दिली आहे.कित्येक वेळ वस्तु खरेदी केल्यानंतर पेमेंटच्या वेळी क्रेडिट कार्ड चा उपयोग करताना तुम्ही पाहिला असेलच किंवा ऐकलं असेलच.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!वेवस्तीत लक्ष दिलत तर आपल्याला क्रेडिट कार्ड्स मुळे जास्त Discount आणि रिवॉर्ड पॉईंट्स सुद्धा पाहायला मिळतात. आपण आज ह्या लेखा च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत क्रेडिट कार्ड घेणे तुमच्यासाठी खरंच फायद्याच आहे का? की तुम्हाला क्रेडिट कार्डने नुकसान होईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या ह्या Credit Card Information in Marathi पोस्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पण जर क्रेडिट कार्ड यूज करायचं विचार करत असाल तर पूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा.
म्यूचुअल फंड म्हणजे काय? भारतामधील म्यूचुअल फंड चे प्रकार किती?
क्रेडिट कार्ड म्हणजे काय? Credit Card Information in Marathi
क्रेडिट कार्ड म्हणजे काय? (Credit Card Information in Marathi) हे आपण एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया:
‘Credit’ क्रेडिट या शब्दाचा अर्थ ‘उधारी’. क्रेडिट कार्ड हे बँकेकडून मिळणारे एक प्रकारच शॉर्ट टर्म लोन किंवा उधारी आहे ह्यामध्ये ठराविक काळासाठी आपण पैसे उधारीवर कोणत्याही चार्जेस किंवा कोणत्याही प्रकचे व्याज लागत नाही पण ह्याकरिता काही अटी असतात.
जर तुम्हाला कार्ड मिळाले तर तुम्ही या कार्डचा वापर कोणतीही वस्तु खरेदी करण्यासाठी करू शकता आणि बँकेला त्याचे पैसे काहीकाळानंतर नंतर परत करू शकता. पैसे रिटर्न करण्याचा टाइम म्हणजेच Credit Period असतो आणि तो हा सहसा एक एक ते दीड महिन्याचा असू शकतो बँकेचा नियमाप्रमाणे तो वेगवेगळा पण असू शकतो.
जसे कि एखादी वस्तू घेतल्यानंतर डेबिट कार्डने पैसे भरल्यावर पैसे तुमच्या पर्सनल बँक अकाऊंटमधून लगेच कट केले जातात.परंतु क्रेडिट कार्डचा वापर करून पैसे दिल्यावर ते तुमच्या अकाउंट मधुन न कटता क्रेडिट कार्डमधून म्हणजेच ज्या बँकेकडून तुम्ही क्रेडिट कार्ड घेतल आहे, त्या बँकेचे क्रेडिट मधील पैसे कट होतात आणि मग तुम्हाला हे पैसे काही दिवसांनी परत करायचे असतात.
Credit Card Benefits
उदाहरण :
जर मला बँक ने 50,000 ची क्रेडिट लिमिट दिली असे समजा. मी या महिन्याच्या 10 तारखेला 10000 रुपयाची काही खरेदी केली आणि त्याच बिल मी माझ्या क्रेडिट कार्ड ने जर भरल आहे. आता हे 10000 रुपये माझ्या बँक अकाऊंटमधून तर गेलेले नाहीत तर बँकने दिलेल्या क्रेडिट कार्ड मधील क्रेडिट लिमिटमधून कट झाले आहेत.
आता तुम्हाला वाटत असेल की ही पैसे आपण नेमक भरायचे कधी? त्यासाठी प्रत्येक क्रेडिट कार्ड कंपनी एक ठराविक दिवसांचा क्रेडि कालावधी असतो. जस की माझ्या क्रेडिट कार्डमध्ये प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला बिल येत जे महिन्याच्या 30 तारखेपर्यन्त भरायचा असत. म्हणजेच मला कोणत्याही चार्जेस शिवाय बँकचे पैसे वापरण्यासाठी 45 दिवस मोफत मिळतात. कस से ते समजून घ्या.
