Pradhan Mantri Mudra Yojana 2024
Table of Contents
नमस्कार मित्रांनो आपण या पोस्टमध्ये Pradhan Mantri Mudra Yojana नेमकं काय आहे? आणि या योजनेद्वारे कशाप्रकारे आपल्याला स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी कर्ज मिळणार आहे याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्ही तुमचा स्वतःचा एखादा छोटासा व्यवसाय करत असाल आणि जर तो तुम्हाला वाढवायचा असेल तर या योजनेद्वारे तुम्हाला तब्बल 10,00,000 रुपयापर्यंतचे कर्ज अगदी सहज उपलब्ध होऊ शकते.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!जर तुम्हाला हे कर्ज मिळवण्या बद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर Pradhan Mantri Mudra Yojana 2024 ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. आणि जर तुम्हाला सरकारच्या अशाच नवनवीन योजनांची माहिती हवी असेल तर तुमचा व्हाट्सअप चॅनल लगेच जॉईन करा. जेणेकरून येणाऱ्या कोणत्याही नवीन योजनेची नोटिफिकेशन तुम्हाला व्हाट्सअप वर मिळेल.
आमचा व्हाट्सअप चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.
PM Mudra Yojana
योजनेचे नाव. | प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना. |
कोणा द्वारे सुरू केली गेली? | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. |
लाभार्थी. | लहान व मध्यम उद्योजक. |
योजनेचे उद्दिष्ट. | नागरिकांना व्यवसाय करण्यासाठी कर्ज पुरवठा करणे. |
अधिकृत वेबसाईट. | https://www.mudra.org.in/ |
Mudra Yojana Scheme
योजनेचे उद्दिष्ट : मित्रांनो आपला भारत देश सध्या विकसनशील देश आहे. तसेच आपला देश जलद गतीने विकसित देश बनण्याकडे वाटचाल करत आहे. आणि यासाठी छोटेमोटे उद्योग याला खूप मोठी मदत करतात. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेऊनच या लहानमोठ्या उद्योगांना आर्थिक सहकार्य करण्यासाठी प्रधान मंत्री मुद्रा लोन योजना सुरू केली आहे.
या योजनेद्वारे लाभार्थी Mudra Loan Yojana मधून कर्ज घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. आणि ज्यांचा अघोडारच स्वतःचा व्यवसाय आहे ते तो व्यवसाय वाढवण्यासाठी देखील या योजनेमधून कर्ज घेऊ शकतात. या योजनेचे मुख्य उद्दिष्टे ही देशातील जास्तीत जास्त युवकांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देणे हे आहे. जेणेकरून देशामधील बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल आणि देशाचा विकास झपाट्याने होईल.
- Pradhan Mantri Mudra Yojana चे तीन प्रकार आहेत. त्याची माहिती पुढे दिली आहे.
- शिशु : या प्रकारामध्ये लाभार्थीला रुपये 50,000 हजार पर्यंतचे कर्ज मिळते.
- किशोर : या मुद्रा कर्जाच्या प्रकारामध्ये लाभार्थीला रुपये 50,000 ते रुपये 5,00,000 लाख पर्यंतचे कर्ज मिळते.
- तरुण : या मुद्रा कर्जाच्या प्रकारामध्ये लाभार्थीला रुपये 5,00,000 ते रुपये 10,00,000 लाख पर्यंतचे कर्ज मिळते.
Pradhan Mantri Mudra Yojana Loan
Pradhan Mantri Mudra Yojana चा लाभ कोणा कोणाला मिळणार आहे याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
पुढील व्यवसाय असणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात :
- एकल मालक (सोल प्रोपराईटर).
- पार्टनरशिप.
- सेवक क्षेत्रातील कंपन्या
- सूक्ष्म उद्योग.
- दुरुस्तीचे दुकाने.
- ट्रक मालक.
- ज्यांचे अन्नसंबंधीत व्यवसाय आहेत असे.
- मायक्रो मॅन्युफॅक्चरिंग फर्म.
Mudra Yojana Benefits
Pradhan Mantri Mudra Yojana चे फायदे :
- देशांमधील कोणताही व्यक्ती ज्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे तो या योजनेअंतर्गत कर्ज घेऊ शकतो.
- या योजनेअंतर्गत लाभार्थीला व्यवसाय सुरू करण्यासाठी आम्ही शिवाय कर्ज दिले जाणार आहे. आणि त्या कर्जासाठी त्याच्याकडून कोणतेही प्रोसेसिंग शुल्क देखील घेतले जाणार नाही.
- या योजनेअंतर्गत मिळालेल्या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी 5 वर्षापर्यंत वाढवला जाऊ शकतो.
- या योजनेअंतर्गत कर्ज घेणाऱ्या लाभार्थीला मुद्रा कार्ड मिळते. नंतर त्या कारच्या मदतीने व्यावसायिक गरजांवर खर्च करता येतो.
Pradhan Mantri Mudra Yojana Required Document List
योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड.
- पॅन कार्ड.
- अर्जदाराचा कायमचा पत्ता.
- व्यवसायाचा पत्ता आणि स्थापनेचा पुरावा.
- मागील तीन वर्षाचे बॅलन्स शीट.
- इन्कम टॅक्स रिटर्न्स आणि सेल टॅक्स रिटर्न.
- एक पासपोर्ट आकाराचा फोटो.
- व्यवसायासाठी लागणारे मटेरियल किंवा यंत्रसामग्री इत्यादींचे कोटेशन व बिले.
इत्यादी आवश्यक कागदपत्रे या योजने करिता लागणार आहेत.
Pradhan Mantri Mudra Yojana Eligibility
या योजनेसाठी आवश्यक पात्रता खालीलप्रमाणे असणे गरजेचे आहे :
- अर्ज करणारा नागरिक हा भारतीय असावा.
- अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय हे 18 वर्षापेक्षा कमी नसावे.
- अर्जदाराकडे कोणत्याही बँकेचे कर्ज थकबाकी नसावी.
Pradhanmantri Mudra Yojana
Pradhan Mantri Mudra Yojana ही फक्त सरकारी बँक मध्येच होईल. ती कोणत्याही प्रायवेट बँक मध्ये होणार नाही. या योजनेमद्धे समाविष्ट असणाऱ्या बँकांची लिस्ट पुढे दिली आहे.
- अलाहाबाद बँक
- ऑफ इंडिया.
- कॉर्पोरेशन बँक.
- आयसीआयसीआय बँक.
- j&k बँक.
- पंजाब आणि सिंध बँक.
- सिंडिकेट बँक.
- युनियन बँक ऑफ.
- आंध्र बँक.
- आयडीबीआय बँक.
- देना बँक.
- बँक ऑफ महाराष्ट्र.
- कर्नाटक बँक.
- तामिळनाडू मर्कंटाइल बँक.
- पंजाब नॅशनल बँक.
- ॲक्सिस बँक.
- कॅनरा बँक.
- इंडियन बँक.
- फेडरल बँक.
- कोटक महिंद्रा बँक.
- सारस्वत बँक.
- युको बँक.
- बँक ऑफ बडोदा.
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया.
- एचडीएफसी बँक.
- ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स.
- इंडियन ओव्हरसीज बँक.
- स्टेट बँक ऑफ इंडिया.
- युनियन बँक ऑफ इंडिया.
मित्रांनो इत्यादी बँक मधून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो.
Pradhan Mantri Mudra Yojana Apply
या योजणेकरिता तुम्ही ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत :
- सर्वात अघोदर तुम्ही कोणत्याही सरकारी बँक च्या अधिकृत वेबसाइट वरुण मुद्रा लोन योजनेचा अर्ज डाउनलोड करून घ्या.
- डाउनलोड केलेला अर्ज व्यवस्थित भरा. आणि त्यासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे जोडा.
- कर्जदार मुद्रा कर्जासाठी उद्यम मित्र पोर्टल (www.udyamimitra.in) वर देखील ऑनलाइन अर्ज करू शकतो.
- तुम्हाला रेफ्रेन्स आयडी किंवा क्रमांक मिळवण्यासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाइट वर ऑनलाइन अर्ज सबमिट करा.
- त्यानंतर तुमच्या कर्जाची प्रोसेस पुढे नेण्यासाठी त्या बँकेचा प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधेल. आणि त्यावेळेस तुम्हाला तुमच्या मिळालेल्या आयडी ची आवश्यकता लागेल त्यामुळे तो जपून ठेवा.
- त्यानंतर तुमच्या अर्ज आणि कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर तुम्हाला प्राप्त झालेल्या कर्जाची रक्कम तुमच्या बँक द्वारे तुमच्या खात्यामध्ये वितरित केली जाईल.
ऑफलाइन अर्ज करण्याची पद्धत :
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी या योजनेमद्धे समाविष्ट असणाऱ्या तुमच्या जवळच्या बँक ला भेट द्या.
- त्यानंतर बँक मधून मुद्रा लोन योजनेचा अर्ज भरा आणि त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा.
- नंतर त्या बँकेसोबत कर्जाची पुढील प्रक्रिया पूर्ण करा.
- तुमच्या अर्ज आणि कागदपत्राची तपासणी झाल्यानंतर तुम्हाला कर्ज मंजूर होईल.
- त्यानंतर तुम्हाला मिळालेल्या कर्जाची रक्कम तुमच्या खात्यामध्ये वितरित केली जाईल.
अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही प्रकारे या योजनेसाठी अर्ज करू शकतात. या योजने मधून मिळालेल्या कर्जाच्या रकमेवर व्याजदर हा 7.30% p.a पासून सुरू होतो. याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही संबंधित बँक कर्मचाऱ्याशी चौकशी करू शकतात.
Mudra Loan Yojana
मित्रांनो अशा करतो की ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेन्ट करून नक्की सांगा. आणि ही माहिती तुमच्या मित्रांबरोबर तसेच नतेवाईकांबरोबर नक्की शेअर करा. जे स्वतःचा व्यवसाय करत आहेत. किंवा सुरू करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना या योजणेचा लाभ होईल. आणि सरकारच्या अशाच नवीन योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ ला आवश्य भेट देत जा.
हेही वाचा :
धन्यवाद!