15 जानेवारी 2024 ते 15 मार्च 2024 (यामध्ये टोटल झाले 30 दिवस आणि 15 मार्चला क्रेडिट कार्डच बिल येत) आणि त्यानंतर ते बिल भरण्याची तारीख ही 30 मार्च 2024 पर्यन्त मला भरायच आहे म्हणजे अजून मला 15 दिवस जास्त भेटतात. म्हणजे जवजवळ 45 दिवसाचा फ्री क्रेडिट पैसे मिळतात. पण आता तुम्हाला असे वाटत असेल की यामध्ये क्रेडिट देणाऱ्या बँकेला काय फायदा होत असेल? तर चला पाहूया की यामध्ये बँकेला कशाप्रकारे फायदा होतो.
क्रेडिट कार्ड द्वारे बँकेचा फायदा कसा होतो? (Credit Card Information in Marathi):
कोणतीही बँक असो की क्रेडिट कार्ड कंपनी जेव्हा एखादा कस्टमर क्रेडिट कार्डवर त्यांचा खर्च करतो आणि अगदी वेळेवर पैसे भरतो अशा कस्टमरपासून कोणत्याही क्रेडिट कार्ड कंपनीला कधीच काहीच फायदा होत नाही. फक्त थोडेफार AMC (वार्षिक Charges) असेल तर द्यावे लागतत् तेवढेच. पण जर तुम्ही ठराविक रुपयांची खरेदी केलीत तर त्यात डिस्काउंट मिळतो पण जर तुम्ही वेळेवर पैसे नाही भरले तर ते खुप चार्जेस करतात जे कि आपल्या पर्सनललोण पेक्षा जास्त असते.
यासोबतच ते जे दुकानदार किंवा व्यापारी आहे त्यांच्याकडून देखील काही चार्जेस घेतात ते एक किंवा दोन टक्के असू शकते परंतु त्यांना असा फायदा होतो कि कस्टमर कडे जरी पैसे नसले तरी तो क्रेडिट कार्ड चा माध्यमातून देऊ शकतो. म्हणजेच तुमच्याकडे जारी पैसे नसले तरी तुम्ही बँक चे पैसे काही दिवसासाठी वापरू शकता.
क्रेडिट कार्ड यूज करून त्याचे बिल नही भरले तर काय होते? (Credit Card Information in Marathi) :
तुम्ही जेव्हा क्रेडिट कार्डच बिल भरले नाही अशा वेळेस बँक किंवा संबंधित कंपनी त्या बिलावर त्याचे व्याज घ्यायला सुरुवात करते पण जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड बिलाची Minimum Amount Due असते ती भरता तेव्हा जे उरलेले बिल आहे त्यावर इंटरेस्ट घेतला जातो पण कोणतीही इतर चार्जेस जसे late फी घेतली जात नाही. तसे बघितले तर क्रेडिट कार्ड हे कधीच वाईट नाही पण तुम्ही त्याचा कोणत्या प्रकारे वापर करता यावर सगळ अवलंबून आहे.
जर तुम्हाला वाटेल तिथे उगाच खर्च करत गेलात आणि पैसे भरताना जर पैसे नसले तर यामध्ये तुम्ही जास्त फसत जातात. पण जर तुम्ही स्मार्टपणे आणि जबाबदरीने क्रेडिट कार्ड वापर करत राहिला तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल
आशा करतो की तुम्हाला या लेखामधून क्रेडिट कार्ड संबधी सर्व आवश्यक माहिती मिळाली असेल. Credit Card Information in Marathi ही माहिती तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना पण याबद्दलची आवश्यक माहिती मिळेल. आणि जर तुम्हाला अशाच फायनॅन्स संबधी माहिती जाणून घ्यायला आवडत असेल तर तुम्ही आमचा ग्रुप लगेच जॉइन करा.
अशाच माहितीसाठी ग्रुप जॉइन करा – JOIN
अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.
धन्यवाद!